Budget 2021 मध्ये खातेधारकांसाठी Good News, बँक बुडाली तर मिळणार 5 लाख रुपये

केंद्र सरकारने विम्याची रक्कम 1 लाख रुपयांवरून 5 लाखांपर्यंत वाढवली आहे. म्हणजेच जर तुम्ही तुमचे पैसे बँकेत ठेवले तर तुम्हाला 5 लाख रुपये मिळतील.

Budget 2021 मध्ये खातेधारकांसाठी Good News, बँक बुडाली तर मिळणार 5 लाख रुपये
Follow us
| Updated on: Feb 01, 2021 | 1:53 PM

नवी दिल्ली : केंद्र सरकारने 2021 च्या अर्थसंकल्पात बुडालेल्या बँकांच्या कर्जाचे व्यवस्थापन करण्यासाठी एक कंपनी स्थापन करण्याची घोषणा केली आहे. इतकंच नाही तर यावेळी केंद्र सरकारने बँक खातेदारांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने विम्याची रक्कम 1 लाख रुपयांवरून 5 लाखांपर्यंत वाढवली आहे. म्हणजेच जर तुम्ही तुमचे पैसे बँकेत ठेवले तर तुम्हाला 5 लाख रुपये मिळतील. यामुळे बँका बंद झाल्यावर ग्राहकांचे नुकसान भरून काढता येईल. (budget 2021 bank deposit insurance increases from 1 lakh to rs 5 lakh announced nirmala sitharaman)

खरंतर, याआधी बँकेत ठेवलेल्या पैशांचा विमा एक लाख रुपये होता. पण आता सरकारने त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. यासाठी सरकार एक कंपनीही स्थापन करणार आहे. यासोबतच अर्थमंत्र्यांनी बँकांच्या पुनर्पूंजीकरणासाठी 20 हजार कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. म्हणजेच सरकार बँकांना 20 हजार कोटींचे भांडवल देईल.

कोरोनाच्या (Coronavirus) जीवघेण्या संसर्गामध्ये मोदी सरकार अर्थसंकल्प सादर करत आहेत. यामध्ये केलेल्या घोषणेनुसार, वित्तीय वर्ष 2021-22 मध्ये जीडीपीच्या 6.8% असणार आहे. त्याचबरोबर सरकारची वित्तीय तूट या आर्थिक वर्षात जीडीपीच्या 9.5 टक्के इतकी असण्याची अपेक्षा आहे. तर वित्तीय तूट भरुन काढण्यासाठी 80,000 कोटींची आवश्यकता असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.

दरम्यान, सर्वात मोठी विमा कंपनी -भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) प्रारंभिक खुल्या भागविक्रीद्वारा (IPO) निर्गुंतवणूक करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली आहे. अर्थसंकल्प सादर करताना निर्मला यांनी भारत सरकार निर्गुंतवणीकरण करणाऱ्या कंपन्यासंदर्भात माहिती दिली. त्यावेळी त्यांनी एलआयसीचा आयपीओ यंदाच्या वर्षी बाजारामध्ये येईल असे निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट केले.

LIC च्या प्रशासकीय नियमांत बदल करण्यासाठी विधेयक

एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. सध्याच्या घडीला LIC कडे तब्बल 400 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. बाजारपेठेत IPO आणण्यासाठी केंद्र सरकारला LIC च्या प्रशासकीय नियमांत काही बदल करावे लागतील. त्यानंतरच केंद्र सरकारला एलआयसीमधील हिस्सेदारी विकता येईल. त्यामुळे आता केंद्र सरकार यासाठी संसदेत सुधारणा विधेयक मांडणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामण यांनी केली.

कर्ज बुडव्यांच्या वसुलीसाठी बॅड बँकेची घोषणा; कशी काम करणार बॅड बँक?

बँकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि कर्ज बुडव्यांकडून वसुली करण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली आहे. सीताराम यांनी अर्थसंकल्पातून बॅड बँकेची घोषणा केली आहे. त्यासाठी 20 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सुधारणा होणार आहे. आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात बॅड बँकची संकल्पना मांडण्यात आली आहे. या बॅड बँकेला डेव्हल्पेमेंट फायनान्स इन्सिट्यूशनच्या नावाने ओळखले जाणार आहे. (budget 2021 bank deposit insurance increases from 1 lakh to rs 5 lakh announced nirmala sitharaman)

संबंधित बातम्या –

Union Budget 2021 Marathi LIVE :पेट्रोलची शंभरी निश्चित, डिझेलही भडकणार, अर्थमंत्र्यांची सेसची मोठी घोषणा

Budget 2021: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LIC चे खासगीकरण, लवकरच IPO बाजारात येणार

budget 2021 : अर्थसंकल्पाला सुरुवात होताच शेअर बाजारात आनंद, 800 अंकांनी सेन्सेक्सची उसळी

Stocks to Buy Today: बजेटच्या दिवशी या शेअर्सवर असुद्या लक्ष, बक्कळ वाढेल पैसा

बजेटच्या दिवशी सोने स्वस्तात खरेदी करण्याची संधी; 10 ग्रॅम सोने खरेदी केल्यास इतक्या रुपयांची सूट

(budget 2021 bank deposit insurance increases from 1 lakh to rs 5 lakh announced nirmala sitharaman)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.