नवी दिल्ली, दि.1 फेब्रुवारी 2024 | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. सर्वाचे लक्ष असलेल्या आयकर पद्धतीत काय बदल होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता लोकसभा निवडणुका होणार आहे. यामुळे मध्यमवर्गींना खूश करण्यासाठी आयकराची मर्यादा वाढवण्याची अपेक्षा होती. परंतु अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आयकर पद्धतीत काहीच बदल केला नाही. मागील वर्षांप्रमाणे आयकर राहणार आहे. म्हणजेच सात लाखांपर्यंत उत्पन्नावर कोणताही कर राहणार नाही.
मागील वर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पात 7 लाख रुपयांचे उत्पन्न करमुक्त केले होते. त्यानंतर 8 लाखांचे उत्पन्न असणाऱ्यांना 35 हजार रुपये कर भरावा लागणार आहे. तर 9 लाख उत्पन्न असणाऱ्यांना 45 हजार, 10 लाख उत्पन्नावर 60 हजार, 12 लाख उत्पन्नावर 90 हजार आणि 15 लाख उत्पन्नावर 1 लाख 50 हजार रुपये टॅक्स भरावा लागणार आहे. यावर्षी हा स्लॅब कायम आहे. त्यात कोणताही बदल केला नाही.
मागील वर्षी दोन प्रणाली लागू केल्या होत्या. त्यात नवीन प्रणाली घेणाऱ्या करदात्यांना सात लाखांपर्यंत कर नाही. परंतु जुनी प्रणाली काय आहे. त्या प्रणालीत विविध सुट दिली जाते. त्यासाठी गुंतवणूक आणि करसवलतीचे पुरावे द्यावे लागतात. म्हणजेच तीन लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असणार आहे.
सरकारने 1 एप्रिल 2020 मध्ये आयकरदात्यांना दोन पर्याय दिले. विविध कर सवलतीच्या लाभ न घेणाऱ्यांना सात लाखपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले. तसेच जुनी कर सवलीतीची प्रणाली कायम ठेवली. त्यात 80C अंतर्गत 1,50,000 पर्यंत सुट दिली जाते.