1 मार्चपासून तुमचं आर्थिक गणित बदलणार, गॅस सिलेंडर ते बँकेच्या कामात होणार मोठे बदल
एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीपासून (LPG Gas Cylinder Price) ते बँकेच्या आयएफएससी कोडपर्यंतच्या (IFSC Code) आर्थिक बदल होणार आहेत.
नवी दिल्ली : 1 मार्च 2021 (Changes from 1st March) पासून तुमच्या बँक आणि पैशाशी संबंधित अनेक बदल होणार आहेत. तुम्हालाही या बदलांविषयी माहिती असणं महत्त्वाचं आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीपासून (LPG Gas Cylinder Price) ते बँकेच्या आयएफएससी कोडपर्यंतच्या (IFSC Code) आर्थिक बदल होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होईल. चला आम्ही आपल्याला काही महत्त्वपूर्ण बदलांविषयी सांगू… (business news changes will effective from 1st march 2021 know about it in details)
1. बँक ऑफ बडोदाचे ग्राहक अलर्ट व्हा…
बँक ऑफ बडोदा आणि पंजाब नॅशनल बँकेने नवे नियम जारी केले आहेत. त्यामुळे बदललेल्या नियमांमुळे सामान्यांच्या जीवनावर काय परिणाम पडणार, याविषयी माहिती असणं गरजेचं आहे. आगामी काही दिवसांत बँकिंग क्षेत्रात अनेक मोठे बदल होणार आहेत. विशेषत: बँक ऑफ बड़ोदा (Bank of Baroda) आणि पंजाब नॅशनल बँकने (PNB-Punjab National Bank) आपले नवे नियम जारी केले आहेत. पंजाब नॅशनल बँकेने ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC) आणि यूनियन बँक ऑफ इंडिया (UBI) या बँकेचे जुने चेक तसेच या बँकांचे IFSC/MICR कोड 31 मार्च 2021 नंतर चालणार नसल्याचं म्हटंलय. तसेच बँक ऑफ बडोदानेसुद्धा ई-विजया आणि ई-देना या बँकांचे जुने आईएफएससी (IFSC) कोड 1 मार्च 2021 पासून बंद होणार असल्याचं म्हटलेलं आहे.
2. बँकेचे आयएफएससी कोड कसे मिळवावे
विजया आणि देना बँकेचे आयएफएससी कोड 1 मार्चपासून चालणार नसले तरी, बँक ऑफ बडोदाने नवे आयएफएससी कोड मिळवण्यासाठी ग्राहकांना पर्याय उपलब्ध करुन दिलेला आहे. ग्राहकांना नवा आयएफएससी कोड हवा असेल तर बँकेच्या वेबसाईटवर जाऊन तो मिळवता येऊ शकतो. तसेच, 18002581700 या टोल फ्री नंबरुनसुद्धा आयएफएससी कोड मिळवता येईल. बँक ऑफ बडोदा बँकेने आयएफएससी कोड मिळवण्यासाठी 8422009988 हा नंबरुसुद्धा जारी केला आहे. या नंबरवर फोन केल्यानंतर ग्राहकांना त्यांच्या बँकेचे नवे आयएफएससी कोड मिळतील.
3. 1 मार्चपासून धावणार विशेष गाड्या
भारतीय रेल्वे 1 मार्चपासून अनेक विशेष गाड्या चालवण्यास सुरूवात करणार आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील प्रवाशांना या विशेष गाड्यांच्या धावण्यातून जास्तीत जास्त दिलासा मिळणार आहे. या व्यतिरिक्त पश्चिम रेल्वेने 11 जोड्या म्हणजेच 22 नवीन विशेष गाड्या वेगवेगळ्या मार्गांवर चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या दिल्ली, मध्य प्रदेश, मुंबईसह अनेक मार्गांवर धावतील. त्यामध्ये काही गाडय़ा सुरू झाल्या आहेत. त्याचबरोबर 1 मार्च 2021 पासून काही गाड्या चालविण्यात येतील.
4. गॅस सिलेंडरच्या किंमतीत होईल बदल
जर सरकारी तेल कंपन्यांनी महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडर्सच्या किंमतींमध्ये बदल झाला तर 1 मार्च रोजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल होऊ शकतो. इतकंच नाही तर कंपन्यांनी फेब्रुवारी महिन्यात सिलेंडरच्या किंमतीत तीन वेळा वाढ केली आहे.
5. मार्चमध्ये बँका 11 दिवस बंद राहतील
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) हॉलिडे कॅलेंडरनुसार, मार्चमध्ये होळी आणि महाशिवरात्रीसह एकूण 11 दिवस बँकांना सुट्टी असेल. यापैकी 5 मार्च, 11 मार्च, 22 मार्च, 29 मार्च आणि 30 मार्च रोजी बँकांना सुट्टी असेल. त्याशिवाय 4 रविवार आणि 2 शनिवारीही बँका बंद राहतील. म्हणजेच मार्च महिन्यात एकूण 11 दिवस बँकांमध्ये काम होणार नाही.
मार्च 2021 मध्ये बँकांना असलेल्या सुट्ट्या
5 मार्च, शुक्रवार, फक्त मिझोरममध्ये सुट्टी 7 मार्च, रविवार 11 मार्च, गुरुवार, महाशिवरात्री 13 मार्च, दुसरा शनिवार 14 मार्च, रविवार 21 मार्च, रविवार 22 मार्च, सोमवार, बिहार दिन, फक्त बिहारमध्ये सुटी 27 मार्च, चौथा शनिवार 28 मार्च, रविवार, होळी 29 मार्च, सोमवार, धूलिवंदन 30 मार्च, मंगळवार, राजस्थान दिवस (business news changes will effective from 1st march 2021 know about it in details)
संबंधित बातम्या –
प्लॅटिनम कार्ड, दोन लाखाचा विमा आणि बरंच काही, Bank of Baroda ची महिलांसाठी खास योजना
प्रत्येक महिन्याला कमवा बक्कळ पैसा, Post Office ची खास योजना, वाचा किती होणार फायदा?
फक्त 94 रुपयांमध्ये मिळेल गॅस सिलेंडर, आज आहे शेवटची संधी; ‘असा’ करा बूक
(business news changes will effective from 1st march 2021 know about it in details)