Share Market : शेअर बाजारात धूम, Sensex चा नवा विक्रम, या स्टॉक्सने गुंतवणूकदार मालामाल..

Share Market : शेअर बाजाराने आज पूर्णपणे मरगळ झटकली..

Share Market : शेअर बाजारात धूम, Sensex चा नवा विक्रम, या स्टॉक्सने गुंतवणूकदार मालामाल..
Sensex Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 29, 2022 | 5:30 PM

नवी दिल्ली : शेअर बाजाराने आज खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली. त्याचं कारण म्हणजे बीएसई निर्देशांक (BSE Sensex) आणि एनएसई निफ्टी (NSE Nifty) यांनी एक नवीन विक्रम तयार केला आहे. मंगळवारी निर्देशंकाने पुन्हा एकदा उसळी घेतली. निर्देशांकाने पुन्हा एकदा सर्वकाळ उच्चांकी (Sensex All-Time High) धाव घेतली. शेअर बाजाराचा संध्याकाळी बंद झाला, तेव्हा निर्देशांक 177.04 अंकांच्या वृद्धीसह 62,681.84 या विक्रमी पातळीवर बंद झाला.

BSE Sensex ची सुरुवात 62,362.08 या अंकावर झाली. दिवसभरातील व्यापारी सत्रात या निर्देशकांने 62,887.40 अंकाला गवसणी घातली. सोमवारी निर्देशांक 62,504.80 अंकावर बंद झाला होता. त्यानंतर आज निर्देशाकांने एकदम उसळी घेतली.

नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी वृद्धी नोंदवत बंद झाला. निफ्टी 55.30 अंकाच्या तेजीने रेकॉर्ड 18,618.05 अंकावर बंद झाला. दिवसभरातील व्यापारी सत्रात निफ्टीत 18,678.10 अंकाची वृद्धी झाली. कालपेक्षा निर्देशांक आज दुडूदुडू धावला.

हे सुद्धा वाचा

शेअर बाजारात काही कंपन्यांच्या शेअरने जबरदस्त कमाई केली. जर निर्देशाकांत सहभागी शेअरवर नजर टाकली तर कोणत्या गुंतवणूकदारांची चांदी झाली ते स्पष्ट होईल. या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा मोठा फायदा झाला.

यामध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर (Hindustan Unilever Share Price) ही कंपनी टॉप गेनर (Top Gainer) राहिली. या समूहाने शेअर बाजारात आज 4.27 टक्क्यांची आघाडी घेतली होती. त्यामुळे गुंतवणूकदारांची चांदी झाली.

याशिवाय सनफार्मा, नेस्ले, डॉ.रेड्डीज आणि टाटा स्टील चे शेअर टॉप-5 मध्ये राहिले. तर एल अँड टी, पावर ग्रीड, मारुती, बजाज फिनसर्व आणि इंडसइंड बँकेच्या शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली. या शेअरमधील गुंतवणूकदारांची मोठी पंचाईत झाली.

राष्ट्रीय स्टॉक एक्सजेंच, निफ्टीमध्ये पण हिंदुस्थान युनिलिव्हरच्या शेअरचा बोलबाला राहिला. या शेअरने 4.39 टक्क्यांची उसळी घेतली. या निर्देशांकात टॉप-5 गेनर्समध्ये जेएसडब्ल्यू स्टील, सिप्ला, हीरो मोटोकॉर्प आणि सनफार्मा या शेअर्सचा समावेश राहिला.

राष्ट्रीय निर्देशांकात, निफ्टीमध्ये सर्वात मोठी घसरण (Top Loser) इंडसइंड बँकेच्या शेअरची राहिली. याशिवाय कोल इंडिया, बजाज फिनसर्व, आयशर मोटर्स आणि पावर ग्रीडचे शेअर्संना कामगिरी बजावता आली नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांना कमाई करता आली नाही.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.