AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrayaan-3 : चंद्रयान-3 पावलं! या सरकारी कंपनीची एकाच हप्त्यात रेकॉर्डतोड कमाई

Chandrayaan-3 : चंद्रयान-3 च्या यशाची गोड फळ आता चाखायला मिळत आहे. कोट्यवधींच्या चंद्रयान-3 मोहिमेतून काय साध्य होणार अशा लोकांसाठी हे यश एक अंजन ठरेल. चंद्रावरील या स्वारीमुळे सरकारी महारत्न असणाऱ्या या कंपनीने एकाच आठवड्यात हजार कोटी कमावले आहेत. कोणती आहे ही कंपनी?

Chandrayaan-3 : चंद्रयान-3 पावलं! या सरकारी कंपनीची एकाच हप्त्यात रेकॉर्डतोड कमाई
Follow us
| Updated on: Sep 02, 2023 | 8:56 AM

नवी दिल्ली | 2 सप्टेंबर 2023 : चंद्रयान-3 मोहिमेने (Chandrayaan-3) अंतराळात भारताने मैलाचा दगड रोवला आहे. चंद्रावर पोहचल्याने भारताने काय तीर मारला असा काहीं बौद्धिक दिवाळखोरांचा सूर होता. इतके कोटी खर्च करुन भारताला काय गवसणार असाही काहींचा हेल आहे. पण भारताने भविष्यासाठी मोठे काम करुन ठेवले आहे. चंद्रयान-3 च्या यशाची गोड फळं लागलीच चाखायला मिळत आहे. चंद्रावरील मोहिमेमुळे या सरकारी महारत्न असणाऱ्या कंपनीला एकाच आठवड्यात हजार कोटींच्या कमाईची संधी मिळाली. या कंपनीचा शेअर (Government Company Share) एकाच आठवड्यात 26 टक्क्यांनी उसळला. या कंपनीला हजार कोटींची ऑर्डर मिळाली आहे. हा तर या मोहिमेचा एक भाग झाला. आता अनेक मार्गाने, अनेक दिशेने यश चालत येईल आणि अनेक कंपन्यांची, इस्त्रोची कमाई होत राहिल. मून इकोनॉमीसाठी भारताने टाकलेले पाऊल फायदेशीर ठरलं आहे.

BHEL ची कमाल

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड ही भारत सरकारच्या महारत्न कंपन्यांपैकी एक आहे. चंद्रयान-3 मिशनसाठी या सरकारी कंपनीचे भरीव योगदान आहे. या मोहिमेमुळे जसं भारताचे जगभरात नावं झाले. तसाच फायदा अनेक सरकारी आणि खासगी कंपन्यांना पण होताना दिसत आहे. या कंपनीच्या शेअरने एकाच आठवड्यात खोऱ्याने पैसा जमावला आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये आठवडाभरातच 26 टक्क्यांहून अधिकचा फायदा झाला.

हे सुद्धा वाचा

बाजारातील भांडवल झटक्यात वाढले

भारत हेवी इलेक्ट्रिकल्सच्या नफ्यात एकाच आठवड्यात जोरदार वाढ झाली. या कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये जवळपास 10 हजार कोटी रुपयांची वाढ झाली. तज्ज्ञांच्या मते, चंद्रयान-3 च्या यशाने या कंपनीकडे धडाधड ऑर्डर येऊन पडत आहेत. त्याचा फायदा शेअर बाजारात लागलीच दिसून आला. शेअरमध्ये मोठी वाढ झाली.

कंपनीच्या शेअरमध्ये 12 टक्के वाढ

गेल्या आठवड्यात भेलच्या शेअरने कमाल केली. एकाच आठवड्यात या कंपनीचा स्टॉक वधारला. या आठवड्याच्या शेवटच्या व्यापारी सत्रात शेअरमध्ये 12.20 टक्क्यांची वाढ झाली. कंपनीचा शेअर 14.80 रुपयांच्या वाढीसह 136.10 रुपयांवर बंद झाला. व्यापारी सत्रात हा शेअर 137 रुपयांच्या रेकॉर्ड स्तरावर पोहचला.

अशी दिसून आली तेजी

BSE वर हा शेअर शुक्रवारी 122.25 रुपयांवर सुरु झाला. दिवसभरात या शेअरने जोरदार मुसंडी मारली. या शेअरने 12.20 रुपयांची चढाई केली. बाजार बंद होताना हा शेअर 36.10 रुपयांवर बंद झाला. गुरुवारी कंपनीचा शेअर 121.30 रुपयांवर बंद झाला होता. कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने तेजी दिसून येत आहे.

10 हजार कोटींचा झाला फायदा

24 ऑगस्टनंतर कंपनीने मोठी उसळी घेतली. कंपनीला एकाच आठवड्यात जवळपास 10 हजार कोटींचा फायदा झाला. बीएसई आकड्यानुसार, 24 ऑगस्ट रोजी शेअर बाजार बंद झाला तेव्हा कंपनीचे मार्केट कॅप 37,466.99 कोटी रुपये होते. 1 ऑगस्ट रोजी भेलचे बाजारातील भांडवल वाढले. ते 47,390.88 कोटी रुपये झाले. याचा अर्थ एकाच आठवड्यात कंपनीला 9,923.89 कोटी रुपयांचा फायदा झाला. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार या कंपनीचे मार्केट कॅप लवकरच 50 हजार कोटींच्या घरात जाऊ शकते.

ऑर्डरचा पाऊस

  1. भेल कंपनीला या आठवड्यात 4 हजार कोटींची ऑर्डर मिळाली
  2. तर एनटीपीसीच्या सुपरक्रिटिकल थर्मल प्रोजेक्टसाठी 34 हजार कोटींचे काम मिळेल
  3. आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीला 23,500 कोटींचे ऑर्डर मिळालेली आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

'मी पाकिस्तानची...', भारत सोडण्यावर सीमा हैदरची मोठी प्रतिक्रिया
'मी पाकिस्तानची...', भारत सोडण्यावर सीमा हैदरची मोठी प्रतिक्रिया.
पाकिस्तान्यांना आज भारत सोडावाच लागणार;अटारी सीमेवर काय आहे परिस्थिती?
पाकिस्तान्यांना आज भारत सोडावाच लागणार;अटारी सीमेवर काय आहे परिस्थिती?.
पाकिस्तानला एकटं पडण्याची जोरदार तयारी; मोदींनी कोणाकोणाला केले फोन
पाकिस्तानला एकटं पडण्याची जोरदार तयारी; मोदींनी कोणाकोणाला केले फोन.
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?.
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू.
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी.
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय.
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं..
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं...