मॅनेजमेंट बदलताच ‘या’ कंपनीचे शेअर होल्डर्स मालामाल, एका शेअरची किंमत 100 रुपयांहून कमी

सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्सच्या शेअरमध्ये देशी-विदेशी गुंतवणूकदारांसोबतच प्रमोटर्सने भागीदारी वाढवली आहे. (CG Power & Industrial Solutions Shareholder Profit)

मॅनेजमेंट बदलताच 'या' कंपनीचे शेअर होल्डर्स मालामाल, एका शेअरची किंमत 100 रुपयांहून कमी
शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल
Follow us
| Updated on: Jun 06, 2021 | 9:07 AM

मुंबई : सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्यूशन्स (CG Power & Industrial Solutions) कंपनीने शेअर गुंतवणूकदारांना भरघोस उत्पन्न मिळवून दिले आहे. या कंपनीच्या शेअरने गेल्या 12 महिन्यांत 1200 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. त्यामुळे या वर्षाच्या सुरूवातीपासूनच या शेअरमध्ये 90 टक्क्यांनी वाढ झाली आहे. (CG Power & Industrial Solutions Stock more than 1200 percent returns to its shareholders)

सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्सच्या शेअरमध्ये देशी-विदेशी गुंतवणूकदारांसोबतच प्रमोटर्सने भागीदारी वाढवली आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये ज्यांनी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे, त्या गुंतवणूकदारांची संपत्ती 12 महिन्यांत वाढून 12.85 लाखांवर गेली आहे.

CG Power & Industrial Solutions कंपनीने देशासह परदेशी शेअरच्या गुंतवणूकदारांवर विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान मार्च तिमाहीत या कंपनीने घरगुती संस्थात्मक गुंतवणूकदार (DII), विदेशी पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स (FPI) गुंतवणूक वाढवली होती.

12 महिन्यांत 1200 टक्क्यांनी वाढ

सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्सच्या शेअरमध्ये एका वर्षात 1200 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या 3 जून 2020 रोजी या शेअर्सची किंमत 6.30 रुपये होती. त्यात आता 1285 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या याची किंमत 87.30 रुपये इतकी आहे. या काळात सेन्सेक्समध्ये 53 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. या कंपनीची मार्केट कॅप 11,312.77 कोटी रुपये आहे.

मॅनेजमेंट बदलल्यानंतर शेअरमध्ये वाढ

काही दिवसांपूर्वी सीजी पॉवरच्या मालकीमध्ये बदल करण्यात आला होता. मुरुगप्पा ग्रुपने फसवणुकीनंतर ही कंपनी ट्यूब इन्व्हेस्टमेंटद्वारे (Tube Investment) ताब्यात घेतली होती. त्यानंतर शेअर बाजारातही याला प्रोत्साहन मिळाले होते.

कंपनीची आर्थिक स्थिती

दरम्यान डिसेंबर 2020 च्या तिमाहीत या कंपनीला 534.59 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. तर डिसेंबर 2019 च्या तुलनेत हे प्रमाण 154.48 टक्के कमी आहे. याच काळात कंपनीने निव्वळ विक्री 819.52 कोटी रुपये केली होती. तर 11 मे 2021 रोजी सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्यूशन्सच्या बोर्डाने 1.38 कोटी इक्विटी शेअर होल्डर्सला प्राधान्य देण्यास मान्यता दिली होती. (CG Power & Industrial Solutions Stock more than 1200 percent returns to its shareholders)

संबंधित बातम्या : 

हॉलमार्किंग म्हणजे काय? सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी कसा फायदा? जाणून घ्या

SBI, HDFC, ICICI : 30 जूनची डेडलाईन लक्षात ठेवा, अन्यथा FD अधिक लाभांश नाही मिळणार

या दोन ऑनलाईन सेवांसाठी एसबीआय आकारते इंटरनेट बँकिंग शुल्क, प्रति ट्रान्झॅक्शन 50 रुपये चार्ज

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.