Budget 2022: अर्थसंकल्पात हेल्थकेयर क्षेत्राला प्राधान्य? GDP फंडमध्ये वाढ करण्याची मागणी

Budget 2022 : अर्थसंकल्प 2022 मध्ये आरोग्य सेवा क्षेत्रासाठी आवश्यक असणाऱ्या तरतुदीवर विशेष लक्ष दिले जावे सोबतच या क्षेत्रातील ज्या काही तफावती आहेत त्या कमी करण्यासाठी आवश्यक ते मार्ग काढायला हवेत.

Budget 2022: अर्थसंकल्पात हेल्थकेयर क्षेत्राला प्राधान्य? GDP फंडमध्ये वाढ करण्याची मागणी
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 10:43 PM

हेल्थकेयर सेक्टर येणाऱ्या अर्थसंकल्पाकडे (Budget 2022) बारीक लक्ष ठेवून आले.  येणाऱ्या दिवसांमध्ये या क्षेत्राला प्राथमिक क्षेत्राचे असे विशिष्ट दर्जा मिळायला हवे यासोबतच आरोग्य सेवा क्षेत्र या येणाऱ्या अर्थसंकल्पाकडून अनेक इच्छा, अपेक्षा अनेकांना आहे. आरोग्य क्षेत्रातील ज्या काही तफावती आहेत, त्या तफावती दूर केल्या गेल्या पाहिजेत या अनुषंगाने भविष्यात आवश्यक ते सर्व मार्ग काढायला हवेत. तफावत दूर करून घरेलू उत्पादनाचे (GDP) त 3 टक्के वाढ केली जावी. खाजगी क्षेत्रातील आरोग्यसेवा कंपनीने असे म्हटले आहे की, सरकारने अर्थसंकल्पामध्ये कर प्रोत्साहनासाठी काही विशिष्ट पावले उचलायला हवी. छोट्या शहरातील चिकिस्ता सुविधांना आवश्यक त्या गोष्टी आणि श्रमाबद्दल विकसित करण्यासाठी लक्ष केंद्रित करावे लागेल. आपल्याला सांगू इच्छितो की, 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री (Finance Minister) निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

फोर्टिस हेल्थकेयर (Fortis Healthcare) चे मॅनेजर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आशुतोष रघुवंशी यांनी सांगितले की, ‘‘सरकार ने 2021 मध्ये येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये आरोग्य आणि जीवनाला पहिल्या सहा स्तंभामध्ये ठेवले होते. आर्थिक वर्ष 2022 मध्ये सुद्धा याच अनुषंगाने विचार केला जावा. या क्षेत्राच्या संरचनाबद्दल ज्या काही तफावती आहेत त्यावर विशेष करून लक्ष देणे गरजेचे आहे तसेच दुसरीकडे तिसऱ्या श्रेणी अंतर्गत शहरांमध्ये आरोग्यसेवा तपासणी केंद्र ,व्हेंटिलेटर ventilators), आयसीयू, क्रिटिकल केयर सुविधा आणि ऑक्‍सिजनचे प्लांट (oxygen plant) निर्मिती करण्यावर सुद्धा भर द्यायला हवी.

त्यांनी सांगितले की,रोग-निरोधक आरोग्य,तपासणी आणि आवश्यक चाचण्या संदर्भातील राष्ट्रीय अभियान चालवण्यासाठी एका वेगळ्या अर्थ संकलपाची तरतूद करणे गरजेचे आहे. रघुवंशी यांनी म्हंटले की, आरोग्य सेवा क्षेत्राला विशेष असे प्राधान्य दिले पाहिजे.

R&D साठी प्रोत्साहनाची मागणी

अपोलो हॉस्पिटल्स ग्रुप (Apollo Hospitals Group) च्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालक संगीता रेड्डी यांनी सांगितले की, महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे भारताची एकंदरीत क्षमता सर्वांना कळाली आहे. भारत देश हा औषधे आणि लसीकरणाच्या संशोधनामध्ये तसेच विकास( R&D) करण्याच्या अनुषंगाने वैश्विक केंद्र बनू शकतो यासाठी येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये संशोधन आणि विकास या क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल अश्या बद्दल काही संधी निर्माण करणे याबाबत विचार करायला हवा.

एशिया हेल्थकेयर होल्डिंग्स (Asia Healthcare Holdings) चे कार्यकारी चेयरमॅन विशाल बाली यांनी सांगितले की, महामारीमुळे अनेक लाटा भारतामध्ये आलेल्या आहेत आणि या सर्व गोष्टींमुळे भारतातील आरोग्य सेवा किती अपूर्ण आहे तसेच या क्षेत्रातील आवश्यक पायाभूत सुविधा, लोक आणि तंत्रज्ञानातील मागणी-पुरवठ्यातील अनेक त्रुटीवर प्रकाश टाकला गेलेला आहे आणि म्हणूनच आरोग्य क्षेत्रात या दृष्टिकोनातून आवश्यक ती पावले उचलायला हवीत.

कस्टम ड्यूटी, GST मध्ये मिळावी सवलत

वीनस रेमेडीज (Venus Remedies President) चे अध्यक्ष (ग्लोबल क्रिटिकल केयर) सारांश चौधरी यांनी सांगितले की,अनेक फार्मा कंपनीद्वारे संशोधन आणि विकासाठी खरेदी केले जाणारे साहित्यावर लावले जाणारे सीमा शुल्क (Custom Duty) आणि माल व सेवा कर (GST) वर विशेष अशी सवलत दिली जावी.

केंद्रीय अर्थमंत्री 1 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर करतील. Firstpost पब्लिक केलेल्या रिपोर्टमध्ये असे लिहिले आहे की , हे भाषण किती वेळ सादर केले जाईल , भाषणाचा एकंदरीत कालावधी किती असेल, अंदाज आहे की हे भाषण सादर करण्यासाठी लागणारा कालावधी दीड ते दोन तास असू शकतो तसेच त्यापेक्षा सुद्धा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे, या बद्दल काही महत्वाच्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. आर्थिक वर्ष 2020 मध्ये अर्थसंकल्पीय भाषण 2 तास 40 मिनिटे पर्यंत चालले होते आणि हे भाषण आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात जास्त काळ अर्थसंकल्प सादर करणारे ठरले.

संबंधित बातम्या :

BUDGET JOB LOOSER : कोरोना काळातील बेरोजगारांच्या बजेटकडून काय आहेत अपेक्षा ?

BUDGET FOR INVESTOR : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांच्या बजेटकडून अपेक्षा पूर्ण होतील ?

BUDGET 2022 : ‘टीम निर्मला’… अर्थमंत्र्यांचं भाषण कोण लिहितं? कहाणी बजेट घडविणाऱ्या हातांची!

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.