Central Government : केंद्रीय कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचं गिफ्ट; 20 हजारांनी थेट पगारात वाढ?

सातव्या वेतन आयोगाच्या अहवालानुसार केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या निकषानुसार 3 टक्के महागाई भत्त्यांत वाढ करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे सुधारित वेतनानुसार किमान 20 हजार रुपयांची वाढ अपेक्षित आहे. दरम्यान, महागाई भत्त्यांत वाढीच्या निर्णयाबाबत अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही.

Central Government : केंद्रीय कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचं गिफ्ट; 20  हजारांनी थेट पगारात वाढ?
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता
Follow us
| Updated on: Dec 14, 2021 | 12:09 AM

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Governments Employee) नव्या वर्षात सरकारकडून वेतनवाढीचं (Salary Hike) गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यांत (Dearness Allowance- DA) वाढ करण्याचे संकेत सरकारी गोटातून मिळत आहेत. सातव्या वेतन आयोगाच्या अहवालानुसार केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या निकषानुसार 3 टक्के महागाई भत्त्यांत वाढ करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे सुधारित वेतनानुसार किमान 20 हजार रुपयांची वाढ अपेक्षित आहे. दरम्यान, महागाई भत्त्यांत वाढीच्या निर्णयाबाबत अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही.

भारतासोबत पाकिस्तानात डीए

सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना देणाऱ्या डीए अर्थात एक कॉस्ट ऑफ लिव्हिंग अलाउन्समधअये वर्षातून दोनदा वाढ करण्यात येते. जानेवारी आणि जुलै महिन्यांत डीएमधील बदल घोषित केले जातात. महागाईचा परिणाम कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना डीए अदा केला जातो. भारतासोबतच बांग्लादेश आणि पाकिस्तान सारख्या राष्ट्रांतही डीएची तरतूद दिसून येते.

डीएचा ‘डबल’ डोस

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 31 टक्के महागाई भत्ता अदा केला जातो. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यांत जुलै आणि ऑक्टोबर महिन्यांत डीएमध्ये दोन वेळा वाढ करण्याक आली. 47.14 लाख केंद्र सरकारचे कर्मचारी आणि 68.62 लाख निवृत्तीवेतनधारकांना 31 टक्के महागाई भत्ता अदा करण्यात आला. जुलै 2021 मध्ये केंद्र सरकारने महागाई भत्त्यांत 17 टक्क्यांवरुन 28 टक्के केला. सरकारी सुत्रांनुसार केंद्र सरकारने महागाई भत्त्यांत तीन टक्के वाढ केल्यास कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठ्या प्रमाणात फरक दिसून येईल. सरकारने यानुसार महागाई भत्त्यांत वाढ केल्यास कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन 8 हजार रुपयांनी वाढ होऊन 28 हजारांपर्यंत पोहोचू शकते.

मूळ वेतनावर गणना

(Dearness Allowance) महागाई भत्त्याची गणना कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या आधारावर केली जाते. शहरी, निम शहरी तसेच ग्रामीण भागात नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यांत फरक असतो. डीएची गणना मूळ वेतनावर केली जाते. महागाई भत्त्याची गणना करण्याचा फॉर्म्युला निश्चित करण्यात येतो.

इतर बातम्या :

फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंड : एफडीपेक्षा दुप्पट रिटर्न्स, गुंतवणुकीचा राजमार्ग एका क्लिकवर

ईपीएफओकडून 23.44 कोटी खात्यांवर व्याज जमा; ‘असे’ चेक करा आपले बॅलन्स

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.