नवी दिल्ली : मार्च महिन्यात अनेक बँक संघटनांनी सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात दोन दिवस संप पुकारला आहे. हा संप 15 आणि 16 मार्च रोजी घेण्यात येणार आहे. संपामुळे बँका सलग चार दिवस बंद राहतील. 15 आणि 16 मार्च रोजी सोमवार आणि मंगळवार आहे. 14 मार्च हा रविवार असेल आणि 13 मार्च हा महिन्याचा दुसरा शनिवार असेल ज्यामुळे बँका बंद राहतील. अशा परिस्थितीत 13 ते 16 मार्च दरम्यान बँका सलग चार दिवस बंद राहतील. (bank strike privatisation bank will remain close from 13 to 16 march)
संपाबाबत कॅनरा बँकेने सांगितले की, त्याच्या कारभारावर परिणाम होऊ शकेल. कॅनरा बँकेच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, इंडियन बँक असोसिएशन IBA कडून माहिती मिळाली आहे की, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन म्हणजेच यूएफबीयूकडून 15 आणि 16 मार्च रोजी संप पुकारण्यात येत आहे. बँकेच्या ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणीचा सामना करु नये याची काळजी घेण्यात ते गुंतले आहेत.
कोणत्या बँक युनियनने संपाचे आयोजन
AIBEA, AIBOC, NCBE, AIBOA, BEFI, INBEF, IBOC, NOBW, NOBO आणि AINBOF या बँक संघटनेकडून संप आयोजित करण्यात आला आहे. 2021 च्या अर्थसंकल्पात सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँक आणि एक विमा कंपनीचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या देशात 12 सरकारी बँका आहेत. त्यानंतर त्यांची संख्या 10 वर जाईल. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये दोन बँकांचे खाजगीकरण केले जाईल. पुढील आर्थिक वर्षासाठी सरकारने निर्गुंतवणुकीचे आणि खासगीकरणाचे लक्ष्य 1.75 लाख कोटी रुपये ठेवले आहे.
या महिन्यात किती वेळा बँका बंद
या महिन्यात अनेक दिवस बँका असतील 11 मार्च ही महाशिवरात्री आहे. 16 मार्चनंतर 21 मार्चला रविवारची सुट्टी असेल. 22 मार्च हा बिहार दिन असून बँकांना सुट्टी असू शकते. चौथा शनिवार 27 मार्च आणि रविवारी 28 मार्च रोजी आहे. यामुळे सलग दोन दिवस बँका बंद राहतील. 29 मार्च रोजी होळीमुळे बँका बंद राहतील. (bank strike privatisation bank will remain close from 13 to 16 march)
संबंधित बातम्या –
Aadhaar Card : लहान मुलांचं आधार बनवायचं आहे तर वाचा संपूर्ण प्रोसेस
Gold rate today : आज पुन्हा स्वस्त झालं सोनं, पटापट वाचा ताजे दर
दरमहा फक्त 27 रुपये देऊन 2 लाख रुपयांचा विमा मिळवा; नेमकी योजना काय?
आता घर खरेदी करणं झालं स्वस्त, HDFC नेी गृह कर्जावर व्याजदर केलं कमी
(bank strike privatisation bank will remain close from 13 to 16 march)