Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bitcoin | बिटकॉईनने केले मालामाल, नाही विश्वास, नाही परवानगी, पण गुंतवणूकदारांची झाली चांदी

Bitcoin | भारत सरकारसह अनेक देशांमध्ये क्रिप्टो करन्सीला कोणतीच वैधता नाही. या करन्सीवर सरकारचा विश्वास नाही. यावर्षी बिटक्वाईनने कमाल दाखवली. या डिजिटल करन्सीने पैसा दुप्पट केला आहे. अनेक क्रिप्टो करन्सी आहेत. पण त्या गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला नाही. त्यांचे उलट नुकसान झाले. बिटक्वाईनने अनेकांना गुंतवणूकदारांना मालामाल केले.

Bitcoin | बिटकॉईनने केले मालामाल, नाही विश्वास, नाही परवानगी, पण गुंतवणूकदारांची झाली चांदी
Follow us
| Updated on: Oct 25, 2023 | 2:25 PM

नवी दिल्ली | 25 ऑक्टोबर 2023 : बिटक्वाईनमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हे वर्ष लक्की ठरले आहे. चालू आर्थिक वर्षात त्यांना जोरदार परतावा मिळाला. यावर्षी बिटक्वाईनमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा पैसा डबलपेक्षा अधिक झाला. तर इतर क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक करणाऱ्यांचे नुकसान झाले. आकड्यांनी त्याची माहिती दिली. 1 जानेवारी 2023 रोजी ज्यांनी बिटक्वाईनमध्ये गुंतवणूक केली. त्यांना आतापर्यंत 105 टक्के परतावा मिळाला आहे. सध्या बिटक्वाईनचा भाव 34,041.82 डॉलर (28.3 लाख रुपये) असा आहे. तर बिटक्वाईनचे मार्केट कॅप 664.83 दशलक्ष डॉलर (55.26 ट्रिलियन रुपये) आहे. बिटक्वाईनने गेल्या 52 आठवड्यात 15,480 डॉलर असा निच्चांकी भाव गाठला होता. तर या चलनाचा 52 आठवड्यातील उच्चांक 35,144.64 डॉलर इतका वधारला.

एका वर्षांच्या उच्चांकावर

सध्या बिटक्वाईनचा भाव जवळपास एक वर्षाच्या उच्चांकावर पोहचला आहे. bitcoin.org हे डोमेन नाव 18 ऑगस्ट 2008 रोजी नोंदणीकृत झाले आहे. 31 ऑक्टोबर 2008 रोजी सातोशी नाकामोतो याने बिटकॉईन: ए पीयर-टू-पीयर इलेक्ट्रॉनिक कॅश सिस्टम नावाच पेपर क्रिप्टोग्राफी मेलिंग सूचीत समावेश केला होता. नाकामोटोने बिटकॉईन सॉफ्टवेअरला ओपन-सोर्स कोड रुपात लागू केला. जानेवारी 2009 मध्ये हे चलन आणण्यात आले. अजूनही नाकामोतोचा चेहरा जगासमोर आलेला नाही. बिटक्वाईन निधीसाठी अद्याप कोणतेही सूसुत्रीकरण करण्यात आलेले नाही. काही तंत्रज्ञान आणि नेटवर्कचा संदर्भासाठी नोंदणीकृत बिटकॉईनचा वापर करण्यात येतो.

हे सुद्धा वाचा

मंगळवारी मोठी उसळी

बिटकॉईनने मंगळवारी मोठी उसळी घेतली. मंगळवारी 10 टक्क्यांची तेजी दिसून आली. बिटक्वाईन 34,872 डॉलरवर पोहचले. हा जवळपास दीड वर्षांतील उच्चांक आहे. या मोठ्या उडीमुळे बिटक्वाईन फंड वाढला आहे. तर सोमवारी पण बिटक्वाईनने 10 टक्क्यांची उसळी घेतली होती. एका वर्षातील हा उच्चांकी भाव आहे.

7.87 टक्क्यांची दरवाढ

गेल्या आकडेवारीवरुन बिटक्वाईनची किंमत समोर आली आहे. त्यानुसार, बिटक्वाईनमध्ये 7.87 टक्क्यांची दरवाढ झाली. बिटक्वाईन मे 2022 पासून 34,020 डॉलरवर पोहचले. आशियन बाजार उघडल्यावर हा भाव 35,000 डॉलरवर पोहचले. तर क्रिप्टोमधील दुसरे सर्वात मोठे चलन Ethereum (Ether) यामध्ये पण तेजीचे सत्र आले. यामध्ये 4.50 टक्क्यांची उसळी आली. ऑगस्ट महिन्यानंतर इथेरियम 1,786.30 डॉलरवर पोहचले.

केंद्र सरकारची भूमिका काय

भारताने पूर्वीपासून क्रिप्टोवर कडक भूमिका घेतली आहे. गेल्या दोन वर्षांत केंद्र सरकारने क्रिप्टोला मान्यता देण्यास विरोध केला होता. क्रिप्टो व्यवहारांना भारतीय नियम आणि कायदे पाळावे लागतील हे केंद्र सरकारने स्पष्ट केले होते. क्रिप्टोवर देशात बंदी घातली नसली तर क्रिप्टोतून होणारी कमाई कराच्या अखत्यारीत आणण्यात आले आहे. त्यामुळे मान्यता नाही पण वसूली सुरु असा प्रकार सुरु आहे.

मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण.
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश.
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप.
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.