Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrayaan-3 : चंद्र कोपला! कंपनीला इतक्या कोटींचा फटका

Chandrayaan-3 : चंद्रयान-3 मिशनने अनेक कंपन्यांना मालमाल केले. सरकारी कंपन्यांना तर लॉटरी लागली. गुंतवणूकदारांना जॅकपॉट लागला. पण या कंपनीला चंद्राचा शाप लागला आहे. कंपनीला मोठा फटका बसला आहे. या कंपनीचे कोट्यवधी रुपये असे महिनाभरताच स्वाहा झाले, कोणती आहे ही कंपनी?

Chandrayaan-3 : चंद्र कोपला! कंपनीला इतक्या कोटींचा फटका
Follow us
| Updated on: Sep 22, 2023 | 2:54 PM

नवी दिल्ली | 22 सप्टेंबर 2023 : एका महिन्यापूर्वी 23 ऑगस्ट रोजी देशच नाही तर अवघेच जगच भारताच्या चंद्रयान-3 मोहिमेचे (Chandrayaan-3) साक्षीदार झाले. भारताने ऐतिहासिक कामगिरी केली. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश ठरला. सेफ लँडिंग केल्याने अंतराळ क्षेत्रात भारताने मोठा पल्ला गाठला आहे. या यशाचे अनेक भागीदार ठरले. या मोहिमेतील अनेक कंपन्यांना खोऱ्याने पैसा मिळाला. त्यांना नवीन ऑर्डर मिळाल्या. या कंपन्यांचे कोटकल्याण झाले. सरकारी कंपन्यांना तर सुगीचे दिवस आले. पण या मोहिमेतील एका कंपनीवर चंद्र चांगलाच कोपला. फायदा सोडा या कंपनीला एका महिन्यात नुकसानच नुकसान झाले आहे. या कंपनीचे कोट्यवधींचे नुकसान (Share Market Loss) झाले आहे, कोणती आहे ही कंपनी?

इतर कंपन्यांना लागली लॉटरी

चंद्रयान-3 मोहिमेमुळे मून इकोनॉमी वाढणार आहे. भारताने एकाच महिन्यात चंद्रयान-3 आणि आदित्य एल 1 मोहिमा यशस्वी केल्या. त्यामुळे या क्षेत्रातील भारताचा दबदबा वाढला. देशातील 13 स्पेस आणि डिफेंस कंपन्यांना मोठा फायदा झाला. त्यांचे शेअर रॉकेट झाले. 20 ते 24 जुलै दरम्यान 615 कोटींच्या चंद्रयान मोहिमेमुळे 13 कंपन्यांना 31 हजार कोटी रुपयांची लॉटरी लागली.

हे सुद्धा वाचा

या कंपनीचे नशीब फुटकं

अर्थात सर्वच कंपन्यांनी जोरदार कमाई केली असली तरी एका कंपनीला या वाहत्या गंगेत हात धुता आले नाही. सेंटम असे या कंपनीचे नाव आहे. चंद्रयान मोहिमेच्या चार दिवसांत कंपनीचा शेअर 26 टक्क्यांपर्यंत वधारला. कंपनीचे मार्केट कॅप 307 कोटींनी वाढले. पण या एका महिन्यात तुफान पडझड झाली. या शेअरमध्ये 28 टक्क्यांहून अधिकची पडझड झाली. या कंपनीचे बाजारातील भांडवल झपाट्याने कमी झाले. कंपनीला 700 कोटींपेक्षा अधिकचा फटका बसला.

गडगडला कंपनीचा शेअर

सेंटम टेक्नॉलॉजी (centum technologies share price) शेअरला बाजारात नंतर कमाल दाखवता आली नाही. एका महिन्यात या शेअरमध्ये 28 टक्क्यांची घसरण आली. 24 ऑगस्ट रोजी हा शेअर 1970 रुपयांच्या उच्चांकावर पोहचला होता. 22 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी हा शेअर 1425 रुपयांवर आपटला. जवळपास एका महिन्यात कंपनीचा शेअर 545 रुपयांनी आपटला.

बाजारातील भांडवल झाले कमी

या दरम्यान बाजारातील कंपनीचे मूल्य घसरले. कंपनीचे मोठे नुकसान झाले. 24 ऑगस्ट रोजी कंपनीचा शेअर 1970 रुपयांवर असताना कंपनीचे भांडवल 2,538.30 कोटी रुपये होते. तर आता हा शेअर 1425 रुपयांवर आपटल्यावर कंपनीचे भांडवल 1,836.08 कोटी रुपयांवर घसरले. 702.22 कोटी रुपयांची घसरण दिसून आली. यावर्षी गुंतवणूकदारांना या कंपनीने 100 टक्के परतावा दिला.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.