रतन टाटा यांचा वारसदार ठरला; टाटा कुटुंबातील ही व्यक्ती ‘अध्यक्ष’ पदी

Ratan Tata Successor : रतन टाटा यांचे बुधवारी निधन झाले. गुरुवारी त्यांच्यावर वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. आज संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत टाटा ट्रस्टचा पुढील वारस नेमण्यात आला. रतन टाटा यांचा उत्तराधिकारी कोण याचे उत्तर मिळाले.

रतन टाटा यांचा वारसदार ठरला; टाटा कुटुंबातील ही व्यक्ती 'अध्यक्ष' पदी
टाटा ट्रस्टची धुरा आता या Tata वर
Follow us
| Updated on: Oct 11, 2024 | 2:23 PM

दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टमध्ये त्यांचा उत्तराधिकारी निवडण्यात आला. शक्यतेप्रमाणे रतन टाटा यांचे बंधू नोएल टाटा यांची निवड झाली. नोएल हे पूर्वीच सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि टाटा ट्रस्टमध्ये विश्वस्त आहेत. या ट्रस्टची टाटा समूहाच्या टाटा सन्समध्ये 66% हिस्सेदारी आहे. टाटा ट्रस्टची जबाबदारी आता त्यांच्या खाद्यांवर आली आहे. नोएल यांची कार्यशैली ही रतन टाटा यांच्यापेक्षा अगदी वेगळी मानण्यात येते. प्रसिद्धीपासून दूर राहून काम करणे त्यांना आवडते. ते आता रतन टाटा यांचा वारसा चालवणार आहेत.  रतन टाटा यांचे बुधवारी निधन झाले. तर गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर ही नवीन अध्यक्षाची निवड करण्यात आली आहे.

पारसी समाजाची अगोदरच मंजूरी

नोएल टाटा यांच्या नावावर पारसी समाजाने अगोदरच शिक्कामोर्तब केले होते. टाटा अडनाव असलेली व्यक्ती टाटा समूहाची उत्तराधिकारी असावी असा समाजाचा आग्रह होता. तर रतन टाटा यांनी मात्र टाटा अडनाव असलेली व्यक्तीच या पदावर असेल असे नाही, असे यापूर्वी स्पष्ट केले होते. पण नोएल टाटा अगोदरच टाटा समूहाशी संबंधित अनेक विश्वस्त मंडळात कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांची या पदासाठी निवड होणार हे जवळपास निश्चित समजण्यात येत होते. नोएल यांची कार्यशैली ही रतन टाटा यांच्यापेक्षा अगदी वेगळी मानण्यात येते. प्रसिद्धीपासून दूर राहून काम करणे त्यांना आवडते. सध्या टाटा ट्रस्टमध्ये दोन उपाध्यक्ष आहेत. यामध्ये टीव्हीएस के वेणु श्रीनिवासन आणि माजी संरक्षण सचिव विजय सिंह यांचा समावेश आहे. हे दोघेही 2018 पासून उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.

हे सुद्धा वाचा

टाटा नंतर योग्य व्यक्तीची निवड

टाटा समूहातील काही माजी संचालक आणि अधिकाऱ्यांनी या निवडीचे स्वागत केल्याचे CNBC TV18 ने म्हटले आहे. त्यांनी काही अधिकारी आणि माजी संचालकाच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत. त्यानुसार, सर्वांनी ही योग्य व्यक्तीची निवड असल्याचा दावा केला आहे. टाटा यांचा वारस म्हणून नोएल यांची निवड योग्य असल्याची प्रतिक्रिया समोर येत आहे. रतन टाटा यांनी लग्न केले नाही. त्यामुळे त्यांच्या बंधुची निवड अनपेक्षित नव्हती.

नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्...
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्....
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज.
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं....
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं.....
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली.
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?.
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?.
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?.
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स.
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड.
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट.