Bank Holiday May : मे महिन्यात इतक्या दिवस बँकांना टाळे! वाट कसली पाहता, पटकन उरकून घ्या कामे

Bank Holiday May : पुढील महिन्यात बँकांना अनेक दिवस सुट्यात आहेत. त्यामध्ये शनिवार-रविवार धरल्यास हा आकडा जवळपास दोन आठवड्याच्या घरात जाईल. त्यामुळे बँकेत तुमचे काही काम बाकी असेल तर झटपट उरकून घ्या.

Bank Holiday May : मे महिन्यात इतक्या दिवस बँकांना टाळे! वाट कसली पाहता, पटकन उरकून घ्या कामे
Follow us
| Updated on: Apr 26, 2023 | 4:32 PM

नवी दिल्ली : देशातील सर्व बँकांच्या सुट्यांचे कॅलेंडर (Bank Holiday Calendar) जाहीर झालेले आहे. त्यामुळे पुढील महिन्यात बँकांना अनेक दिवस सुट्या आहेत. बँकिंग हॉलिडे कॅलेंडरनुसार मे महिन्यात राज्य आणि राष्ट्रीय सुट्यांची रेलचेल आहे. त्यात शनिवारी, रविवार जोडल्यास जवळपास दोन आठवड्यांच्या घरात हा सुट्यांचा कालावधी जातो. मे महिन्याची (Month Of May) सुरुवातच सुट्टीने होत आहे. या दिवशी कामगार दिन आणि महाराष्ट्र राज्य दिवस असल्याने सुटी आहे. त्यापूर्वी शनिवार, रविवार येत असल्याने एप्रिल महिन्याचे शेवटचे दोन दिवस आणि मे महिन्यातील पहिला दिवस अशा सलग तीन दिवस सुट्यांचा पडाव आहे.

देशभरात एकदाच नाही सुट्टी पण संपूर्ण भारतात एकाच दिवशी सगळ्याच बँका बंद राहतील असे नाही. काही भागात सुट्टी असली तरी इतर राज्यात मात्र त्यादिवशी कामकाज सुरु राहिल. त्यामळे बँकेसंबंधी काही कामकाज असेल तर त्वरीत उरकून घ्या. RBI द्वारे बँकांना सुट्टी जाहीर करण्यात येते. पण सर्वच राज्यातील बँकांना एकाच दिवशी सुट्या नसतात. काही राज्यातच बँका बंद असतात. पण मोठ्या सणाला, राष्ट्रीय सणाला मात्र सर्वच बँकांना सुट्टी असते.

व्यवहार करता येणार बँकेला सुट्टी असली की शटर डाऊन असते, अर्थात बँकिंगचे काम पूर्णपणे थांबत नाही. ऑनलाइन बँकिंग सेवा पूर्वीप्रमाणेच चालू राहील आणि आपण सुट्टीच्या दिवशी ही आपले काम हाताळू शकता. पण ग्राहकांना बॅंकेच्या शाखेत जाऊन त्यांचे पैसे जमा करता येणार नाहीत किंवा शाखेतून पैसे काढता येणार नाहीत. परंतु एटीएममध्ये अशा सेवा उपलब्ध राहतील. ऑनलाईन बँकिंग सेवा, एटीएम आणि मोबाइल बँकिंग सुरू राहील. काही शहरांमध्ये विशिष्ट दिवशी सर्व बँका एकाच वेळी बंद राहतील. तर क्रेडिट, डेबिट कार्ड आणि युपीआयचा वापर करुन ऑनलाईन पेमेंट करता येईल.

हे सुद्धा वाचा

मे 2023 मध्ये इतक्या दिवस बँकांना सुट्टी

  1. 1 मे – मे दिवस/महाराष्ट्र दिन – आसाम, बिहार, गोवा, कर्नाटक, केरळ, मणिपूर, पुडुचेरी, तेलंगणा, तामिळनाडू, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल
  2. 5 मे – बुद्ध पौर्णिमा– दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, आसाम, बिहार, गुजरात, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड
  3. 7 मे – रविवार – सार्वजनिक सुट्टी
  4. 9 मे – रवींद्रनाथ टागोर यांचा वाढदिवस, पश्चिम बंगालमध्ये बँका बंद राहतील.
  5. 13 मे – दुसरा शनिवार – सार्वजनिक सुट्टी
  6. 14 मे – रविवार –सार्वजनिक सुट्टी
  7. 16 मे राज्यत्व दिन – सिक्कीम
  8. 21 मे – रविवार – सार्वजनिक सुट्टी
  9. 22 मे – महाराणा प्रताप जयंती – हिमाचल प्रदेशात बँका बंद राहतील.
  10. 27 मे – चौथा शनिवार – सार्वजनिक सुट्टी
  11. 28 मे – रविवार – सार्वजनिक सुट्टी

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.