Loan guarantor : कर्जाचा गॅरंटर होणं सोपं नाही; …तर तुम्हाला फेडावे लागेल कर्ज , जाणून घ्या सर्व नियम

जर एखाद्या व्यक्तीला बँकेतून (Bank) लोन (loan) घ्यायचे असेल तर त्याला गॅरंटची ( Loan guarantor) आवश्यकता असते. हमीदार असल्याशिवाय कोणत्याही बँकेतून लोन मिळत नाही.

Loan guarantor : कर्जाचा गॅरंटर होणं सोपं नाही; ...तर तुम्हाला फेडावे लागेल कर्ज , जाणून घ्या सर्व नियम
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 8:01 AM

जर एखाद्या व्यक्तीला बँकेतून (Bank) लोन (loan) घ्यायचे असेल तर त्याला गॅरंटची ( Loan guarantor) आवश्यकता असते. हमीदार असल्याशिवाय कोणत्याही बँकेतून लोन मिळत नाही. मग कर्जाची आवश्यकता असलेल्या व्यक्तींकडून गॅरंटरचा शोध घेतला जातो. मात्र हमीदार होण्यासाठी किंवा कोणाच्या कर्जाची हमी घेण्यासाठी अनेक नियमांचे पालन करावे लागते. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या कर्ज परतफेडीची हमी घेणार असाल तर तुम्हाला देखील अनेक कागदपत्रांवर सह्या कराव्या लागतात. मात्र अनेकांना गॅरटंर होणे म्हणजे एक औपचारिकता वाटत असते. परंतु जर कर्ज घेणाऱ्या व्यक्तीने कर्जाची परतफेड न केल्यास तुम्हाला देखील कर्जदाता बँकेची नोटीस येऊ शकते. त्यामुळे कोणाच्या कर्जाची हमी घेण्यापूर्वी त्याबाबतचे सर्व नियम समजून घेणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जाणून घेऊयात गॅरंटरच्या नियमांबाबत.

…तर गॅरंटरला करावी लागते कर्जाची परतफेड

बँक किंवा कोणतीही वित्तासंस्था कोणत्याही व्यक्तीला गॅरंटरशिवाय कर्ज देत नाही. त्यामुळे गॅरंटवर मोठी जबाबदारी असते. जर कर्ज घेणाऱ्याने कर्जाची परतफेड न केल्यास गॅरंटरला बँकेच्या वतीने नोटीस पाठवली जाते आणि कर्जाची परतफेड करण्यात सांगितले जाते. अशा स्थितीमध्ये गॅरंटरला कर्जाची परतफेड करावी लागते.

बरोबरीचा कर्जदार

कोणतीही बँक किंवा वित्तसंस्था गॅरंटरशिवाय कर्ज देत नाही. एखाद्या कर्जाची गॅरंटी घेणे म्हणजे त्या व्यक्तीसोबत तुम्ही देखील बँकेचे कर्जदार असल्यासारखे आहात. जर कर्जदाराने कर्जाची परतफेड केली नाही तर बँकेच्या वतीने गॅरंटकडून कर्जाची वसुली केली जाते. त्यासाठी रितसर गॅरंटला नोटीस पाठवण्यात येते.

हे सुद्धा वाचा

गॅरंटरची आवश्यकता का असते?

बँका प्रत्येक लोनसाठीच गॅरंटर शोधत नाहीत. एखाद्या व्यक्तीने लोनसाठी अर्ज केला असेल आणि त्याचे कागदपत्र तपासताना बँकेला असे वाटले की हा व्यक्ती कर्जाची परतफेड करू शकणार नाही तर अशा व्यक्तीला गॅरंटरबाबत विचारणा होते. तसेच जी मोठ्या रकमेची कर्ज असतात त्याला देखील गॅरंटरची आवश्यकता असते.

संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.