कोरोना काळात शेतीनं दिली साथ, यंदाच्या Budget मध्ये मिळणार का शेतकऱ्यांना दिलासा?
कोरोना काळातील अर्थव्यवस्था टिकवण्यासाठी कृषी क्षेत्राने मुख्य भूमिका बजावली. त्यामुळेच यंदाच्या अर्थसंकल्पात या क्षेत्राला मोठ्या सवलती मिळण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : एकीकडे देशामध्ये शेतकरी आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू आहे तर दुसरीकडे सगळ्यांचं लक्ष सध्या कृषी क्षेत्रावर आहे. कोरोना काळातील अर्थव्यवस्था टिकवण्यासाठी कृषी क्षेत्राने मुख्य भूमिका बजावली. त्यामुळेच यंदाच्या अर्थसंकल्पात या क्षेत्राला मोठ्या सवलती मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याबाबत काही ठोस घोषणा करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (budget 2021 modi government will give farmers income doubling )
2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन सरकार वारंवार बोलून दाखवत आहे. त्यानुसार आता यंदाच्या अर्थसंकल्पात हे लक्ष्य गाठण्याची शेवटची संधी सरकारकडे आहे. खरंतर, गेल्या अनेक दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं नाही. त्यामुळे आताच्या बजेटमध्ये तरी शेतकरी सुखावणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.
खरंतर, मनमोहन सरकारमधील शेतकऱ्यांचं मासिक उत्पन्न 6426 रुपये होतं. मोदी सरकारमध्ये हा आकडा वाढून 8931 पर्यंत वाढला. म्हणजेच मागच्या 6 वर्षात शेतकऱ्यांच्या उत्पन्नात फक्त 2 हजार 505 रुपयांची वाढ झाली आहे.
याविषयी आणखी बोलायचं झाल्यास 2022-23 पर्यंत शेतकर्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शेतीच्या विकासाचा दर दहा टक्के असायला हवा होता. पण सध्या मात्र शेतीचा वार्षिक वाढीचा दर फक्त 2.9 टक्के आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतीच्या विकासाचा दर 15 टक्क्यांहून अधिक असणं आवश्यक आहे.
शेतकऱ्यांना योग्य तो नफा मिळत नसला तरी शेतीच्या बाबतीत ते मागे नाही. आज शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती झाल्याचं पाहायला मिळतं. 2017-18 आणि 2018-19 मध्ये तब्बल 2,850 लाख टन शेतीचं उत्पादन झालं. यानंतर 2019-20 मध्ये कृषी उत्पन्न 4 टक्क्यांनी वाढून 2,967 लाख टन इतकं झालं. म्हणजेच, 2 वर्षांत धान्य, डाळी आणि तेलबियांच्या उत्पादनात 117 लाख टन वाढ झाली आहे.
भाज्या आणि फळांच्या उत्पादनातही 2017-18 ते 2019-20 या दोन वर्षात 2.81 टक्क्यांनी वाढ झाल्याचं सांगण्यात येत आहे. म्हणजेच 93 लाख टन वाढ झाली. 2018-19 च्या तुलनेत यामध्ये 3 टक्क्यांनी अधिक वाढ म्हणजेच 87.58 लाख टन वाढ झाली आहे. (budget 2021 modi government will give farmers income doubling )
संबंधित बातम्या –
Budget 2021 : अनेक वस्तूंवरील सीमा शुल्क घटण्याची शक्यता, कोणत्या वस्तू स्वस्त होणार?
Budget 2021 : Work From Home करणाऱ्यांना मिळू शकते प्राप्तिकरात मोठी सूट
Budget 2021 : हे 10 शेअर मिळवून देतील बक्कळ पैसा, वाचा सविस्तर….
(budget 2021 modi government will give farmers income doubling )