आता पण चालू शकते 1, 2 आणि 5 रूपयांची नोट? जर तुमच्या जवळ या नोटा असतील तर पाहा नियम
आपण दुकानात काही खरेदी करण्यासाठी गेलो आणि पैसे देताना दुकानदाराला आपण 1 रुपये, 2 रूपये आणि 5 रूपयांच्या नोटा दिल्यावर दुकानदार त्या नोटा घेत नाहीत
मुंबई : आपण दुकानात काही खरेदी करण्यासाठी गेलो आणि पैसे देताना दुकानदाराला आपण 1 रुपये, 2 रूपये आणि 5 रूपयांच्या नोटा दिल्यावर दुकानदार त्या नोटा घेत नाहीत, आणि या नोटा बंद झाल्याचे देखील सांगतात. यामुळे आपण देखील परिशान होतो. मात्र, आपल्याला देखील आरबीआयाचे नियम माहिती नसल्यामुळे आपल्याला देखील असे वाटते की, खरोखरच या जुन्या नोटा बंद झाल्या आहेत. मात्र, आरबीआयने या नोटा बंद केलेल्या नाहीत. नेमके काय आहेत आरबीआयचे नियम बघूयात. (Can these notes be used now? Do you know these rules of RBI?)
कुठल्या नोट्यांची छपाई सुरू सध्या रिजर्व बँक ऑफ इंडिया 10 रूपये, 20 रूपये, 50 रूपये, 100 रूपये, 200 रूपये, 500 रूपये 2000 हजार रूपयांच्या नोटांची छपाई करण्यात येते. या नोटाना बँकनोट असे म्हटले जाते. भारतीय रिजर्व बँकेच्या सध्या याच नोटा छापते. मात्र, 2 रूपयांची आणि 5 रूपयांच्या नोटेची छपाई करत नाही. त्याचे म्हणणे आहे की, या नोटाची सध्या व्यवहारात काही गरज नाही.
घाबरून जाण्याचे कारण नाही जर तुमच्याकडे अगोदरच्या २ रूपयांची आणि 5 रूपयांची नोट असेल तर घाबरून जाण्याचे काही काम नाही. या नोटा जरी बॅक छपाई करत नसेल तरी देखील या सर्व व्यवहारात सुरू आहेत. आपण देशाच्या कोणत्याही भागात जाऊन या नोटाचा व्यवहार करू शकतो.
1 रूपयांच्या नोटेचे नेमके काय? बऱ्याचवेळा आपल्याला व्यवहारात एक रूपयांची नोट दिसते मात्र, काही व्यक्ती ही नोट बंद झाल्याचे देखील सांगतात पण खरोखरच एक रूपयांची नोट बंद झाली आहे का? त्याचे उत्तर नाही, कारण एक रूपयांची नोट पूर्णपणे वैध आहे व्यवहार करण्यासाठी मात्र, एक रूपयांच्या नोटेची छपाई रिजर्व बँक ऑफ इंडिया करत नसून त्याची छपाई भारत सरकारकडून केली जाते.
कोणत्या नोटा छापल्या जाऊ शकतात आरबीआयने त्यांच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, भारतीय रिझर्व बँक अधिनियमप्रमाणे 1934 च्या 24 नियमाप्रमाणे दोन रूपयांपासून 10 रूपयांच्या नोटा छापल्या जाऊ शकतात. यामध्ये 2, 5, 10, 20, 100, 200, 500, 1000, 2000, 5000 रूपयांच्या नोटा छापल्या जाऊ शकतात. आणि 10 हजार रूपयांची नोट छापण्याचा पूर्ण अधिकार केंद्र सरकारजवळ आहे.
आजपर्यंतची सर्वात मोठी नोट कोणती भारतीय रिझर्व बँकने आजपर्यंतच्या 10000 रूपयांची सर्वात जास्त रकमेची नोट छापली होती. 1938 मध्ये छापली गेली होती. त्यानंतर 1946 मध्ये त्या नोटा परत घेऊन त्याला अवैध घोषित करण्यात आले होते. परत एकदा 1954 मध्ये 10000 ची नोटांची छपाई करण्यात आली होती आणि 1978 मध्ये पुन्हा ती नोट अवैध घोषित करण्यात आली होती.
संबंधित बातम्या :
स्वत:चा व्यवसाय सुरु करायचाय, ‘या’ 5 बेस्ट ऑप्शनचा विचार करा, पहिल्या दिवसापासून कमाई
Pan Card | एकही रुपया खर्च न करता केवळ 5 मिनिटांत बनेल ‘पॅन कार्ड’, जाणून घ्या कसे…
(Can these notes be used now? Do you know these rules of RBI?)