Rakesh Jhunjhunwala : जिगरा आहे ना, मग व्हा राकेश झुनझुनवाला!

Rakesh Jhunjhunwala : राकेश झुनझुनवाला यांचा पोर्टफोलिओ पाहून प्रत्येकाला त्यांचा हेवा वाटतो. पण जिगरा मोठा असला की, तुम्हाला पण राकेश झुनझुनावाला होता येईल.

Rakesh Jhunjhunwala : जिगरा आहे ना, मग व्हा राकेश झुनझुनवाला!
Follow us
| Updated on: Apr 28, 2023 | 8:22 PM

नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारातील बिग बुल म्हणजे राकेश झुनझुनवाला. त्यांना प्रत्येक गुंतवणूकदार ओळखतच नाही तर प्रत्येकाला राकेश झुनझुनावाला (Rakesh Jhunjhunwala) व्हायचे असते. बिग बुल हे केवळ चांगले गुंतवणूकदारच नव्हते तर दुसऱ्या गुंतवणूकदारांसाठी प्रेरणास्थान पण होते. त्यांनी अनेक गुंतवणूकदारांना मार्गदर्शन केले. बाजारातील (Share Market) काही युक्त्या, कानमंत्र दिला. राकेश झुनझुनावाला यांच्याकडे तीन अशा गोष्टी होत्या, ज्याच्या आधारे त्यांनी बाजारात मोठी झेप घेतली. त्यांचा हा कानमंत्र तुम्ही ऐकलात, तर तुम्ही पण राकेश झुनझुनवाला होऊ शकतात.

बाजारातील चढउतार शेअर बाजारात गुंतवणूकदारांसाठी राकेश झुनझुनवाला एक चालतं बोलतं विद्यापीठ आहे. पण असं असले तरी बिग बुल दररोज होमवर्क करत. ते रोज बाजाराचा अभ्यास करत, अंदाज बांधत, त्यानंतर गुंतवणुकीचा निर्णय घेत. प्रत्येक निर्णय योग्यच ठरला असं नाही. या चुकातून ते पण शिकले. 1989 ते 1992 या कालावधीत त्यांना जोरदार परतावा मिळाला. पुन्हा 2003 ते 2007 याकालावधीत चांगला फायदा मिळाला. पण 1994 ते 1999 हा काळ त्यांच्यासाठी अत्यंत कठिण गेला. त्यांना परतावाच मिळाला नाही. पण त्यांनी गुंतवणूक थांबवली नाही. गुंतवणूक सुरुच होती आणि स्ट्रॅटर्जीपण.

अधिक परताव्यासाठी हवा संयम शेअर बाजारात अधिक परतावा हवा असेल तर संयम आणि धैर्य असणे अत्यंत गरजेचे आहे. एके काळी, जेके ग्रुप, मोहनलाल ग्रुप, थापर ग्रुप हे बाजारातील बादशाह होते. त्यानंतर सार्वजनिक क्षेत्राती कंपन्यांची मक्तेदारी आली. पण बाजारात चढउतार होत राहिला. कधी नरम तर कधी जोरदार उसळी, हा बाजाराचा स्वभाव आहे. त्यामुळे तुमच्या गुंतवणुकीला मोठा फटका बसतो तर कधी लॉटरी लागते. पण तुम्ही धैर्य ठेवले तर दीर्घकाळात तुम्हाला नक्कीच चांगला परतावा मिळतो. काहींना 40 वर्षांत परतावा मिळाला. त्यांचे 100 रुपये आज 44 हजार रुपये झाले आहेत. पण त्यासाठी धैर्य ठेवणे आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा

बाजारात ओहोटी आली तर पळू नका शेअर बाजारात दररोज भरती-ओहोटी येते. बाजाराचा तो मूळ स्वभाव आहे. कधी कधी पंधरा दिवस बाजारातून फायदा होत नाही. चांगला परतावा मिळत नाही. बाजार पडलेले असते, तेव्हा बाजारातून पळ काढू नका. बाजारातून लगेचच पैसा काढण्याची घाई करु नका. गुंतवणूक करतानाच ती विविध ठिकाणी आणि वेगवेगळ्या फॉर्ममध्ये केल्यास तुम्हाला एकदम फटका बसत नाही. त्यामुळे ज्या दिवशी बाजार कोसळतो, त्यादिवशी बाजारातून पळ काढू नका. त्यातून शिका, काय चूक झाली आणि काय करता आले, अशा पडत्या काळात कोणत्या गुंतवणूकदारांना फायदा झाला. त्यांनी काय स्ट्रॅटर्जी उपयोगात आणली याचा अभ्यास करा. नक्कीच फायदा होईल.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.