Payment Market : पेमेंट मार्केटमध्ये चढाओढ, QR कोडमुळे ग्राहकांचा असा फायदा

Payment Market : सध्या भारतीय पेमेंट मार्केटमध्ये रोज प्रचंड घडामोडी घडत आहेत. युपीआय पेमेंटमुळे जगातील सर्वात मोठी आर्थिक घाडमोड भारतात होत आहे. फिनटेक कंपन्यांना टक्कर देण्यासाठी QR कोडसह बँकांही मैदानात उतरल्या आहेत..

Payment Market : पेमेंट मार्केटमध्ये चढाओढ, QR कोडमुळे ग्राहकांचा असा फायदा
Follow us
| Updated on: Jun 22, 2023 | 7:02 PM

नवी दिल्ली : भारताने युपीआय पेमेंटमध्ये (UPI Payment) उत्तुंग भरारी घेतली आहे. ऑटोवाला, भाजीवाला ते थेट फाईव्ह स्टार हॉटेल असू द्या, सर्वत्रच युपीआय पेमेंटचे प्रचलन वाढले आहे. प्रत्येक ठिकाणी क्यूआर कोड स्कॅन करुन तात्काळ रक्कम हस्तांतरीत होत आहे. अनेक दुकानदारांकडे पेटीएम, फोन पे, गुगल पे या फिनटेक कंपन्यांचे QR कोड अथवा साऊंड बॉक्स सहज सापडतो. खेड्यापाड्यात वस्तू विक्री करायला आलेल्या छोट्या व्यापाऱ्यांकडे पण या कोडच्या पाट्या सहज दिसून येत आहे. जलद पेमेंटचे युग आले आहे. पण यामुळे पेमेंट मार्केटमध्ये गळेकापू स्पर्धा सुरु झाली आहे. फिनटेक कंपन्यांविरोधात बँका (Fintech Companies Vs Banks) असा सामना रंगला आहे. त्याचा ग्राहकांना मात्र फायदा होत आहे.

बँकांनी आणले क्यूआर कोड युपीआयच्या वाढत्या लोकप्रियतेचा बँकांना पण फायदा उठवायचा आहे. फिनटेक कंपन्यांकडेच सर्व वर्ग वळल्याने बँकांसमोर मोठा प्रश्न उभा ठाकला होता. त्यावर बँकांनी तोडगा काढला. बँकांनी त्यांचे क्यूआर कोड तयार केले आहेत. बँका पण फिनटेक कंपन्यांसारखी सेवा देण्यास सज्ज झाल्या आहेत. बँकांनी ही सिस्टम लगेचच आत्मसात केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील, खासगी क्षेत्रातीलच नाही तर पतसंस्थांनी पण त्यांचे क्यूआर कोड आणले आहेत.

पीओएस मशीनचा वापर काय बँका पूर्वी व्यवहारासाठी पीओएस (POS) मशीनचा वापर करत होत्या. पण अत्यंत जलद अशा QR कोड सेवेमुळे बँकांचे धाबे दणाणले. कारण पीओएस मशीनसाठी डेबिट कार्डची गरज होती. बँकांना वाटत होते की, क्रेडिट-डेबिट कार्डचा वापर करुन चालू खातेदार बँकेशी जोडलेली राहतील. पण नव्या पेमेंट सिस्टिमने हा समज बाद केला. त्यामुळे बँकांना स्वतःचे QR कोड आणावे लागले. मर्चेंट ॲपच्या माध्यमातून बँकिंग व्यवहारांना गती मिळाली. पीओएस मशिनवर व्यवहार करण्यास मर्यादा येत होती. पण क्यूआर कोडच्या मदतीने झटपट व्यवहार होऊ लागले. रोजच्या व्यवहाराचा टप्पा कित्येक पटीने बदलला.

हे सुद्धा वाचा

बँका का आणत आहेत स्वतःचे ॲप त्यामुळेच अनेक बँका आता स्वतःचे ॲप विकसीत करुन ग्राहकांना डाऊनलोड करण्यास भाग पाडत आहेत. स्वतःचे ॲप असल्याने फिनटेक कंपन्यांना या सेवांसाठी बँकांना पैसा द्यावा लागत नाही. बँकांचा तेवढा पैसा वाचत आहे. तसेच ग्राहकही बँकेशी कायमचा जोडला जात आहे. बँकेकडे कस्टमर डेटा वाढला आहे.

महाशक्तीशाली आकडे ॲक्सिस बँकेचं इन्स्टाबिज ॲप्लिकेशन असो अथवा HDFC चे व्यापार ॲप, बँका या ॲपच्या माध्यमातून जास्तीत जास्त व्यापारी, लघु-मध्यम उद्योजक, कर्जदार यांच्याशी जोडू पाहत आहे. ICICI बँकेच्या ॲपवर 1.5 दशलक्ष ॲक्टिव यूझर्स आहेत. फिनटेक कंपनी पेटीएमने मार्च तिमाहीत 2,313 कोटी रुपयांचं कर्ज वाटप केले आहे.

ग्राहकांचा फायदा तात्काळ कर्ज प्रक्रिया होत आहे. कमी कागदपत्रांआधारे कर्ज मिळत आहे. डोअर स्टेप बँकिंगची सुविधा ग्राहकांना मिळत आहे. छोट्या पेमेंटसाठी पिनचा वापर करावा लागत नाही. बँकांनी ॲपच्या माध्यमातून अनेक सोयी-सुविधा पुरविल्याने बँकेत चकरा मारण्याचा त्रास वाचला आहे. बँका आता त्यांचे इतर उत्पादने पण विक्री करत असल्याने ग्राहकांसमोर भरपूर आर्थिक पर्याय उपलब्ध झाले आहेत. जलद सेवांमुळे ग्राहकांचा वेळ आणि पैसा वाचत आहे.

'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.
'राहुल गांधींची जीभ छाटू नये, जिभेला चटके..',भाजप खासदाराची जीभ घसरली
'राहुल गांधींची जीभ छाटू नये, जिभेला चटके..',भाजप खासदाराची जीभ घसरली.
बहिणींनंतर आता भाऊही लाडके... अजितदादांच्या 'त्या' जाहिरातीची एकच चर्च
बहिणींनंतर आता भाऊही लाडके... अजितदादांच्या 'त्या' जाहिरातीची एकच चर्च.
महायुती-मविआत चर्चा सुरू, जागांवरून रस्सीखेच, कोण-कुठे मोठा भाऊ?
महायुती-मविआत चर्चा सुरू, जागांवरून रस्सीखेच, कोण-कुठे मोठा भाऊ?.
गुडघे टेकायला लावणार की आयुष्यात पश्चाताप..,जरांगेंचा फडणवीसांना इशारा
गुडघे टेकायला लावणार की आयुष्यात पश्चाताप..,जरांगेंचा फडणवीसांना इशारा.
लालबाग राजाला २५ तासानंतर जड अंतःकरणाने निरोप, गिरगाव चौपाटीवर विसर्जन
लालबाग राजाला २५ तासानंतर जड अंतःकरणाने निरोप, गिरगाव चौपाटीवर विसर्जन.
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.