Indias Property Rate | घर खरेदीचा प्लॅन करताय ? मग बघा जगाच्या तुलनेत आपल्याकडे किती स्वस्त? किती महाग ?

न्यूझीलंडनंतर तुर्कीचा क्रमांक लागतो, जेथे एका वर्षात घरांच्या किंमतीत 15.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Indias Property Rate | घर खरेदीचा प्लॅन करताय ? मग बघा जगाच्या तुलनेत आपल्याकडे किती स्वस्त? किती महाग ?
Follow us
| Updated on: Dec 12, 2020 | 12:10 PM

मुंबई : आपल्या हक्काचं घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. जगाच्या तुलनेत भारतात घरांच्या किंमतीत (Indias Property Rate)  घट झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. 2019 च्या तिसर्‍या तिमाहीच्या तुलनेत 2020 च्या तिसर्‍या तिमाहीत भारतातील सरासरी घरांची किंमत 2.4 टक्क्यांनी घसरली आहे. यानंतर, ग्लोबल होम प्राइस इंडेक्समध्ये भारताची 7 स्थानांची घसरण झाली आहे. यामुळे भारत 54 व्या स्थानावर आला आहे. भारत 2019 च्या तिसर्‍या तिमाहीत 47 व्या स्थानावर होता. आंतरराष्ट्रीय मालमत्ता सल्लागार नाइट फ्रँक यांनी एक संशोधन केलं. ‘ग्लोबल हाऊस प्राइस इंडेक्स थर्ड क्वार्टर 2020’ या संशोधन अहवालात याबाबत सांगितलं. Buying a house in India is easier than the whole world, prices have come down

निर्देशांकानुसार, 2020 मधील दुसऱ्या तिमाही रॅंकिंग आणि तिसऱ्या तिमाही रॅंकिगमध्ये कोणताही बदल झाला नाही. कारण भारत दुसऱ्या तिमाहीत 56 देशांपैकी 54 व्या स्थानावर होता. ग्लोबल रेसिडेन्ट प्राइस इंडेक्स (global house price index) सरकारी आकडेवारीच्या साहाय्याने घरांच्या किंमतीचं विश्लेषण करतं. 2020 मधील तिसऱ्या तिमाहीत तुर्की देशाने निर्देशंकात पहिला क्रमांक मिळवला आहे. तुर्कीत दर वर्षी घरांच्या किंमतीत 27.3 टक्क्यांनी वाढ होते.

दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड

तुर्कीनंतर न्यूझीलंडचा क्रमांक आहे. अर्थात न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडमध्ये वर्षभरात घरांच्या किंमतीत 15.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर लक्जमबर्ग 13.4 टक्के इतक्या दरवाढीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर मोरक्को या यादीत शेवटच्या क्रमांकावर आहे. मोरक्कोमध्ये वर्षभरात घरांच्या दरात 3.3 टक्क्यांनी घट झाली आहे. या रिपोर्टनुसार आयर्लंड, स्पेन, भारत आणि हॉंगकॉंग या देशात घरांच्या किंमती सर्वात कमी राहिल्या आहेत.

नाईट फ्रँक इंडियाने (इंडिया रिअल इस्टेट अपडेट, जुलै-सप्टेंबर 2020) केलेल्या अहवालात भारतातील आठ प्रमुख शहरांच्या निवासी आणि ऑफीसचे वर्णन केलं आहे. त्यात म्हटलं आहे की, “तिमाहीच्या आधारे 2020 च्या तिसऱ्या तिमाहीत घरांच्या विक्रीत 2.5 इतकी वाढ झाली आहे. यासह एकूण घरांची संख्या ही 33 हजार 403 युनिट्स (एकूण घरं) आहेत. तर हीच आकडेवारी या वर्षातील दुसऱ्या तिमाहीत 9 हजार 632 इतकी होती.

संबंधित बातम्या :

चाळीशीत आहात, अशी गुंतवणूक करा, 2 कोटी कमवा !

Buying a house in India is easier than the whole world, prices have come down

Non Stop LIVE Update
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....