पुढील आठवड्यात बँका चार दिवस बंद; ‘या’ तारखांना असणार सुटी
सध्या देशात सणासुदीचा काळ आहे, त्यामुळे साहाजीक बँकांच्या सुट्यांमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. पुढील आठवड्यात देशातील प्रमुख सरकारी आणि खासगी बँका तब्बल 4 दिवस बंद राहणार आहेत.
नवी दिल्ली – सध्या देशात सणासुदीचा काळ आहे, त्यामुळे साहाजीक बँकांच्या सुट्यांमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. पुढील आठवड्यात देशातील प्रमुख सरकारी आणि खासगी बँका तब्बल 4 दिवस बंद राहणार आहेत. या महिन्यात आतापर्यंत बँकां एकूण 13 दिवस बंद राहिल्या आहेत. तर पुढील आठवड्यात सोमवारपासून आणखी चार दिवस बंद राहणार आहेत. याचाच अर्थ या महिन्यात बँकांना तब्बल 17 दिवस सुट्या होत्या. साधारणपणे नोव्हेंबर महिन्यात अनेक सण,उत्सव असतात. त्यामुळे या महिन्यात इतर महिन्यांच्या तुलनेत बँकांना अधिक सुट्या असतात.
आरबीआयकडून बँकांच्या सुट्यांचे नियमन
भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयकडून बँकांच्या सुट्यांबाबत एक लिस्ट जारी करण्यात येते, या लिस्टनुसार राज्यातील आणि देशातील बँकांच्या सुट्यांचे नियमन होत असते. बँकांच्या सुट्यांबाबत प्रत्येक राज्यांचे आपले वेगळे नियम असतात. त्यामुळे एखाद्या सणाला जर एखाद्या राज्यातील बँक बंद असेल तर दुसऱ्या राज्यातील बँकेला देखील सुटी असेलच असे नाही. त्यामुळे जर आपले बँकेत काही महत्त्वाचे काम असेल तर आपण आरबीआयकडून जाहीर करण्यात आलेली ही सुट्यांची लीस्ट चेक करून बँकेत जाऊ शकतो. त्यामुळे बँक बंद असल्यास आपला वेळ वाया जाणार नाही.
पुढील आठवड्यातील सुट्या
22 नोव्हेंबर कनकदास जयंती – कर्नाटकमध्ये सुटी 23 नोव्हेंबर सेंग कुत्नेम- शिलांग 27 नोव्हेंबर चौथा शनिवार 28 नोव्हेंबर रविवार
येत्या सोमवारपासून तब्बत चार दिवस बँक बंद राहणार असल्याने, जर बँकेत काही महत्त्वाचे काम असेल तर ते आपल्याला लवकरात लवकर करावे लागेल अन्यथा काम लांबणीवर पडू शकतो. बँकेत जाण्यापूर्वी आरबीआयने जारी केलेली सुट्यांची लिस्ट चेक करणे फायदेशीर ठरते. त्यामुळे आपल्याला बँक आज चालू राहणार आहे की, बंद आहे याची कल्पना येते. व आपला वेळही वाचतो.
संबंधित बातम्या
नवे कृषी कायदे रद्द झाल्याचा उद्योग क्षेत्राला फटका ; कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीचा ओघ कमी होणार?
‘या’ कंपनीने गुंतवणूकदारांना बनवले कोट्याधीश; 20 वर्षांमध्ये शेअर्सच्या किमतीत 650 टक्क्यांची वाढ