ई-कॉमर्स कंपन्यांच्या अडचणी वाढणार ?, नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे सरकार कठोर नियम लागू करण्याची शक्यता

-कॉमर्स कंपन्यासाठी कठोर नियम लागू करावेत असे खंडेलवाल यांनी म्हटले आहे. (pravin khandelwal piyush goyal e commerce company)

ई-कॉमर्स कंपन्यांच्या अडचणी वाढणार ?, नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे सरकार कठोर नियम लागू करण्याची शक्यता
पियुष गोयल
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 11:25 PM

नवी दिल्ली : डिजीटल व्यवहाराला चालना मिळाल्यामुळे आजकाल सर्व कामं ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. व्यापरा उदीमातसुद्धा डिझीटलायझेशनमुळे अनेक बदल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ई-कॉमर्स कंपन्यांकडून सुरु असलेला मनमानी कारभार चर्चेचा विषय ठरत आहे. ई-कॉमर्स कंपन्यांच्या विरोधात कॉन्फिडरेशन ऑफ ऑल ईँडिया ट्रेडर्स (CAIT) चे राष्ट्रीय महामंत्री प्रविण खंडेलवाल (Pravin Khandelwal) यांनी थेट केंद्रीय व्यापार आणि वाणिज्य मंत्री पियूष गोयल (Piyush Goyal) यांच्याकड निवेदनाद्वारे तक्रार केलीये. त्यांनी आपल्या तक्रारीत ई- कॉमर्स कंपन्यांनी व्यापार जगताला खराब करुन टाकल्याचा आरोप केलाय. तसेच ई-कॉमर्स कंपन्यासाठी कठोर नियम लागू करावेत असेही खंडेलवाल यांनी म्हटले आहे. यावेळी सर्वाच्या हिताला समोर ठेवून ई- कॉमर्समध्ये सर्वांना समान संधी देण्याचीही खंडेलवाल यांनी पियूष गोयल यांच्याकडे मागणी केली. (CAIT Pravin Khandelwal meet to Piyush Goyal on E commerce company rules and regulation issue)

कोणत्याही कंपनीने कायद्याचे उल्लंघन करु नये

यावेळी खंडेलवाल यांनी पियूष गोयल यांच्याकडे अनेक मागण्या केल्या. त्यांनी ई- कॉमर्स कंपन्यांच्या व्यापारविषयक धोरणाला विरोध केला. कोणताही ई-कॉमर्स कंपनी कितीजरी छोटी, मोठी, विदेशी किंवा विदेशातून भांडवल मिळवणारी असली तरी, या सर्व कंपन्यांनी कायद्याचे कठोरपणे पालन करावे. या कंपन्यांनी कायद्याचे उल्लंघन न करता देशाला डंपिंग यार्ड समजण्याची चूक करु नये, अशीसुद्धा मागणी खंडेलवाल यांनी केली.

एफडीआईच्या धोरणाचे उल्लंघन

कॉन्फिडरेशन ऑफ ऑल ईँडिया ट्रेडर्स (CAIT) चे राष्ट्रीय महामंत्री प्रविण खंडेलवाल यांनी कंपन्यांकूडन होत असलेल्या कायद्याच्या उल्लंघनाची तक्रार पियूष गोयल यांच्याकडे केली. त्यांनी “विदेशातून भांडवल मिळवण्याऱ्या ई-कॉमर्स कंपन्या एडीआयच्या धोरणाचं उल्लंघन करतात. तसेच त्या फेमा अधिनियमाचेसुद्धा उल्लंघन करताना दिसतात. या कंपन्या भारताला खुलं मैदान समजतात. या देशात कायदे आणि नियमांना आपल्या सोईनुसार मोडता येतं, असा समज या ई-कॉमर्स कंपन्यांचा आहे. या सर्व कंपन्यांना धडा शिकवला पाहिजे,” असं खंडेलवाल यांनी म्हटंलय.

प्रत्येकाने नियमांचे पालन करावे

खंडेलवाल यांच्या सर्व तक्रारी ऐकून घेऊन पियूष गोयल यांनी प्रत्येक ई-कॉमर्स कंपनीने नियमांचे पालन करणे गरजचे असल्याचं सांगितलं. सरकार ई-कॉमर्स क्षेत्रातील व्यापारविषयक समस्येवर गंभीरपणे विचार करत असल्याचे त्यांनी म्हटलंय. तसेच यावेळी बोलतीना केंद्र सरकार भारताच्या छोट्या व्यापाऱ्यांचे हीत जपण्यासाठी कटीबद्ध असल्याचे आश्वासनसुद्धा त्यांनी दिले. दरम्यान, गोयल यांनी व्यापाराऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकारण्याचासुद्धा सल्ला दिला.

दरम्यान, गोयल यांनी केंद्र ई-कॉमर्स कंपन्यांकडून होत असलेल्या नियमांच्या उल्लंघनावर गंभीरणे विचार करत असल्याचे भाष्य केले. त्यामुळे आगामी काळात ई- कॉमर्स कंपन्यांसमोर अडचणी येतात की काय?, असा प्रश्न सर्वांना पडतोय.

इतर बातम्या 

सोन्याच्या किमती 45000 रुपयांहून कमी; पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचा भाव?

प्राप्तिकर विभागाकडून करदात्यांच्या खात्यात 2 लाख कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा; अशी तपासा

दिवसाला फक्त 29 रुपये देऊन 2.30 लाख रुपये मिळवा; LIC ची जबरदस्त पॉलिसी

(CAIT Pravin Khandelwal meet to Piyush Goyal on E commerce company rules and regulation issue)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.