Billionaire Wealth : शेअर बाजारात त्सुनामी, जगातील श्रीमंतांना मोठा फटका

Billionaire Wealth : जगभरातील श्रीमंतांना मोठा फटका बसला आहे. त्यांच्या संपत्तीत मोठी घसरण झाली. अब्जाधीश एलॉन मस्कपासून ते गौतम अदानी यांच्यापर्यंत 22 अब्जाधीशांना हा फटका बसला.

Billionaire Wealth : शेअर बाजारात त्सुनामी, जगातील श्रीमंतांना मोठा फटका
Follow us
| Updated on: Aug 03, 2023 | 5:11 PM

नवी दिल्ली | 03 ऑगस्ट 2023 : बुधवार हा शेअर बाजारासाठी (Share Market) ब्लॅक वेनसडे ठरला. जगभरातील शेअर बाजारात दणआपट झाली. त्याचा फटका जगभरातील अब्जाधीशांना बसला. जगातली टॉप 22 अब्जाधीशांच्या संपत्तीला सुरुंग लागला. त्यांच्या संपत्तीत मोठी घसरण झाली. या अब्जाधिशांना एकूण 3 लाख कोटी रुपयांचा एकत्रित फटका बसला. त्यांची संपत्ती 36 अब्ज डॉलरहून पण घसरली. यामध्ये एलॉन मस्क, बर्नार्ड अरनॉल्ट यांचे सर्वाधिक नुकसान झाले. तर भारतातील गौतम अदानी, मुकेश अंबानी यांच्यासह 14 अब्जाधीशांच्या संपत्तीत घसरण दिसून आली. ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सच्या (Bloomberg Billionaire Index) अहवालात याविषयीची माहिती देण्यात आली आहे. कालच्या शेअर बाजारातील त्सुनामीने अनेक श्रीमंतांना इंगा दाखवला.

टॉप 22 अब्जाधीशांची संपत्ती घसरली

एकाच वेळी जगातील टॉप 22 अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी घसरण झाली, अशी घटना विरळ आहे. बुधवारी ही घटना घडली. एलॉन मस्क पासून ते गौतम अदानी यांच्यापर्यंत 22 अब्जाधीशांच्या संपत्तीत एकाच वेळी 3 लाख कोटी रुपयांहून घसरण झाली. संपत्ती 36 अब्ज डॉलरहून पण घसरली. या यादीत एलॉन मस्क, मार्क झुकरबर्ग, बिल गेट्स, गौतम अदानी, मुकेश अंबानी यांचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

मस्क यांच्या संपत्तीत मोठी घसरण

जगातील सर्वात श्रीमंत, टॉप 10 अब्जाधीशांमध्ये एलॉन मस्क यांच्या संपत्तीत सर्वाधिक घसरण झाली. बुधवारी मस्क यांच्या संपत्तीत जवळपास 5 अब्ज डॉलरने घसरली. त्यांची एकूण संपत्ती 233 अब्ज डॉलर झाली आहे. मस्क यांच्या संपत्तीत दुसऱ्या दिवशी पण घसरण झाली. जेफ बेजोस यांची संपत्ती 3.52 डॉलरने कमी झाली. वॉरेन बफे यांना 416 लाख डॉलरचा फटका बसला. लॅरी एलिसन, लॅरी पेज, मार्क झुकरबर्ग, स्टीव बॉलमर, सर्जी ब्रिन यांच्या संपत्तीत 2 ते 3 अब्ज डॉलरची घसरण झाली.

भारतीय अब्जाधीशांचे नुकसान

भारतातील अब्जाधीश गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांना पण फटका बसला. मुकेश अंबानी यांच्या श्रीमंतीत 1.27 अब्ज डॉलरची कमी आली. त्यामुळे त्यांची एकूण संपत्ती 94.5 अब्ज डॉलरवर आली आहे. गौतम अदानी यांची संपत्ती 1.08 अब्ज डॉलरने घसरली. त्यांची एकूण संपत्ती 62.8 अब्ज डॉलरवर येऊन पोहचली.

चौघांच्या संपत्तीत वाढ

याशिवाय शापूर मिस्त्री, शिव नादर, अजिम प्रेमजी, लक्ष्मी मित्तल यासारख्या 19 अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी घसरण झाली. तर 4 अब्जाधीशांच्या संपत्तीत वाढ झाल्याचे दिसून आले. बुधवारी शेअर बाजारात भूकंप आला. सेन्सेक्स आणि निफ्टीत जोरदार घसरण झाली. जगभरातील बाजारांमध्ये पण हाच ट्रेंड होता. त्याचा फटका बसला.

'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.