अनंत अंबानीच्या प्री वेडिग सोहळ्याला गर्लफ्रेंडसोबत पोहचले बिल गेट्स, पाहा कोण आहे ती?
Anant ambani pre-wedding : अनंत अंबानी यांच्या प्री वेडिंग सोहळ्याला जगभरातून अनेक मोठ्या लोकांनी हजेरी लावली होती. जगभरातील अनेक मोठे उद्योजक या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी मायक्रोसॉप्टचे को फाऊंडर बिल गेट्स हे देखील उपस्थित होते. पण ते आपल्या गर्लफ्रेंडसोबत या सोहळ्याला पोहोचले होते.
Bill gates Girlfriend : देशात सध्या चर्चा आहे ती अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्याची. अंबानी कुटुंबातील लग्न आता इतकी बिग बजेट आहेत की ते सगळ्यांचंच लक्ष आकर्षित करतात. अनंत अंबानी यांच्या या प्री वेडिंग सोहळ्याला जगभरातून अनेक मोठी लोकं आली होती. ज्यामध्ये मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांचा देखील समावेश आहे. बिल गेट्स यांनी गर्लफ्रेंड पॉला हर्ड सोबत या विवाह सोहळ्याला हजेरी लावली. जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत बिल गेट्स हे सध्या पाचव्या स्थानावर आहेत. ऑगस्ट 2021 मध्ये मेलिंडा फ्रेंच गेट्स यांच्यापासून घटस्फोट झाल्यानंतर बिल गेट्स आणि पॉला हर्ड यांचे संबंध जगासमोर आले.
बिल गेट्स आणि पॉला हर्ड अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिले गेले होते. सप्टेंबर 2022 मध्ये लेव्हर कप आणि जानेवारी 2023 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ते एकत्र दिसले होते. पण त्यांचं नातं हे जगासमोर आले नव्हते. 27 वर्ष एकत्र संसार केल्यानंतर बिल गेट्स आणि मेलिंडा फ्रेंच गेट्स यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर दोन वर्षांनी पॉला हर्डसोबतचे त्यांचे नाते जगासमोर आले. एका मुलाखतीत ते म्हणाले होते की, घटस्फोटानंतर त्यांनी पुन्हा एकदा प्रेमाचा शोध घेण्यास सुरुवात केली. कारण मी रोबोट नक्कीच नाही.
पॉला हर्ड कोण आहे?
पॉला हर्डने सॉफ्टवेअर कंपनी ओरॅकलचे सीईओ मार्क हर्डशी लग्न केले होते. ऑस्टिन येथील टेक्सास विद्यापीठातून 1984 मध्ये व्यवसाय प्रशासनात पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी अनेक कंपन्यांमध्ये काम केले. मार्क हर्ड आज या जगात नाही. पण पॉला हर्डला तिच्या दिवंगत पतीपासून कॅथरीन आणि केली या दोन मुली आहेत.
बिल गेट्स आणि पॉला हर्ड?
जुलै 2023 मध्ये, पॉला हर्ड तिच्या बोटात अंगठी दिसल्यानंतर या जोडप्याबाबत अफवा पसरल्या. परंतु मायक्रोसॉफ्टच्या सह-संस्थापकाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले की अंगठी पॉला हर्डची होती आणि ती बिल गेट्स यांच्याशी प्रतिबद्धता दर्शवत नाही.
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी जामनगरमध्ये आपल्या मुलाच्या प्री वेडिंग सोहळ्याला जगभरातील लोकांना आमंत्रित केले होते. या सोहळ्याला बिल गेट्स हे पॉला हर्ड सोबत दिसले.