Bank Holidays November 2021: नोव्हेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद राहणार, शाखेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी तपासा
आरबीआयने जारी केलेल्या बँक सुट्ट्यांच्या यादीनुसार, आपण आपल्या बँकेशी संबंधित कामाचा निपटारा करावा. यासह आपण शाखेत जाणे आणि कामात अडथळा येण्यासारखे समस्या टाळू शकता. नोव्हेंबर महिन्याची सुरुवात कन्नड राज्योत्सवाने होत आहे. त्यामुळे 1 नोव्हेंबर 2021 रोजी बंगळुरू आणि इम्फाळमधील बँका बंद राहतील.
नवी दिल्ली : देशात सणांसह नोव्हेंबरची सुरुवात होत आहे. अशा स्थितीत बहुतांश विभागांना सुट्टी असणार आहे. यात भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बँकांच्या सुट्ट्यांची यादी (Bank Holidays in November 2021) देखील जाहीर केलीय. नोव्हेंबर 2021 मध्ये धनत्रयोदशी, दिवाळी, भाई दूज, छठ पूजा आणि गुरु नानक जयंती यांसारख्या मोठ्या सणांसह एकूण 17 दिवस बँकांमध्ये सामान्य कामकाज होणार नाही. मात्र, या 17 दिवसांच्या सुट्ट्या देशभरातील बँकांमध्ये एकत्र दिल्या जाणार नाहीत. काही राज्यांमध्ये तेथे साजरे होणारे सण आणि उत्सव यावर अवलंबून अतिरिक्त सुट्ट्या असतील. आरबीआय दर महिन्याला सुट्ट्यांची संपूर्ण यादी प्रसिद्ध करते. कोणत्या राज्यात बँका केव्हा बंद होतील ते जाणून घेऊया.
?निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्यांतर्गत 11 दिवसांची सुट्टी
बँकेच्या ग्राहकांना शाखेशी संबंधित महत्त्वाच्या कामांना सामोरे जावे लागत असेल, तर ते या महिन्यात करण्याची आवश्यकता आहे. आरबीआयने 1, 3, 4, 5, 6, 10, 11, 12, 19, 22 आणि 23 नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर केलीय. याशिवाय नोव्हेंबरमध्ये 4 रविवार आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी देशभरात बँकांना सुट्टी असेल.
?आताच बँकेच्या शाखेशी संबंधित महत्त्वाची कामे करा
आरबीआयने जारी केलेल्या बँक सुट्ट्यांच्या यादीनुसार, आपण आपल्या बँकेशी संबंधित कामाचा निपटारा करावा. यासह आपण शाखेत जाणे आणि कामात अडथळा येण्यासारखे समस्या टाळू शकता. नोव्हेंबर महिन्याची सुरुवात कन्नड राज्योत्सवाने होत आहे. त्यामुळे 1 नोव्हेंबर 2021 रोजी बंगळुरू आणि इम्फाळमधील बँका बंद राहतील. यानंतर 3 नोव्हेंबरला नरक चतुर्दशीला फक्त बंगळुरूमध्ये बँकांमध्ये सामान्य कामकाज होणार नाही. 7, 14, 21 आणि 28 नोव्हेंबरला रविवारी देशभरात बँकांना सुट्टी असेल. त्याचबरोबर 13 नोव्हेंबरला दुसरा शनिवार आणि 27 नोव्हेंबरला चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
?चला सुट्टीची उर्वरित यादी पाहू या…
? दिवाळी पूजेच्या निमित्ताने 4 नोव्हेंबरला बंगळुरूवगळता सर्व राज्यांमध्ये बँका बंद राहतील. ? अहमदाबाद, बेलापूर, बंगळुरू, डेहराडून, गंगटोक, जयपूर, कानपूर, लखनौ, मुंबई आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी म्हणजेच 5 नोव्हेंबरला गोवर्धन पूजेच्या दिवशी बँका बंद राहतील. ? गंगटोक, इम्फाळ, कानपूर, लखनौ आणि शिमला येथे 6 नोव्हेंबर रोजी भाई दूज, चित्रगुप्त जयंती, निंगोल चकोबा या दिवशी बँकांमध्ये सामान्यपणे काम होणार नाही. ? पाटणा आणि रांचीमध्ये 10 नोव्हेंबरला छठपूजेनिमित्त बँका बंद राहणार आहेत. त्याचवेळी 11 नोव्हेंबर रोजी छठ पूजेच्या निमित्ताने पाटण्यात बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही. ? 12 नोव्हेंबरला वांगला उत्सवानिमित्त शिलाँगमधील सर्व बँका बंद राहतील. ? 19 नोव्हेंबरला गुरुनानक जयंती आणि कार्तिक पौर्णिमेला आयझॉल, बेलापूर, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील. ? 22 नोव्हेंबरला कनकदास जयंतीला बंगलोरमध्ये बँका सुरू नसतील. ? 23 नोव्हेंबरला सेंग कुत्स्नमच्या निमित्ताने शिलाँगमधील बँका बंद राहतील.
संबंधित बातम्या
BPCL च्या खासगीकरणात अडथळा, बोली लावणाऱ्या कंपन्यांना सहयोगीच मिळत नाहीत
Air India आता झाली टाटांची, 18 हजार कोटींमध्ये करार, शेअर परचेज करारावर स्वाक्षरी