Justin Trudeau : भारताशी पंगा, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो इतक्या कोटींचे धनी

Justin Trudeau : भारताशी पंगा घेणाऱ्या कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो हे इतक्या संपत्तीचे धनी आहेत. त्यांना अनेक मार्गांने कमाई होते. सध्या ते इतक्या संपत्तीचे मालक आहेत.

Justin Trudeau : भारताशी पंगा, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो इतक्या कोटींचे धनी
Follow us
| Updated on: Sep 20, 2023 | 5:22 PM

नवी दिल्ली | 20 सप्टेंबर 2023 : G20 परिषदेत हजेरी लावल्यानंतर कॅनडाच्या पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी भारताविरोधात मोर्चा उघडला आहे. केवळ आरोपांच्या फैरी झालून ट्रूडो शांत झाले नाही तर भारतीय राजदूताची हकालपट्टी करण्यात आली. या मुद्यावर त्यांनी नरमाईचे सूर आळवले आहेत. ते जगातील सर्वात श्रीमंत राजकीय व्यक्तींपैकी एक आहेत. 2015 मध्ये ते कॅनडाचे पंतप्रधान (Canda Prime Minister Justin Trudeau Net worth) झाले. त्यांचे वडील पण पंतप्रधान होते. नेटवर्थ क्लबच्या रिपोर्टनुसार, जस्टीन यांच्याकडे एकूण 800 कोटी रुपयांहून अधिकची संपत्ती आहे. त्यांचा वार्षिक पगारच 379,000 डॉलर म्हणजे 3.15 कोटी रुपयांहून अधिक आहे. ट्रूडो हे गुंतवणूक आणि व्यवसायातून कोट्यवधींची कमाई करतात. ट्रूडो हे कॅनडाच्या इतिहासातील दुसरे सर्वात कमी वयाचे पंतप्रधान आहेत.

ट्रूडो धनकुबेर

  1. जगातील सर्वात श्रीमंत राजकारण्यांपैकी एक असणारे जस्टीन ट्रूडो यांना त्यांच्या वडिलांकडून मोठी संपत्ती मिळाली आहे. त्यांना 45 दशलक्ष डॉलरची संपत्ती वडिलांकडून मिळाली आहे.
  2. ट्रूडो यांनी रिअल इस्टेट आणि सरकारी योजनांमध्ये 20 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली आहे. ट्रूडो यांच्याकडे जागतिक कंपन्यांचे 7 दशलक्ष डॉलर मूल्याचे शेअर आहेत.
  3. हे सुद्धा वाचा
  4. गेल्या 20 वर्षांत ट्रूडो यांच्या स्टॉक पोर्टफोलिओमध्ये दरवर्षी 47 टक्के वृद्धी आली आहे. तर त्यांच्या नेहमीच्या गुंतवणुकीत 12 टक्के वाढ दिसून आली.
  5. जस्टिन ट्रूडो यांच्याकडे 2 यॉट आहे. त्याची किंमत 3 दशलक्ष डॉलरहून अधिक आहे. ट्रूडोने हे यॉट अवघ्या 150000 डॉलरला खरेदी केले आहे. हा व्यवहारावर विरोधकांना संशय आहे.
  6. एका श्रीमंत मित्राने ट्रूडोला खासगी जेट विमान वापरायला दिले आहे. तर एका श्रीमंत कुटुंबाने जस्टिनसाठी त्यांचे खास भलंमोठं विमान कॅनडात दिमतीला ठेवलं आहे.

जस्टीन ट्रूडोचे घर

नेटवर्थ क्लबच्या रिपोर्टनुसार, ट्रूडो जरी पंतप्रधान निवासमध्ये राहत असले तरी ओटावामध्ये त्यांच्याकडे 11 बेडरुमचा आलिशान बंगला आहे. ही एक प्रकारची हवेलीच आहे. ट्रूडो यांच्याकडे जवळपास 4 भलेमोठे बंगले आणि एक गोल्फ कोर्स पण आहे. त्यांच्या वडिलांकडून आणि एका मित्राकडून ही संपत्ती त्यांना मिळाली आहे.

18 वर्षांत 16 पट वाढली नेटवर्थ

नेटवर्थच्या अहवालानुसार, गेल्या 18 वर्षांत जस्टीन ट्रूडो यांची नेटवर्थ 16 पटीहून अधिक वाढली आहे. 2005 मध्ये त्यांची एकूण संपत्ती 6 दशलक्ष डॉलर होती. ती 2010 मध्ये 11 दशलक्ष डॉलरवर पोहचली. 2018 मध्ये त्यांची एकूण संपत्ती 53 दशलक्ष डॉलर झाली. 2020 मध्ये ट्रुडो यांची नेटवर्थ 75 दशलक्ष डॉलर इतकी झाली. 2022 मध्ये ट्रूडो यांची संपत्ती 90 दशलक्ष डॉलर तर 2023 मध्ये त्यांची एकूण संपत्ती 97 दशलक्ष डॉलरपर्यंत वाढली.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.