पेन्शनर्ससाठी काउंटडाउन: ‘हे’ प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अवघे 15 दिवस!

यंदाच्या वर्षासाठी जिविताचे प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर पर्यंत आहे. मात्र, तुम्हाला जिविताचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी कार्यालयात रांगा लावण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घरबसल्या एका क्लिकवर जिविताचे प्रमाणपत्र सादर करू शकतात

पेन्शनर्ससाठी काउंटडाउन: 'हे' प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अवघे 15 दिवस!
pensioners
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 6:28 PM

नवी दिल्ली- तुम्ही निवृत्ती वेतनधारक आहात का? तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. निवृत्ती वेतन सेवेचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दरवर्षी जिविताचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असते. यंदाच्या वर्षासाठी जिविताचे प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर पर्यंत आहे. मात्र, तुम्हाला जिविताचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी कार्यालयात रांगा लावण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घरबसल्या एका क्लिकवर जिविताचे प्रमाणपत्र सादर करू शकतात. जाणून घ्या स्टेप-टू-स्टेप संपूर्ण प्रक्रिया :

तुम्ही जीवन प्रमाण पोर्टल https://jeevanpramaan.gov.in/  द्वारे घरबसल्या काम पूर्ण करू शकतात. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पोर्टलवरुन जीवनप्रमाण अॅप डाउनलोड करावे लागेल. यासोबतच UDAI द्वारे प्रमाणित फिंगरप्रिंट डिव्हाईस असणे महत्वाचे ठरते. स्मार्टफोनच्या माध्यमातून घरबसल्या ईमेल-आयडी व अन्य माहितीचा वापर करण्याद्वारे जिविताचे प्रमाणपत्र जमा करू शकतात.

निवृत्तीवेतन धारक सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या होम बँकिंग सेवांचा वापर यासाठी करू शकतात. सार्वजनिक क्षेत्रातील 12 बँकांच्या सेवेद्वारे डिजिटल जिविताचे प्रमाणपत्र सबमिट करू शकतात.doorstepbanks.com या www.dsb.imfast.co.in/doorstep/login) किंवा ‘डोअरस्टेप बँकिंग’ मोबाईल अॕपद्वारे आपले काम पूर्ण करू शकतात.

‘डोअर स्टेप’ सेवेतील 12 बँका:

ग्राहकांना घरबसल्या बँकिंग सेवा उपलब्ध करुन देणाऱ्या बँकाच्या यादीत खालील बँका समावेशित आहे. स्टेट बँक आॉफ इंडिया, पीएनबी, बँक आॉफ इंडिया, कॕनरा बँक, बँक आॉफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक आॉफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक, यूको बँक आणि युनियन बँक आॉफ इंडिया

पोस्ट कार्यालयातही सेवा:

नोव्हेंबर 2020 पासून टपाल खात्याने इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IBPB) आणि इलेक्ट्रॉनिक्स तथा माहिती प्रसारण मंत्रालयाने आॉनलाईन सुविधा उपलब्ध केली आहे. त्याद्वारे थेट पोस्टाच्या माध्यमातून डिजिटल प्रमाणपत्र सबमिट करू शकतात. सध्या टपाल खात्याद्वारे संपूर्ण भारतभरात पसरलेल्या डाकसेवकांच्या नेटवर्कचे सहाय्य घेतले जात आहे.

थेट बँकेत जमा:

तुम्ही डिजिटल स्वरुपात जिविताचे प्रमाणपत्र जमा करण्यास सक्षम नसल्यास तुमच्यासाठी अन्य पर्यायही उपलब्ध आहेत. तुम्ही ज्या बँकेतून निवृत्ती वेतन प्राप्त करतात थेट त्याच बँकेत जाऊन प्रमाणपत्र जमा करू शकतात. दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांच्या वयाचा विचार करता बँका दूतांकरवी सेवा थेट घरपोच उपलब्ध करतात. मात्र, त्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काची तपासणी करणे महत्वाचे आहे.

गाठा पेन्शन कार्यालय:

तुम्ही जिविताचे प्रमापत्र थेट केंद्रीय पेन्शन कार्यालयात जाऊन जमा करू शकतात. तथापि, केंद्र सरकारने राज्य सरकारांच्या सहकार्याने थेट घरातून प्राप्त करण्याचे पर्याय देखील उपलब्ध केले आहेत.

संबंधित बातम्या:

काँग्रेसकडून बाबासाहेबांचा त्यांच्या हयातीत आणि नंतरही सातत्याने अपमान, अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल Goa Liberation Day | 60व्या मुक्तिदिनी गोव्याला पंतप्रधानांनी दिलं 600 कोटीचं गिफ्ट, गोव्याला उद्देशून मोदी म्हणाले की… VIDEO: नगरपरिषदेत शिवसेनेचा धुव्वा उडणार, बढाया मारत नाही; नारायण राणेंनी शिवसेनेला डिवचले

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.