Drugs Bans : पॅरासिटामॉल कॉम्बिनेशनसह 14 औषधांवर बंदी, ही आहे संपूर्ण यादी

Drugs Bans : आरोग्यासाठी हानीकारक असलेल्या 14 औषधांवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. तुम्ही पण ही औषधं घेऊ नका. पण ती औषधं आहेत तरी कोणती, इथं आहे संपूर्ण यादी

Drugs Bans : पॅरासिटामॉल कॉम्बिनेशनसह 14 औषधांवर बंदी, ही आहे संपूर्ण यादी
Follow us
| Updated on: Jun 03, 2023 | 7:57 PM

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आरोग्यासाठी हानीकारक असलेल्या 14 औषधांवर लगाम कसला आहे. 14 फिक्स्ड डोज कॉम्बिनेशन (FDCs) ड्रग्सवर बंदी घातली आहे. निमेसुलाइड (Nimesulide) आणि पॅरासिटामॉल (Paracetamol) डिसपर्सिबल टॅबलेट्स, क्लोफेनिरेमाईन मेलिएट (Chlopheniramine Maleate) आणि कोडीन सिरप (Codeine Syrup) यांचा या यादीत समावेश आहे. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, या औषधांचा वापर मानवी शरीरासाठी हानीकारक आहे. त्यामुळे या औषधांचे उत्पादन, वितरण आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. शुक्रवारी केंद्र सरकारने याविषयीची अधिसूचना काढली आहे.

कशासाठी होतो वापर केंद्र सरकारच्या तज्ज्ञ समितीने याविषयीची शिफारस केली होती. त्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले. ताप, डोकेदुखी, अर्धशिशी, अंगदुखी, दातांचे दुखणे, संधिवात वेदना, स्पॉन्डिलायटिस, ऑस्टियोआर्थरायटिस, पीरियड वेदना इत्यादींमध्ये नायमसुलाइड आणि पॅरासिटामॉलचे संयुक्त औषध घेतले जाते. या औषधांच्या अनियंत्रित वापराचा परिणाम यकृत, मूत्रपिंड आणि हृदयावर होण्याची दाट शक्यता आहे.

ही आहे औषधांची यादी Nimesulide + Paracetamol डिसपर्सिबल टॅबलेट्स, Chlopheniramine Maleate + Codeine Syrup, Pholcodine +Promethazine, Amoxicillin + Bromhexine and Bromhexine + Dextromethorphan + Ammonium Chloride + Menthol, Paracetamol + Bromhexine+ Phenylephrine + Chlorpheniramine + Guaiphenesin आणि Salbutamol + Bromhexine या औषधांचा या यादीत समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

काय केली होती शिफारस तज्ज्ञांच्या समितीने ही संयुक्त औषधं, फिक्स्ड डोज कॉम्बिनेशन मानवीय शरिरासाठी घातक असल्याने त्यावर बंदीची शिफारस केली होती. ही बंदी औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा, 1940 च्या कलम 26A अंतर्गत घालण्यात आली आहे.

2016 मधील निर्णय FDCs अशी औषधं असतात, ज्यामध्ये दोन अथवा त्यापेक्षा अधिक एपीआय निश्चित स्वरुपात प्रमाणबद्ध असतो. केंद्र सरकारने 2016 मध्ये 344 फिक्स्ड डोज कॉम्बिनेशनची निर्मिती, वितरण आणि विक्रीवर बंदी आणली होती. एका निकालानुसार, सर्वोच्च न्यायालयाने त्यासाठी तज्ज्ञांची समिती गठित केली होती. आता ज्या 14 औषधांवर बंदी घालण्यात आली आहे. ती या 344 औषधांचाच भाग आहे.

12 टक्क्यांहून अधिकची वाढ दरम्यान केंद्र सरकारने औषधी कंपन्यांना दरवाढीची परवानगी दिली आहे. एका अहवालानुसार, औषधांच्या किंमतीत 12 टक्क्यांहून अधिकची वाढ होऊ शकते. औषधांच्या किंमतीत वाढ होण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. शेड्यूल ड्रग्सच्या किंमतीत जवळपास 10 टक्कांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. या औषधांच्या किंमतींवर सरकारचे नियंत्रण असते. नियमानुसार दरवाढीची मागणी करण्यात येते. केंद्र सरकारच्या आदेशानंतर भावात बदल होतो. WPI मध्ये घसरण झाल्याने गेल्यावर्षी औषधांच्या किंमतीत किरकोळ वाढ झाली होती. गेल्या काही वर्षात ही दरवाढ 1% अथवा 2% दरम्यान राहिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत किंमतीत अजून वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.