31 जानेवारीपर्यंत फ्रीमध्ये बुक करा सिलेंडर, ‘हा’ आहे प्रोमो कोड

ही खास ऑफर म्हणते गॅस सिलेंडरसाठी तुम्हाला जी रक्कम लागेल ती परत केली जाईल. मोबाइल वॉलेट प्लॅटफॉर्म पेटीएमने ही ऑफर ग्राहकांना दिली आहे.

31 जानेवारीपर्यंत फ्रीमध्ये बुक करा सिलेंडर, 'हा' आहे प्रोमो कोड
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 10:53 AM

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटामुळे प्रत्येकजण आर्थिक संकटात आहे. अशात सिलेंडरचा एक खर्च कमी करुन तुम्हाला अगदी मोफत मिळवायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एलपीडी सिलेंडर (LPG Cylinder) फ्रीमध्ये मिळवण्याची एक खास ऑफर आहे. 31 जानेवारी आधी जर तुम्ही एलपीजी सिलेंडर बुक केला तर थेट मोफत हा तुमच्यापर्यंत डिलिव्हर केला जाईल. ही खास ऑफर म्हणते गॅस सिलेंडरसाठी तुम्हाला जी रक्कम लागेल ती परत केली जाईल. मोबाइल वॉलेट प्लॅटफॉर्म पेटीएमने ही ऑफर ग्राहकांना दिली आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना पेटीएमद्वारे एकदाच गॅस सिलिंडर बुक करावा लागणार आहे. (buy lpg gas cylinder free by paytm 100 percent cashback offer for first time user here is the promo code)

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही ऑफर फक्त त्याच ग्राहकांना मिळणार आहे जे पहिल्यांना पेटीएमधून गॅस सिलिंडर बुक करत आहेत. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला मोबाइलमध्ये पेटीएम डाऊनलोड करावं लागेल. यानंतर तुम्ही पेटीएमवरून एलपीजी गॅस सिलिंडर बुक करुन या ऑफरचा लाभ घेऊ शकता. यामध्ये सिलेंडरचे सगळे पैसे तुम्हाला कॅशबॅकमध्ये परत मिळतील. यामध्ये तुम्हाला 700 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो. हा फायदा पेटीएमकडून पहिल्यांदाच गॅस सिलिंडर बुकिंगवर उपलब्ध आहे.

Paytm कडून 700 रुपयांच्या कॅशबॅक मिळवण्यासाठी संपूर्ण प्रोसेस

–  फोनमध्ये पेटीएम डाउनलोड करा

–  त्यानंतर ‘recharge and pay bills’ वर जा.

–  आता ‘book a cylinder’ पर्याय उघडा.

–  भारत गॅस, एचपी गॅस किंवा इंडेनमधून तुमचा गॅस निवडा.

–  नोंदणीकृत मोबाइल नंबर किंवा तुमचा एलपीजी आयडी भरा

–  यानंतर तुम्हाला पेमेंटचा पर्याय दिसेल.

–  आता देय देण्यापूर्वी ‘FIRSTLPG’ प्रोमो कोड ऑफरमध्ये भरा.

या ऑफरचा लाभ घेण्यासाठीची अट

तुमची बुकिंगची रक्कम 500 रुपये किंवा त्याहून अधिक असेल तरच पेटीएम ऑफरचा लाभ घेता येणार आहे. ही ऑफर फक्त 31 जानेवारीपर्यंत लागू करण्यात आली आहे. तुम्ही बील दिल्यावर एक स्क्रॅच कूपन मिळेल. बुकिंगच्या 24 तासात हे कूपन मिळेल. हे कूपन 7 दिवसांच्या आत उघडा. यानंतर तुमच्या खात्यात कॅशबॅक येईल. (buy lpg gas cylinder free by paytm 100 percent cashback offer for first time user here is the promo code)

संबंधित बातम्या – 

Petrol Price Hike : आजही पेट्रोलच्या दरांमध्ये वाढ; नांदेड, परभणीत सगळ्यात महाग पेट्रोल

मोठी बातमी! 21 हजार रुपयांपर्यंत महिना पगार असणाऱ्यांना 1 एप्रिलपासून जबरदस्त फायदा

फेब्रुवारी 1 पासून व्यवहारातील या 5 गोष्टी बदलणार, थेट तुमच्या खिशावर होईल परिणाम

(buy lpg gas cylinder free by paytm 100 percent cashback offer for first time user here is the promo code)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.