Stock Market Update : अर्थसंकल्पाची घोषणा होताच शेअर बाजार उसळणार, काय असेल चाल?

गेल्या 11 वर्षांचा विचार केला तर बजेटच्या दिवशी शेअर बाजारात घसरण होत आली. अशात कोरोनाच्या जीवघेण्या काळात आर्थिक परिस्थिती आणखी ढासळली.

Stock Market Update : अर्थसंकल्पाची घोषणा होताच शेअर बाजार उसळणार, काय असेल चाल?
Follow us
| Updated on: Feb 01, 2021 | 9:30 AM

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्प 2021 ची (Union Budget 2021) घोषणा झाल्यानंतर शेअर बाजारातील हालचाल पाहायला मिळेल. आज संसदेत आर्थिक वर्ष 2021-22 चं सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. गेल्या 11 वर्षांचा विचार केला तर बजेटच्या दिवशी शेअर बाजारात घसरण होत आली. अशात कोरोनाच्या जीवघेण्या काळात आर्थिक परिस्थिती आणखी ढासळली. सध्या प्रत्येक क्षेत्रात सुधारणा होताना दिसून आली तरी आर्थिक सर्वेक्षणानुसार पुढील आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर 11 टक्क्यांहून अधिक राहण्याचा अंदाज आहे. तथापि, आर्थिक पाहणीचा हा अंदाज असूनही, गेल्या आठवड्यात बाजारात घसरण कायम आहे. (budget 2021 budget stock market live updates on union budget)

शुक्रवारी बीएसईच्या 30 शेअरवर आधारित प्रमुख सेन्सेक्स 2,592.77 अंक म्हणजेच 5.30 टक्क्यांनी घसरून 46,285.77 वर बंद झाला होता. तर एनएसईच्या 50 शेअरवर आधारित प्रमुख निफ्टीही मागच्चा आठवड्याच्या तुलनेत 737.30 अंकांनी म्हणजेच 5.13 टक्क्यांनी घसरून 13,634.60 वर बंद झाला. या महिन्यात ऐतिहासिक उच्चांपर्यंत पोहोचल्यानंतर सेन्सेक्स जवळपास 4,000 अंकांनी कमी झाल्याचं पाहायला मिळालं. तर निफ्टी 1,000 अंकांनी खाली आली आहे.

एमपीसी बैठकीचा निर्णय

व्यावसायिक आठवड्याच्या शेवटच्या शुक्रवारी रिझर्व्ह बँकेच्या द्वि-मासिक चलनविषयक आढावा बैठकीत घेण्यात येणाऱ्या निर्णयाची घोषणा करण्यात येणार आहे. याची ही शेवटची आर्थिक आढावा बैठक असणार आहे. इतकंच नाही तर यामुळे जाहीर करण्यात आलेल्या आर्थिक आकडेवारी, ऑटो कंपन्यांची विक्री आकडेवारी आणि चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीतील वित्तीय निकालांचादेखील स्थानिक शेअर बाजारावर मोठ्या प्रमाणात परिणाम होईल.

मार्केट मॅन्युफॅक्चरिंगच्या पीएमआयचे जानेवारी महिन्यातील आकडेवारी सोमवारीच जाहीर करण्यात येईल. तर सर्विसेस सेक्टरमधील पीएमआयचे आकडे बुधवारी जाहीर करण्यात येणार आहे. 1 फेब्रुवारीपासून वाहन कंपन्यांचे जानेवारीत विक्रीचे आकडे जाहीर होण्यास सुरुवात होईल. देशाच्या शेअर बाजाराची चाल ठरवण्यासाठी देशातील आणि परदेशातील हालचाली महत्त्वाच्या ठरणार आहेत.

बजेटच्या आधीच GST चं रेकॉर्ड कलेक्शन

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी 2021 रोजी म्हणजे आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पातून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा अर्थमंत्री निर्मला सीतारमण प्रयत्न करणार आहेत. पण त्याआधीच सरकारला दिलासा देणारी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जानेवारीत जीएसटी कलेक्शनच्या रेकॉर्डमध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. जानेवारीत जीएसटीचं एकूण कलेक्शन 1.20 लाख कोटींवर पोहोचलं आहे. रविवारी वित्त मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2021 मधील जीएसटी कलेक्शन मागच्या वर्षाच्या तुलनेत आठ टक्क्यांनी वाढलं आहे. यावेळी अर्थ मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, ’31 जानेवारी 2021 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जीएसटी कलेक्शन 1,19,847 कोटी रुपये होतं. यामध्ये केंद्रीय जीएसटी (CGST) 21,923 कोटी रुपये, राज्ये जीएसटी (SGST) 29,014 कोटी, एकिकृत जीएसटी (IGST) रुपये 60,288 कोटी आणि सेर 8,622 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. इतकंच नाहीतर जीएसटी विक्री परतावा भरल्याची संख्या जास्त असल्यामुळे हा आकडा आणखी जास्त असू शकणार आहे. (budget 2021 budget stock market live updates on union budget)

संबंधित बातम्या – 

Budget Marathi 2021 LIVE : सीतारमण यांच्याकडून राष्ट्रपतींकडे बजेटची प्रत सुपूर्द

Budget 2021 सादर होण्याआधीच सरकारला मिळाली Good News, जानेवारीत ‘असा’ झाला फायदा

Budget 2021: अर्थसंकल्पाच्या दिवशीच विमान प्रवाशांना धक्का; जेट इंधन महागले

(budget 2021 budget stock market live updates on union budget)

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.