Mukesh Ambani | काळाचा महिमा दुसरं काय! दिग्गज उद्योजक थकले, कंपनी खरेदीसाठी भंगार विक्रेत्यांची गर्दी

Mukesh Ambani | ही कंपनी खरेदीसाठी अनेक दिग्गज उद्योजकांनी कंबर कसली होती. त्यात रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी हे पण होते. ही कंपनी खरेदीसाठी रिलायन्स रिटेलने 24,713 कोटी रुपयांचा करार पण केला होता. पण Amazon ने या करारात खोडा घातला. त्यामुळे ही कंपनी खरेदी करण्यासाठी भंगार विक्रेत्यांनी बोली लावली आहे.

Mukesh Ambani | काळाचा महिमा दुसरं काय! दिग्गज उद्योजक थकले, कंपनी खरेदीसाठी भंगार विक्रेत्यांची गर्दी
Follow us
| Updated on: Oct 27, 2023 | 5:41 PM

नवी दिल्ली | 27 ऑक्टोबर 2023 : देशातील रिटेल क्षेत्रात कधी काळी बिग बाजारचा दबदबा होता. बिग बाजाराचा पसारा आवाक्यात घेण्यासाठी दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांनी कंबर कसली होती. त्यांनी फ्यूचर रिटेल या कंपनीशी करार केला होता. 24,713 कोटी रुपयांची ही डील होती. 900 अब्ज डॉलरच्या रिटले मार्केटवर कब्जा मिळविण्यासाठी जगभारतील अनेक कंपन्या असा करार करण्यास उत्सुक होत्या. त्यांना बिग बाजार त्यांच्या अखत्यारीत हवा होता. पण आज परिस्थिती अशी आहे की, अनेक कंपन्यांनी ही कंपनी खरेदीच्या स्पर्धेतून माघार घेतली आहे. कोणी या कंपनीकडू ढुंकूनही पहायला तयार नाही. आता केवळ भंगार विक्रेत्यांनी या कंपनीकडे मोर्चा वळवला आहे.

49 कंपन्या होत्या मैदानात

फ्यूचर रिटेल हा किशोर बियाणी यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. देशात मॉल संस्कृती रुजविण्यात या समूहाचा मोठा हातभार होता. कर्जाचा डोंगर चढल्यानंतर ही कंपनी खरेदीसाठी 49 कंपन्या मैदानात उतरल्या. यामध्ये आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांची रिलायन्स रिटेल ही कंपनी पण होती. पण ईटीच्या रिपोर्टनुसार, भारतीय दिवाळखोर आणि दिवाळखोरी मंडळाच्या (IBBI) आकडेवारीनुसार, फ्यूचर रिटेलवर बँकांचे जवळपास 20,000 कोटी रुपयांचे कर्ज आहे. कंपनीवर आता केवळ भंगार विक्रेतेच लट्टू आहेत.

हे सुद्धा वाचा

इतक्या कोटींची लावली बोली

फ्यूचर रिटेल खरेदीसाठी पूर्वी अनेक दिग्गज कंपन्या समोर आल्या होत्या. पण त्यानंतर सर्वांनी या प्रक्रियेतून अंग काढले. आता भंगार विक्रेते पुढे आले आहेत. गुरुग्राम येतील एका ऑनलाईन स्क्रॅप डीलरने फ्यूचर रिटले खरेदीसाठी 550 कोटी रुपयांची सर्वात मोठी बोली लावली आहे. त्यामुळे बँकांना मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. पूर्वी देशभरात बिग बाजारचे 1500 स्टोअर होते. आता त्यांना कुलूप लागले आहे.

रिलायन्ससोबत झाला होता करार

फ्युचर ग्रुपने ऑगस्ट 2020 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजची कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडसोबत 24,713 कोटी रुपयांची डील केली होती. या करारानुसार, रिटेल, होलसेल आणि लॉजिस्टिक या सर्व व्यवसायावर रिलायन्सची पकड मजबूत होणार होती. फ्यूचर ग्रूपच्या 19 कंपन्यांची खरेदी रिलायन्स रिटेल करणार होती. पण अमेरिकेची दिग्गज ई-कॉमर्स कंपनी Amazon ने या कराराला विरोध केला. हे प्रकरण थेट न्यायपालिकेत पोहचले. दरम्यान रिलायन्सने बिग बाजारचे जवळपास 900 स्टोअर ताब्यात घेतले होते. पण गेल्या वर्षी रिलायन्सने हा करार मोडल्याचे घोषीत केले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.