जर तुमचे बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) आणि इंडियन ओव्हरसीज बँक (IOB-Indian Overseas Bank) या दोन सरकारी बँकेत खाते आहे. तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण नुकतंच खासगीकरणासाठी नवी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात या दोन बँकांचीही नाव आहेत.
सीएनबीसी आवाजच्या वृत्तानुसार, निती आयोगाने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची यादी कोर ग्रुप ऑफ सेक्रेटरी ऑन इन्व्हेस्टमेंट डायवेस्टमेंट (CCD) कडे सादर केली आहे. या यादीत या दोन बँकांची नावे पुढे आली आहेत. ज्याचे सर्वप्रथम खाजगीकरण केले जाणार आहे.
मात्र अद्याप या दोन्ही बँकांची नावे अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात सार्वजनिक क्षेत्रातील 4 बँकांच्या खासगीकरणाबद्दल सांगितले आहे. याची यादी तयार करण्याची जबाबदारी निती आयोगाकडे देण्यात आली होती.
आता बँक बुडाल्यास 5 लाख रुपयांपर्यंतचे विमा कवच
bank-customeया दोन्ही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरण झाल्यानंतर त्याचा ग्राहकांवर काही विशेष परिणाम होणार नाही. या बँकेच्या सर्व सेवा पूर्वीप्रमाणे सुरु असतील. rs
यापूर्वी सरकारने आयडीबीआय बँकेचे खासगीकरण केले होते. ही बँक बर्याच काळापासून आर्थिक संकटाचा सामना करत होती. या आर्थिक अडचणींचा सामना करावा करण्यासाठी सप्टेंबर 2019 मध्ये भारतीय जीवन विमा महामंडळ (एलआयसी) आणि सरकारने यात 9,300 कोटी रुपयांची गुंतवणूक केली.