विजय माल्ल्याचे शेअर्स विकून बँकांना 792 कोटी मिळाले, 58 टक्के नुकसानाची झाली भरपाई
विजय माल्ल्याच्या नावावर असलेले काही शेअर्स विकून हे पैसे गोळा करण्यात आलेत.
नवी दिल्लीः भारतीय बँकांकडून जवळपास 9 हजार कोटींचं कर्ज घेऊन परदेशात परागंदा झालेला विजय मल्ल्याचे शेअर्स विकण्यात आलेय. कर्ज देणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) नेतृत्वात इतर बँकांच्या खात्यात आणखी 792 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आलेत. ही माहिती प्रवर्तन संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी दिली. विजय माल्ल्याच्या नावावर असलेले काही शेअर्स विकून हे पैसे गोळा करण्यात आलेत.
बँकेच्या फसवणुकीच्या प्रकरणातील 58 टक्के हानी वसूल
फरार उद्योजक नीरव मोदी, मेहुल चोकसी आणि मल्ल्या यांनी केलेल्या बँकेच्या फसवणुकीच्या प्रकरणातील 58 टक्के हानी वसूल झालीय, असा दावा ईडीने केलाय. विजय मल्ल्या प्रकरणात ईडीने एका निवेदनही प्रसिद्ध केलेय. किंगफिशर एअरलाईन्सच्या शेअर्सची विक्री एसबीआयच्या नेतृत्त्वात असलेल्या गटाकडे केल्यामुळे 792.11 कोटी रुपये वसूल झालेत. हे शेअर्स अंमलबजावणी संचालनालयाने एसबीआयच्या नेतृत्वाखालील कर्जदार बँकांना दिले.
PMLA अंतर्गत जप्त केले होते शेअर्स
हे शेअर्स ईडीने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार (PMLA) जप्त केले होते. गेल्या महिन्यात याच प्रकरणात बँकांच्या समूहाला समभाग विक्रीतून 7,181 कोटी रुपये मिळाले होते. ब्रिटनला पळून गेलेल्या मल्ल्याच्या आताच्या किंगफिशर एअरलाइन्सशी संबंधित 9,000 कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याची चौकशी ईडी आणि सीबीआय करीत आहेत.
माल्याच्या डोक्यावर 9000 कोटी कर्ज
अनेक बँकांकडून घेतलेल्या सुमारे 9,000 कोटी रुपयांचे कर्ज न फेडल्याचा आरोप विजय मल्ल्यांवर आहे. अंमलबजावणी संचालनालयाने 23 जून रोजी एसबीआयच्या नेतृत्त्वात असलेल्या बँकांना 6,624 कोटी रुपयांच्या यूबीएलचे शेअर्स हस्तांतरित केल्यानंतर कर्जवसुली न्यायाधिकरणाने (डीआरटी) 23 जून रोजी हे समभाग विकले. ईडीने हे शेअर्स प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट (पीएमएलए) अंतर्गत जोडले होते.
माल्ल्यानं यूके सुप्रीम कोर्टात जाण्याची परवानगी नाकारली
सध्या विजय मल्ल्याला लंडनमध्ये आहे, नीरव मोदी याला लंडन तुरुंगात आणि मेहुल चोक्सी याला डोमिनिका येथे अटक करण्यात आलीय. पीएमएलएचा तपास पूर्ण झाला असून, ईडीने तिघांवर गुन्हा दाखल केलाय. या तिघांना भारतात आणण्यासाठी ब्रिटन आणि अँटिगा-बार्बुडा यांना प्रत्यर्पण विनंत्या पाठविण्यात आल्यात. माल्ल्याच्या प्रत्यार्पणाला वेस्टमिन्स्टर कोर्टाने मान्यता दिलीय. याला यूके हायकोर्टानेही मान्यता दिली. माल्ल्याला यूके सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही, त्यामुळे लवकरच त्यांना भारतात आणले जाईल.
संबंधित बातम्या
Gold Rate Today: सोन्याच्या किमतीत घसरण; उच्च स्तरापासून अजूनही 7,945 रुपयांनी स्वस्त, पटापट तपासा
रिलायन्सचा आणखी एक मोठा पराक्रम; Just Dialची 41% भागीदारी 3,497 कोटीत खरेदी
Banks earned Rs 792 crore by selling Vijay Mallya’s shares, compensating for 58 per cent of the losses