Inflation : महागाईचे अंदाज, दावे फेल! 15 महिन्यात तुटला रेकॉर्ड

Inflation : महागाईविषयीचे सर्व दावे, अंदाज महागाईनेच गुंडाळून ठेवले. गेल्या 15 महिन्यातील सर्व रेकॉर्ड मोडीत निघाले. त्यामुळे केंद्र सरकार लाल किल्ल्यावरुन किती ही गर्जना करत असले तरी सर्वसामान्य महागाईने होरपळत असल्याचे आकडेवारीवरुन समोर आले आहे.

Inflation : महागाईचे अंदाज, दावे फेल! 15 महिन्यात तुटला रेकॉर्ड
Follow us
| Updated on: Aug 15, 2023 | 3:54 PM

नवी दिल्ली | 15 ऑगस्ट 2023 : जुलै महिन्यात रिटेल महागाईचा (Retail Inflation) दर कमी असेल, असा दावा आणि अंदाज व्यक्त करण्यात येत होता. पण किरकोळ महागाईने हे सर्व अंदाज, दावे गुंडाळून ठेवले. गेल्या 15 महिन्यात महागाईने दूरचा टप्पा गाठला. महागाईत सातत्याने वाढ होत आहे. केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु असले तरी त्याला म्हणावे तसे यश मिळालेले नाही. किरकोळ महागाईत खरा खलनायक टोमॅटो (Tomato Hike) ठरला आहे. त्यासोबतच इतर भाज्यांनी सुद्धा मोठी भूमिका निभावली आहे. जुलै महिन्यातच भाज्यांची महागाई 37.34 टक्के नोंदविण्यात आला. जुलै महिन्यात शहरांपेक्षा ग्रामीण भागातील महागाई जास्त होती. शहरात किरकोळ महागाई 7.2 टक्के होता तर गावात हा दर 7.63 टक्के होता. त्यामुळे महागाई आटोक्यात आणण्याच्या केंद्र सरकारच्या सर्व प्रयत्नांवर पाणी फेरले गेले.

महागाईने गाठला कळस

देशात या वर्षात महागाईने कळस गाठला. त्यात भाज्यांनी मोठी भुमिका निभावली. किरकोळ महागाई तर सूसाट धावली. महागाई दराने मोठा पल्ला गाठला. किरकोळ महागाई दर 15 टक्क्यांनी वाढला. टोमॅटोनी त्यात सर्वाधिक भर घातली. जुलैमध्ये किरकोळ महागाई दर दर 7.44 टक्के नोंदविण्यात आला. गावात महागाई दर 7.63 टक्के होता तर शहरात किरकोळ महागाई 7.2 टक्के होता.

हे सुद्धा वाचा

भाज्यांऐवजी यांचा समावेश

भाजीपाल्याशिवाय महागाईत इतर घटकांनी तेल ओतले. त्यात मसाले, डाळी, दूध आणि धान्यांचे मोठे योगदान आहे. म्हणजे सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडून पडले आहे. मसाल्याचे भाव 21.63 टक्के नोंदविण्यात आले. डाळींची महागाई 13.27 टक्के, धान्य महागाई 13.04 टक्के तर दुधाची महागाई 8.34 टक्के नोंदविण्यात आली. जुलै महिन्यात मुसळधार पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे पुरवठ्याची साखळी विस्कळीत नाही, खंडीत झाली. डाळी आणि मसाला पदार्थांच्या कमी उत्पादनामुळे भाव वाढले.

या राज्यांना महागाईन पिडले

राज्यांचा विचार करता, 12 राज्यांना महागाईचा सर्वाधिक फटका बसला. किरकोळ महागाई दर राष्ट्रीय स्तरावर 7.44 टक्के होता. काही राज्यात तर महागाई दर 10 टक्क्यांच्या घरात पोहचला. जुलै महिन्यात राजस्थानमध्ये महागाई दर 9.66, झारखंडमध्ये 9.16 टक्के नोंदविण्यात आला. तामिळनाडू राज्यात हा दर 8.95 टक्के, ओडिशामध्ये 8.67 टक्के, उत्तराखंड राज्यात 8.58 टक्के, तेलंगाणामध्ये 8.55 टक्के, हरियाणा राज्यात 8.38 टक्के, उत्तर प्रदेशमध्ये 8.13 टक्के आणि आंध्र प्रदेशमध्ये 8.11 टक्के महागाई दर होता.

सप्टेंबरपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर

यापूर्वी महागाईसंबंधीचे सर्व अंदाज फेल गेले आहे. पण यावेळी समाधानकारक पावसामुळे देशातील किरकोळ महागाई दर कमी होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी या किंमतीत घसरण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पण डाळी, धान्य आणि मसाला पदार्थांमध्ये कोणताही दिलासा मिळण्याची शक्यता एकदम कमी आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.