AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO च्या कोट्यवधी सदस्यांना मोठा दिलासा, आता झटपट करा हे काम, नाहीतर होईल नुकसान

कर्मचाऱ्यांना लवकरच एटीएममधून पीएफचा पैसा काढण्याची सुविधा देण्यात येणार आहे. सध्या तांत्रिक कारणासाठी वा इतर कारणांमुळे पेन्शन दावा फेटाळण्याचे प्रकार वाढले आहेत. तर आता असा दिलासा देण्यात आला आहे.

EPFO च्या कोट्यवधी सदस्यांना मोठा दिलासा, आता झटपट करा हे काम, नाहीतर होईल नुकसान
ईपीएफओ
| Updated on: Dec 22, 2024 | 2:26 PM
Share

EPFO UAN Activation : ईपीएफओच्या कोट्यवधी सदस्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जुलै महिन्यात पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एक नवीन रोजगार लिंक्ड इन्सेटिव्ह (ELI) योजनेची घोषणा केली होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी UAN सक्रिय (Activation) आणि बँक खात्याला आधारशी जोडणे अनिवार्य आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (EPFO) कोट्यवधी सदस्यांना आता आनंदवार्ता आली आहे.

आता या दोन्ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 15 जानेवारी, 2025 रोजीपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. ही अंतिम मुदत या दोन महिन्यात दोनदा वाढवण्यात आली. यापूर्वी 30 नोव्हेंबर, 2024 आणि 15 डिसेंबर, 2024 रोजीपर्यंत मुदत होती. ती आता पुढील 15 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (UAN) सक्रिय असणे आणि बँक खाते आधार कार्डशी जोडणे बंधनकारक केले आहे.

का आहे गरजेचे?

मंत्रालयच्या माहितीनुसार, ईपीएफओने प्रत्येक सदस्याला आधार कार्डशी युनिव्हर्सल अकाऊंट क्रमांक जोडणे आवश्यक आहे. पोर्टलवर लॉगिन सक्रिय करण्यासाठी सिंगल विंडोची सुविधा देण्यात आली आहे. त्यात पीएफ पासबुक पाहणे, डाऊनलोड करण्याची क्षमता, रक्कम काढणे यासाठी ऑनलाईन दावा करण्याची सुविधा मिळते. तुमचे प्रोफाईल अपडेट करता येते. ही प्रक्रिया अजून सुटसुटीत करता येते. आधार कार्डच्या आधारे ओटीपीच्या प्रयोगाने ही प्रक्रिया पूर्ण करता येते.

ATM माध्यमातून पीएफ काढा

कर्मचाऱ्यांना लवकरच एटीएममधून पीएफचा पैसा काढण्याची सुविधा देण्यात येणार आहे. सध्या तांत्रिक कारणासाठी वा इतर कारणांमुळे पेन्शन दावा फेटाळण्याचे प्रकार वाढले आहेत. या सर्व प्रकाराना आळा घालण्यासाठी हे पाऊल टाकण्यात येणार आहे. पीएफ खात्याकडून कर्मचार्‍यांना हे एटीएम कार्ड देण्यात येईल. ते कुठल्याही एटीएम कार्डमध्ये वापरता येईल. रक्कम काढता येईल. त्याचा वापर, त्याची मर्यादा याविषयीची कुठलीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

12 टक्क्यांची मर्यादा हटवणार

सरकार पीएफ खात्यातील योगदानासाठी सध्या असलेली 12 टक्क्यांची मर्यादा हटवण्याचा विचार करत आहे. कर्मचार्‍याला त्याच्या बचतीच्या सवयीनुसार पीएफ खात्यात बचतीचा पर्याय देण्यात येईल. त्यामुळे कर्मचारी त्याच्या मनाने कितीही टक्के योगदान जमा करण्यास पात्र असेल. पण त्याच्या पगारानुसार हे योगदान त्याला जमा करता येणार आहे. पगार इतके योगदान त्याला जमा करता येणार नाही.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.