Budget 2022 : क्रिप्टोवर सरकारची नजर, अर्थसंकल्पात होऊ शकते मोठी घोषणा

क्रिप्टो करन्सीबाबत देशाचे धोरण काय असावे यासंदर्भात केंद्र सरकार कायदा करण्याच्या तयारीत आहे. याच क्रिप्टो करन्सीबाबत उद्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये एखादी मोठी घोषणा होऊ शकते.

Budget 2022 : क्रिप्टोवर सरकारची नजर, अर्थसंकल्पात होऊ शकते मोठी घोषणा
क्रिप्टोकरन्सीबाबत महत्त्वाची माहिती
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 7:01 PM

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (fm Nirmala Sitharaman) उद्या म्हणजेच 1 फेब्रुवारी 2022 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2022) सादर करणार आहेत. हा त्यांचा चौथा अर्थसंकल्प असणार आहे. सामान्य लोकांच्या गरजांशी संबंधित प्रस्ताव तसेच अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी या अर्थसंकल्पात पाऊले उचलली जातील अशी अपेक्षा आहे. यंदाच्या अर्थसंकल्पाकडून विविध क्षेत्राला वेगवेगळ्या अपेक्षा आहेत. दरम्यान सध्या एक मुद्दा चांगलाच गाजतो आहे तो म्हणजे क्रिप्टो करन्सींचा (Cryptocurrencies). क्रिप्टो करन्सीबाबत देशाचे धोरण काय असावे यासंदर्भात केंद्र सरकार कायदा करण्याच्या तयारीत आहे. याच क्रिप्टो करन्सीबाबत उद्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये एखादी मोठी घोषणा होऊ शकते. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने अनेक वेळा क्रिप्टो करन्सीच्या धोक्यांबद्दल चेतावणी दिली आहे. मात्र दुसरीकडे उद्योजकांकडून क्रिप्टो करन्सीला अधिकृत मान्यता देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. परंतु सरकारने अद्याप क्रिप्टो करन्सीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. यासोबतच या चलनाबाबत आतापर्यंत कोणतेही धोरण आणलेले नाही. मात्र, या अर्थसंकल्पात क्रिप्टोबाबत एखादा मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

अर्थसंकल्पात क्रिप्टोवर चर्चा अपेक्षीत

या अर्थसंकल्पात क्रिप्टो करन्सी किंवा टोकन्सवर बरीच चर्चा होण्याची शक्यता विश्लेषक व्यक्त करत आहेत. या अर्थसंकल्पात क्रिप्टो करन्सीवर स्वतंत्र कर तरतूद केली जाऊ शकते, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. असे झाल्यास क्रिप्टोच्या भविष्याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट होईल. दरम्यान दुसरीकडे मीडिया रिपोर्टनुसार कर कपातीमध्ये देखील बदल केली जाण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अपेक्षानुसार अर्थमंत्री 80C अंतर्गत उपलब्ध कपातीची मर्यादा अनेक पटींनी वाढवू शकतात. याशिवाय नवीन कर प्रणालीमध्ये अधिक उत्पन्न असलेल्यांनाही दिलासा मिळू शकतो.

क्रिप्टोमधील गुंतवणूक वाढली

गेल्या काही दिवसांपासून क्रिप्टोअर्थसंकल्पाचा शेअर मार्केटवर सकारात्मक परिणाम; सेन्सेक्स वधारला, निफ्टीमध्ये देखील वाढमधील गुंतवणूक सातत्याने वाढत आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे गेल्या वर्षभरापासून सोन्याचे दर अस्थिर आहेत. सोन्याच्या दरात होत असलेल्या चढ-उतारामुळे अनेकांनी सोन्यामधील आपली गुंतवणूक कमी करून क्रिप्टोमध्ये गुंतवली आहे. त्यामुळे लोकप्रिय किप्टो करन्सी असलेल्या बीटकॉईनच्या दरामध्ये तेजी पहायाला मिळत आहे. क्रिप्टोबाबत प्रत्येक देशाचे धोरण हे वेगवेगळे असल्याने त्याचा मोठा फटका हा या क्षेत्रात बसत असल्याचे पहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या

सोन्याच्या दरात तेजी, चांदी झाली स्वस्त: जाणून घ्या आजचे भाव

अर्थसंकल्पाचा शेअर मार्केटवर सकारात्मक परिणाम; सेन्सेक्स वधारला, निफ्टीमध्ये देखील वाढ

Economic Survey 2022 : जाणून घ्या आर्थिक सर्वेक्षणातील दहा महत्त्वाचे मुद्दे

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.