Bitcoin vs Mutual Funds : गुंतवणूक नेमकी कुठे करावी? कमी काळात जास्त फायदा कुठे?

बिटकॉईन (Bitcoin) की म्युचअल फंड (Mutual Funds) नेमकी कशातील गुंतवणूक फायद्याची ठरेल? असा प्रश्न सध्या अनेकजण विचारत आहेत.

Bitcoin vs Mutual Funds : गुंतवणूक नेमकी कुठे करावी? कमी काळात जास्त फायदा कुठे?
money
Follow us
| Updated on: May 06, 2021 | 1:28 PM

मुंबई : बिटकॉईन (Bitcoin) की म्युचअल फंड (Mutual Funds) नेमकी कशातील गुंतवणूक फायद्याची ठरेल? असा प्रश्न सध्या अनेकजण विचारत आहेत. जाणकारांच्या मते दोन्हीचे आपआपले फायदे वेगळे आहेत. जो खरेदी करतो त्याच्यावर त्याचा फायदा अवलंबून असतो. कधी खरेदी करतो आणि कधी विकतो त्यावर नफा-तोट्याचा खेळ अवलंबून आहे. मात्र दोन्हीमधील गुंतवणुकीचा प्रकार वेगळा आहे. (Bitcoin vs Mutual Funds, which is better option to Invest?)

बिटकॉईन एक क्रिप्टोकरन्सी आहे. तर म्युचअल फंड हा गुंतवणुकीचा मार्ग आहे, ज्यामध्ये पैसे लावले जातात आणि फंड मॅनेजर त्याची तरतूद करतो. बिटकॉईनमध्ये दोन प्रकारे गुंतवणूक करु शकता. पहिला म्हणजे बिटकॉईन खरेदी करुन, तो तोपर्यंत सोडू नका, जोपर्यंत त्याची किंमत वाढत नाही. फायदा दिसताच बिटकॉईन विकून चांगले पैसे कमवू शकता. दुसरं म्हणजे, तुम्ही मायनिंगच्या माध्यमातूनही बिटकॉईनमधून पैसे कमावू शकता.

दुसरीकडे म्युचअल फंडमध्ये असा कोणता पर्याय नाही, यामध्ये थेट म्युचअल फंड कंपन्या, बँक किंवा एखाद्या ब्रोकरेज फर्ममधून खरेदी केले जातात.

बिटकाईन-म्युचअल फंड

बिटकाईन किंवा म्युचअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी, गुंतवणूकदाराने किती काळासाठी पैसे गुंतवण्याचे नियोजन केलं आहे, हे निश्चित करावं लागेल. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिस्क अर्थात धोका पत्करण्याची क्षमता किती आहे, यावरुन कशात गुंतवणूक करायची हे ठरवता येईल. जर रिस्क घेण्याची क्षमता असेल तर तुम्ही म्युचअल फंडमध्ये गुंतवणूक करु शकता.

बिटकॉईनचा पर्याय

गुंतवणुकीमध्ये रिस्क आहेच. जिथे जास्त धोका, तिथे जास्त नफा हे सूत्र आहे. एखाद्या वस्तू-शेअर्सचा भाव सतत वधारत असेल, तर त्याला कमी काळासाठी घेणे धोक्याचे ठरते. मात्र हे ही लक्षात हवं की ती प्रॉपर्टी जास्तीत जास्त किती काळासाठी आपल्याकडे ठेवावी. क्रिप्टोकरन्सीमध्ये लोकांची रुची वाढत आहे. मात्र पैसे तिथेच लावले पाहिजे जिथे ते बुडण्याची शक्यता कमी आहे. त्या हिशेबाने म्युचअल फंडचा पर्याय जास्त चांगला आहे. जर तुम्ही रिस्क घेऊ इच्छित असाल तर बिटकॉईनमध्ये पैसे गुंतवू शकता.

शेअर-म्युचअल फंडचा फायदा

गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते, कोणी गुंतवणूकदार शेअर खरेदी करतो, तेव्हा तो मालक होतो. कारण कंपनीचे काही भाग हे शेअरधारकाकडे जातात. हाच फायदा गुंतवणूकदाराला म्युचअल फंड आणि इक्विटीमध्ये होतो. दुसरीकडे बिटकॉईनचा बिझनेस अनुमानांवर आधारित आहे. बरं, बिटकॉईनची मालकी कुणाकडे आहे, त्याचे मागे कोण आहे याचा पत्ताच नाही.

बिटकॉईनमध्ये दीर्घ काळासासाठी फायदा, मात्र विश्वास नाही

बिटकॉईनमध्ये दीर्घ काळासासाठी केलेली गुंतवणूक फायद्याची ठरू शकते, मात्र त्याबाबत कोणताही विश्वास नाही. बिटकॉईनमधून चांगले रिटर्न मिळतील हे दाव्याने सांगू शकत नाही. तिथे धोकाही जास्त असतो. जे या सर्वांसाठी तयार असतील त्यांनी बिटकॉईनचा पर्याय निवडावा, असं तज्ज्ञ सांगतात.

अंदाजाचा खेळ

बिटकॉईनमध्ये आपण अंदाज लावून गुंतवणूक करु शकत नाही. गुंतवणूक ही फंड मॅनेजरद्वारे मॅनेज केली जाते. वर्ष-दोन वर्षांनी फायदा मिळण्याची आशा असते मात्र सर्व खेळ बाजारातील घडामोडींवर आहे. बिटकॉईनच्या तुलनेत म्युचअल फंडचा उद्योग जास्त खुला आणि पारदर्शी आहे. आपला पैसा वाढतोय की कमी होतोय हे आपल्याला त्या त्या क्षणी दिसत असतं.

(टीप : कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी तुम्ही गुंतवणूक तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या)

संबंधित बातम्या 

Gold Price Today | डॉलरमध्ये घसरण सोन्याला झळाळी, सोने 50 हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता, जाणून घ्या नवे दर   

मे महिन्यासाठी छोटू LPG सिलिंडरची किंमत जारी, कागदपत्रांचं नो टेन्शन, 2 तासांत मिळणार घरपोच 

Bitcoin vs Mutual Funds, which is better option to Invest?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.