IPO Market : नवीन आर्थिक वर्षात कमाईच्या दमदार संधी, आयपीओत आजमावा नशीब

IPO Market : नवीन आर्थिक वर्षात गुंतवणूकदार मालामाल होणार. त्यांना कमाईच्या अनेक दमदार संधी मिळणार आहेत. आयपीओत नशीब आजमावता येईल.

IPO Market : नवीन आर्थिक वर्षात कमाईच्या दमदार संधी, आयपीओत आजमावा नशीब
Follow us
| Updated on: Mar 30, 2023 | 8:19 PM

नवी दिल्ली : शेअर बाजारात घसरणीचे सत्र (Share Market Fall) सुरु असताना या नवीन आर्थिक वर्षात कमाईच्या अनेक संधी पण मिळणार आहेत. आयपीओ बाजारात (IPO Market) गेल्या वर्षात गुंतवणूकदारांच्या हाती फारसे काही लागले नाही. गेल्या काही महिन्यात तर अगदी बोटावर मोजण्या इतकेच आयपीओ येऊन धडकले होते. पण त्यातही गुंतवणूकदारांनी रस घेतला नाही. पण यंदा आयपीओ बाजारात मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. आयपीओ बाजारात अनेक दिग्गज कंपन्या येणार आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना कमाईची संधी मिळेल. त्यांना नशीब आजमावता येईल. या नवीन आर्थिक वर्षात जवळपास 54 कंपन्या आयपीओ आणण्याच्या तयारीत आहेत.

चालू आर्थिक वर्षात काय झाले

चालू आर्थिक वर्षात, 2022-23 मध्ये एकूण 38 कंपन्यांनी त्यांचे आयपीओ आणले होते. त्यातून त्यांनी एकूण 52,600 रुपये जमा केले होते. या 38 कंपन्यांमधून केवळ दोन शेअर 50-50 टक्क्यांपेक्षा अधिक प्रीमियम सह बाजारात सूचीबद्ध झाले. ड्रीमफॉल्क्स सर्व्हिसेसचा (Dreamfolks Services) शेअर 55 टक्के तर इलेक्ट्रॉनिक्स मार्क इंडियाचा (Electronics Mark India) शेअर 52 टक्के प्रीमिअमसह या यादीत नोंदवल्या गेला. यावर्षी एलआयसीच्या आयपीओने गाजावाजा केला खरा पण गुंतवणूकदारांच्या पदरात काय पडलं हे सर्वांनाच माहिती आहे.

हे सुद्धा वाचा

फायदा कमी, नुकसानच जास्त

या आर्थिक वर्षात यादीतील काही आयपीओने फायद्या सोडा, नुकसानच जास्त केले. तर काहींनी जोरदार कामगिरी केली. यातील हरिओम पाईप इंडस्ट्रीज (Hariom Pipe Industries) आणि व्हिनस ट्यूब्स आणि पाईप्सचे (Venus Tubes and Pipes) शेअर मल्टिबॅगर ठरले. हरिओम पाईप इंडस्ट्रीजने जवळपास 225 टक्के आणि व्हिनस ट्यूब्स आणि पाईप्सने गुंतवणूकदारांना जवळपास 125 टक्के परतावा दिला.

यांनी तर बुडवले

बाकी इतर खेळाडू सूपर फ्लॉप ठरले. त्यांनी गुंतवणूकदारांना खड्यात ढकलले. एलआयसी, उमा एक्सपोर्ट्स (Uma Exports) आणि एलिन इलेक्ट्रॉनिक्स (Elin Electronics) या शेअर्सनी तर गुंतवणूकदारांचे तोंडचे पाणी पळवले. चालू आर्थिक वर्षात या शेअर्सनी आयपीओच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची घोर निराशा केली. त्यांचे जवळपास 40-40 टक्के नुकसान झाले.

इतक्या कंपन्या यावर्षी मैदानात

1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होत आहे. अनेक कंपन्याचे आयपीओ बाजारात दाखल होणार आहेत. 2023-24 या आर्थिक वर्षात 54 कंपन्या आयपीओ घेऊन येत आहे. त्यामुळे बाजारात गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी मिळणार आहे. या 54 कंपन्यांना आयपीओ आणण्यासाठी सेबीने परवानगी दिली आहे. या कंपन्या बाजारातून 76,189 कोटी रुपये जमा करण्याच्या प्रयत्नात आहेत. याशिवाय अजून 19 इतर कंपन्या प्रतिक्षेत आहेत. या कंपन्या सेबीकडून मंजूरी मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. या कंपन्या 32,940 कोटी रुपये जमा करण्याच्या तयारीत आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.