नितीन गडकरींच्या भाषणात MEILची प्रशंसा! वाहतूक मंत्रालयाकडून 5 हजार कोटींची बचत, नेमकं केलं काय?

Zojila Tunnel : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेतील चर्चेत भाग घेताना देशातील विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर भाष्य केलं. यात काश्मीरमध्ये सुरु असलेल्या अत्यंत महत्त्वाकांक्षी जोझिला पास प्रकल्पाचा विशेष उल्लेख होता.

नितीन गडकरींच्या भाषणात MEILची प्रशंसा! वाहतूक मंत्रालयाकडून 5 हजार कोटींची बचत, नेमकं केलं काय?
दुहेरी बोगद्याच्या कामाबाबत बोलताना नितीन गडकरींनी केलं MIELचं कौतुकImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 3:36 PM

नवी दिल्ली : वाहतूक मंत्रालयाननं लेह लडाखच्या (Leh Ladakh) रस्त्याच्या कामात तब्बल पाच हजार कोटी रुपयांची बचत केली आहे. खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत लोकसभेत बोलताना माहिती दिली. यावेळी नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी MEIL या कंपनीची प्रसंशाही केली. हेदराबादमधील मेघा इंजिनिअरींग कंपनीनं अत्यंत कमी खर्चात प्रकल्पासाठी निविदा भरली होती. त्याचा फायदा सरकारला झाल्याचं गडकरींनी म्हटलंय. या संपूर्ण प्रकल्पाबाबत आणि मेघा इंजिनिअरींग एन्ट इन्फ्रानस्ट्रक्चर लिमिटेड कंपनीबाबत संसदेत कौतुक करण्यात आलं. काश्मीरमध्ये सुरु असलेल्या अत्यंत महत्त्वाकांक्षी जोझिला पास प्रकल्पाचा उल्लेख यावेळी करण्यात आला. जवळपास 12 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या उभारणीसाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. फक्त देशातीलच नव्हे तर परदेशातूनही या प्रकल्पासाठी नावाजलेल्या कंत्राटदारांकडून निविदा मागवण्यात आल्या होत्या. मात्र हैदराबादमधील (Hyderabad) मेघा इंजिनिअरींग कंपनीनं अत्यंत कमी खर्चात या प्रकल्पासाठी निविदा भरली आणि या प्रकल्पाच्या दर्जेदार कामातून वेळेत काम पूर्ण होईल, याची खबरदारीरी घेतली आहे. त्यामुळे लोकसभेत गडकरींनी आपल्या भाषणात MEILचं तोंडभरुन कौतुक केलंय.

काय म्हणाले गडकरी?

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेतील चर्चेत भाग घेताना देशातील विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर भाष्य केलं. यात काश्मीरमध्ये सुरु असलेल्या अत्यंत महत्त्वाकांक्षी जोझिला पास प्रकल्पाचा विशेष उल्लेख होता. अंदाजे 12,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या उभारणीसाठी देशातील आणि परदेशातील अनेक नामांकित कंत्राटदारांकडून निविदा मागवण्यात आल्याचे गडकरी म्हणाले. गडकरी पुढे म्हणाले की,

हैदराबादस्थित मेघा इंजिनीअरींग कंपनीने ( MEIL ) अत्यंत कमी खर्चात या प्रकल्पासाठी निविदा भरल्याने केंद्र सरकारचे पाच हजार कोटी रुपये वाचले. अतिशय प्रतिकूल हवामानात जोझिला पासजवळ मेघा इंजिनीअरींग ( MEIL) वेगाने काम करत आहे. दुहेरी बोगद्याच्या या बांधकामात दररोज प्रगतीचा एक टप्पा गाठला जातोय. केवळ जलदच नाही तर सुरक्षितता आणि बांधकाम मानकांचे पालन करत दर्जेदार होत असलेल्या या कामाचे अनेक प्रशासनीक अधिकाऱ्यांनी कौतूक आणि प्रशंसा झाली आहे. या कामाची प्रशासनातील आणि प्राधिकरणातील अनेक अधिका-यांनी प्रशंसा केली आहे.

पाहा व्हिडीओ :

इतर महत्त्वाच्या बातम्या :

ST प्रश्नी सरकारचं सभागृहात एक आणि कोर्टात दुसरंच, विलीनिकरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी 15 दिवसांची मुदत मागितली

Mumbai Tax: मुंबईकरांसाठी मोठी घोषणा, अकृषी कराला स्थगिती

PM Kisan Yojna : अपात्र असूनही योजनेचा लाभ, आता Website च्या माध्यमातून करा परतावा..!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.