Budget 2024 | महिन्याला 300 युनिट Free वीज मिळवा, सोबत 18 हजार रुपयेही कमवा, काय आहे ‘ही’ योजना
Budget 2024 | नरेंद्र मोदी सरकारने आजच्या बजेटमध्ये एक महत्त्वाची घोषणा केलीय. यात लोकांचा फायदा आहे. लोकांना दर महिन्याला मोफत 300 युनिट वीज मिळेल, सोबत पैसाही कमावता येईल. या योजनेद्वारे मोदी सरकारने एक चांगल्या उपक्रमाची सुरुवात केली आहे.
Budget 2024 | मोदी सरकार 2.0 च शेवटच बजेट गुरुवारी सादर झालं. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अंतरिम बजेट सादर केलं. सीतारमण यांनी जवळपास 1 तास भाषण केलं. पण या भाषणात चर्चा होईल, अशी कुठलीही मोठी घोषणा केली नाही. या बजेटमधून मध्यम वर्गाला कोणाताही दिलासा मिळाला नाही. सरकारने इनकम टॅक्सच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल केला नसल्याच स्पष्ट झालं. पण सरकारने देशातील 1 कोटी कुटुंबांना दर महिन्याला मोफत 300 युनिट वीज देण्याची घोषणा केली आहे.
आता प्रश्न हा आहे की, मोदी सरकार जनतेला ही सुविधा कशी देणार?. निर्मला सीतारमण यांनी आपल्या भाषणात याची माहिती सुद्धा दिली. रूफ-टॉप सोलरायजेशनच्या माध्यमातून 1 कोटी कुटुंबांना दर महिन्याला 300 युनिट मोफत वीज मिळू शकते. अयोध्येत राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी संकल्प केलेला, ही योजना त्याच अनुसरण करणारी आहे. सूर्योदय योजनेतंर्गत घराच्या छतावर सोलर पॅनल बसवणाऱ्या कुटुंबाला दर महिन्याला 300 युनिट मोफत वीज मिळेल.
या योजनेतून पैसे कमवा, रोजगाराचीही संधी
सौरऊर्जेतून निर्माण होणारी वीज आणि त्यानंतर अतिरिक्त वीज वितरण कंपनीला विकल्यास दरवर्षाला त्या कुटुंबाला 15 ते 18 हजार रुपये मिळतील. त्याशिवाय इलेक्ट्रिक वाहनांची चार्जिंग सुद्धा शक्य आहे. छपरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी इंस्टॉलेशन वाढेल, त्यामुळे वेंडर्सना उद्योग करण्यासाठी व्यवसायाची संधी आहे. या सोलार पॅनलच्या मेंन्टेन्सची गरज पडेल, त्यातून युवकांना रोजगाराची संधी आहे.