AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bank : बँक खात्यातून रक्कम झाली चोरी, चिंता कशाला? RBI च्या या नियमामुळे पूर्ण रक्कम येईल हाती

Bank : बँक खात्यातून रक्कम चोरी झाल्यास, या नियमामुळे तुम्हाला ही रक्कम मिळू शकते.

Bank : बँक खात्यातून रक्कम झाली चोरी, चिंता कशाला? RBI च्या या नियमामुळे पूर्ण रक्कम येईल हाती
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 24, 2022 | 11:46 PM

नवी दिल्ली : डिजिटल व्यवहार (Digital Transaction) सुरु झाल्यापासून ऑनलाईन फसवणुकीच्या (Online Fraud) घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सायबर भामटे नवनवीन क्लृप्त्या शोधत असल्याने अनेकदा फसवणुकीचे हे प्रकार लक्षात येत नाहीत. त्यामुळे अनेकदा काळजी घेऊन, सजग राहुनही आपण जाळ्यात ओढल्या जातो. खात्यातून रक्कम लंपास होते, बँक खाते (Bank Account) साफ होते. फसवणूक लक्षात आल्यानंतर पुढील पाऊले लवकर टाकल्यास, तुमची रक्कम परत मिळू शकते.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) अशा फसवणूक प्रकरणात नियम तयार केला आहे. त्यानुसार तक्रार दाखल करणाऱ्याला तात्काळ कारवाई करुन त्याची रक्कम पूर्ण करण्याची हमी देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण रक्कम परत मिळू शकते.

जर तुमच्या बँक खात्यातून अनधिकृत व्यवहार झाला असेल तर आता चिंता करण्याची गरज नाही. कारण आरबीआयचा नियम तुम्हाला मदत करु शकतो. बँक व्यवहारात फसवणूक झाल्यास तीन दिवसांत याविषयीची तक्रार दिल्यास, खातेदाराला त्याची रक्कम परत मिळते.

हे सुद्धा वाचा

भारतीय रिझर्व्ह बँकेने याविषयी एक सूचना जारी केली आहे. जर तुमच्या बँक खात्यातून रक्कम चोरी गेल्यास, तुम्ही तात्काळ बँकेला याची माहिती देणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमचे नुकसान टळते. अशा प्रकारात बँक खातेदाराला नुकसान भरपाई मिळवून देते. म्हणजे खातेदाराला संपूर्ण रक्कम मिळते.

ऑनलाईन फसवणुकीदरम्यान ग्राहकाला तीन दिवसांच्या आत याविषयीची माहिती द्यावी लागते. बँकेकडे वेळेच्या आत तक्रार केल्यास बँक तिचा पडताळा घेते. खातेदाराची काहीच चूक नसल्यास अथवा त्याच्याकडून कुठलाही निष्काळजीपणा झाला नसल्यास बँक त्याला नुकसान भरपाई मिळवून देते.

RBI नुसार, ग्राहकाने तीन दिवसांत फसवणुकीची तक्रार करणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढील 10 दिवसात त्याची रक्कम खात्यात हस्तांतरीत करण्यात येते. पण ग्राहकाने वेळेत तक्रार न दिल्यास त्याला नुकसान सहन करावे लागेल. ग्राहकाला 25,000 रुपयांपर्यंत नुकसान सहन करावे लागेल.

जर तुमचे झिरो बॅलन्स खाते असेल तर बँक 5000 रुपयांचे दायित्व स्वीकारते. म्हणजे खात्यातून 10,000 रुपयांचा अनधिकृत व्यवहार झाला तर तुम्हाला बँकेकडून केवळ 5,000 रुपये परत मिळतील.

अमेरिकाके पापाने वॉर रुकवा दिया क्या?, युद्धबंदीवर राऊतांची विखारी टीक
अमेरिकाके पापाने वॉर रुकवा दिया क्या?, युद्धबंदीवर राऊतांची विखारी टीक.
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल.
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच....
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त.
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?.
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा.
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर.
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस.