Bank Workers Strike : बँकांच्या खासगीकरणाविरोधात कर्मचारी आक्रमक,बँका दोन दिवस बंद राहणार

बँक कर्मचाऱ्यांच्या (Bank Workers strike) विविध यूनियनकडून बँकांच्या खासगीकरणाविरोधात (Bank Privatization) 16 आणि 17 डिसेंबरला संप पुकारण्यात आला आहे.

Bank Workers Strike : बँकांच्या खासगीकरणाविरोधात कर्मचारी आक्रमक,बँका दोन दिवस बंद राहणार
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 2:03 PM

नवी दिल्ली: बँक कर्मचाऱ्यांच्या (Bank Workers strike) विविध यूनियनकडून बँकांच्या खासगीकरणाविरोधात (Bank Privatization) 16 आणि 17 डिसेंबरला संप पुकारण्यात आला आहे. या दोन दिवसांच्या देश पातळीवरील संपाच्या काळात बँकांचं कामकाज बंद राहणार आहे. बँक कर्मचाऱ्यांना बँक व्यवस्थापनाकडून संपावर न जाण्याच आवाहन करणयात आलं आहे. बँक कर्मचारी यूनियनने मात्र संपाची भूमिका कायम ठेवली आहे.

स्टेट बँकेचं कर्मचाऱ्यांना आवाहन

स्टेट बँक ऑफ इंडियानं कर्मचाऱ्यांना संपावर न जाण्याचं आवाहन केलं आहे. बँकेने कर्मचाऱ्यांनी कोरोना विषाणू संसर्गाची स्थिती पाहता ग्राहकांच्या हितासाठी संपावर न जाण्याचं आवाहन केलं आहे. एसबीआय कर्मचारी संघटनांना चर्चेच आवाहन केलं आहे. तर, सेंट्रल बँक ऑफ इंडियानं देखील कर्मचारी संघटनांना आपल्या ग्राहकांच्याहितासाठी काम करण्याचं आवाहन केलं आहे. तर, पंजाब नॅशनल बँकेनं कर्मचाऱ्यांना संपावर न जाण्याचं आवाहन केलं आहे.

संप थांबवण्याचा प्रयत्न

विविध माध्यमांनी दिलेल्या रिपोर्टनुसार बँकांचे प्रमुख, बँक असोसिएशन आणि बँक कर्मचारी यूनियन यांच्यात चर्चा सुरु आहे. बँक व्यवस्थापन सातत्यानं संप रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 2021 च्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी बँकांच्या खासगीकरणासंदर्भात बनवलेल्या कमिटीसंदर्भात बोलताना दोन बँकांचं खासगीकरण करणार असल्याचं म्हटलं होतं.  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी लोकसभेत बोलताना 2021-22 या आर्थिक वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांचं खासगीकरण करण्यात येणार असल्याचं म्हटलं होतं. कोणत्या बँकांचं खासगीकरण करायचं यासंदर्भातील निर्णय देखील बँक खासगीकरण समिती घेणार आहे.

इतर बातम्या:

Nirmala Sitharaman :अर्थसंकल्प 2022: अर्थव्यवस्थेला ‘पॅकेज’चा बूस्टर डोस; केंद्रीय अर्थमंत्र्यांचं दिल्लीत विचारमंथन

एसबीआयच्या ‘या’ दोन करंट अकाऊंटवर मिळतात चांगल्या सुविधा; व्यवसायिकांसाठी ऑफर्सची खैरात

Bank Workers call two days nationwide strike against center decision of privatization of banks

'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.