Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांची ही कंपनी Nifty-50 मधून पडेल बाहेर, उद्या दिसेल दमखम!

Mukesh Ambani : शेअर बाजारात नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये मंगळवारी माहिती दिली. त्यानुसार, मुकेश अंबानी यांच्या या नवीन कंपनीचा शेअर ट्रेडिंगनंतर Nifty-50 मधून बाहेर पडेल. गुरुवारी हा स्टॉक काय कमाल दाखवतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांची ही कंपनी Nifty-50 मधून पडेल बाहेर, उद्या दिसेल दमखम!
Follow us
| Updated on: Sep 06, 2023 | 5:03 PM

नवी दिल्ली | 6 सप्टेंबर 2023 : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे (Reliance Industries) चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांची नवीन कंपनी जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेज लिमिटेडचा (Jio Financial Services) शेअर, बाजारात काय कमाल दाखवतो हा सध्या चर्चेचा विषय आहे. आज 6 सप्टेंबर 2023 रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या Nifty-50 मधून हा शेअर बाहेर पडेल, याविषयीची माहिती मंगळवारी एनएसईने दिली. आता हा शेअर काय कमाल दाखवेल हे या दोन उरलेल्या व्यापारी सत्रात समोर येईल. जिओ फायनेन्शिअलचा शेअर, बाजारात सूचीबद्ध, लिस्टेड झाल्यावर वधारला नाही, उलट घसरला. नंतर त्याने चांगली घौडदौड केली. हा शेअर लंबी रेस का घोडा ठरेल, अशी गुंतवणूकदारांची आशा आहे. येत्या काळात हा शेअर किती भरारी घेतो, हे समोर येईलच.

बुधवारी ट्रेडिंगनंतर होईल बाहेर

मुकेश अंबानी यांच्या जिओ फायनेन्शिअलचा शेअर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवरुन अगोदरच बाहेर पडला आहे. आता हा स्टॉक निफ्टी-50, निफ्टी-100, निफ्टी-200, निफ्टी-एनर्जी, निफ्टी इंडिया मॅन्युफॅक्चरिंगसह 13 दुसऱ्या इंडेक्समधून बाहेर पडेल. बुधवारी ट्रेडिंगनंतर हा स्टॉक कोणत्याही परिस्थितीत बाहेर करण्यात येईल, असे एनएसईने स्पष्ट केले आहे. त्याचा परिणाम उद्या जिओ फायनेन्शिअल स्टॉकवर दिसून येईल.

हे सुद्धा वाचा

21 ऑगस्ट रोजी शेअर बाजारात एंट्री

रिलायन्स इंडस्ट्रीजमधून स्वतंत्र होत जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेज अस्तित्वात आली. रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेसमेंटचे नाव बदलून जिओ फायनेन्शिअल करण्यात आले. 20 जुलै रोजी खास ट्रेडिंग सेशनमध्ये या शेअरची किंमत, मूल्य निश्चित करण्यात आले.

मूल्य असे झाले निश्चित

NSE वर इतके मूल्य

नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर हा शेअर 261.85 रुपयांवर निश्चित झाला. प्री-ओपन सत्रात एनएसईवर रिलायन्स शेअरची किंमत 2,580 रुपये प्रति शेअरपर्यंत पोहचली. यापूर्वी एनएसईवर क्लोजिंग प्राईस 2,841.85 रुपये होती. या दोन किंमती आधारभूत धरत 2,841.85—2,580 : 261.85 रुपये अशी शेअरची किंमत निश्चित झाली.

BSE वर काय आहे मूल्य

बीएसईवर स्पेशल प्री-ओपन सेशनमध्ये रिलायन्सच्या शेअरची किंमत 2,589 प्रति शेअरवर आली. तर एका दिवसापूर्वी शेअरची क्लोजिंग प्राईस 2,840 रुपये होती. या किंमती आधारभूत धरत बीएसईवर 2,840—2,589 : 251 रुपये अशी शेअरची किंमत निश्चित झाली.

या क्षेत्रात जिओची एंट्री

एका अंदाजानुसार जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेज कंपनी चार व्यवसायात उडी घेईल. यामध्ये रिटेल लेंडिंग, असेट मॅनेजमेंट, इन्शुरन्स ब्रोकिंग आणि डिजिटल पेमेंट्चा समावेश आहे. विशेष म्हणजे या बिझनेससाठी यापूर्वीच जागतिक कंपन्यांशी कराराचे सत्र सुरु झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन, आकर्षक योजनांचा भडीमार करत जिओ या क्षेत्रात झंझावात आणू शकते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.