Real Estate : अमिताभ, सलमानसह रिअल इस्टेटमधून ‘हे’ बॉलिवूड स्टार्स करतात मोठी कमाई, कमावतात लाखो रुपये

रिअल इस्टेट (Real Estate) हा गुंतवणुकी(Investment)साठी सर्वाधिक पसंतीचा पर्याय आहे. अनेक लोक प्रॉपर्टी(Property)मध्ये गुंतवणूक करतात. केवळ सामान्य लोकच नाही तर असे अनेक अॅक्टर्स (Bollywood Actors)आहेत, ज्यांनी यात गुंतवणूक केलीय.

Real Estate : अमिताभ, सलमानसह रिअल इस्टेटमधून 'हे' बॉलिवूड स्टार्स करतात मोठी कमाई, कमावतात लाखो रुपये
अमिताभ बच्चन/सलमान खान
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 9:41 PM

मुंबई : रिअल इस्टेट (Real Estate) हा गुंतवणुकी(Investment)साठी सर्वाधिक पसंतीचा पर्याय आहे. अनेक लोक प्रॉपर्टी(Property)मध्ये गुंतवणूक करतात. केवळ सामान्य लोकच नाही तर असे अनेक अॅक्टर्स (Bollywood Actors)आहेत, ज्यांनी यात गुंतवणूक केलीय आणि ते रिअल इस्टेटमधून चांगली कमाई करतयत. यात काजोल(Kajol)पासून अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan)पर्यंतच्या कलाकारांचा समावेश आहे. जाणून घेऊया सविस्तर…

काजोल काजोलनं मुंबईत दोन वर्षांसाठी एक अपार्टमेंट भाड्यानं घेतलंय. यामध्ये त्यांना दरमहा ९० हजार रुपये भाडं मिळतंय. हे अपार्टमेंट 771 स्क्वेअर फूटचं आणि पवईतल्या हिरानंदानी गार्डन्समध्ये अटलांटिस प्रकल्पाच्या 21व्या मजल्यावर आहे. त्यासाठी भाडेकरू आशा शेणॉय यांनी तीन लाख रुपयांची सुरक्षा ठेव भरलीय.

सलमान खान या डिसेंबरच्या सुरुवातीला सलमान खाननं मुंबईतली त्याची इमारत दरमहा 95, 000 रुपये भाड्यानं दिली होती. कराराचा कालावधी 33 महिने आहे. हे अपार्टमेंट वांद्रे पश्चिम इथं आहे. 758 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेलं हे घर 14व्या मजल्यावर आहे. त्यासाठी भाडेकरू आयुष दुआ यांनी 2.85 लाख रुपये अनामत रक्कम भरलीय.

अमिताभ आणि अभिषेक बच्चन अभिनेते अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांनीही मुंबईतल्या जुहू इथलं वत्स आणि अम्मू बंगल्याचा तळमजला 15 वर्षांसाठी 18.9 लाख रुपये प्रति महिना भाड्यानं दिलाय. 28 सप्टेंबर 2021 रोजी लीज डीलची नोंदणी झाली.

याशिवाय अमिताभ बच्चन यांनी अभिनेत्री क्रिती सेनॉनला मुंबईत डुप्लेक्स भाड्यानं दिला आहे. त्यांनी ही मालमत्ता दोन वर्षांसाठी 10 लाख रुपये प्रति महिना भाड्यानं दिली आहे. हे अपार्टमेंट अटलांटिस इमारतीच्या 27व्या आणि 28व्या मजल्यावर आहे. सॅनॉननं 60 लाख रुपयांची सुरक्षा ठेव भरलीय.

सैफ अली खान बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यानंही वांद्रे इथली त्याची इमारत 3.5 लाख रुपये प्रति महिना भाड्यानं दिलीय. ऑगस्टमध्ये त्यांनी ते भाड्यानं घेतलं. त्यानं ते गिल्टी नावाच्या कंपनीला भाड्यानं दिलय. त्यांनी 15 लाख रुपयांची सुरक्षा ठेव भरलीय. अपार्टमेंट 1,500 चौरस फूट आहे.

करण जोहर करण जोहरनं धर्मा प्रॉडक्शनच्या नावावर दोन व्यावसायिक मालमत्तांच्या लीजचं नूतनीकरण केलं. त्यांचं भाडं अनुक्रमे 17.56 लाख आणि 6.15 लाख रुपये प्रति महिना आहे.

‘तुमचा वापर संपतो तेव्हा तुम्हाला च्युइंगमसारखं थुंकलं जातं’, रामदास कदमांवरुन नितेश राणेंचा शिवसेनेवर निशाणा

Traffic Police | Nagpur | मुंबईतील घटनेची नागपुरात पुनरावृत्ती! वाहतूक पोलिसाला फरफटत नेलं

शिवसेनेने कर्नाटक सरकारच्या एसटी बसेसवर “छत्रपती शिवाजी महाराज की जय” लिहून केल्या रवाना…

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.