नोकऱ्या वारंवार बदलता, मग हे काम नक्की करा, अन्यथा पीएफचे पैसे लटकणार

नोकरी बदलताना लोक त्यांचे पीएफ खाते ट्रान्सफर करणे विसरू शकतात. जर तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातून पैसे काढायचे असतील किंवा दुसऱ्या खात्यात पीएफचे पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर तुम्ही काय करावे हे जाणून घ्या.

नोकऱ्या वारंवार बदलता, मग हे काम नक्की करा, अन्यथा पीएफचे पैसे लटकणार
पीएफ खात्यात व्याज जमा
Follow us
| Updated on: Aug 19, 2021 | 7:02 AM

नवी दिल्लीः जर तुम्ही वारंवार नोकऱ्या बदलत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कंपनी किंवा नोकरी बदलल्यानंतर तुमच्या भविष्य निर्वाह निधीचे (PF) पैसे दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करणे महत्त्वाचे आहे. नोकऱ्या बदलल्यानंतर कित्येक वेळा आपली आधीची कंपनी EPFO ​​प्रणालीमध्ये नोकरी सोडण्याची तारीख टाकणे विसरते, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना नंतर पीएफ रक्कम हस्तांतरित करण्यात अडचण येते. नोकरी बदलताना लोक त्यांचे पीएफ खाते ट्रान्सफर करणे विसरू शकतात. जर तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातून पैसे काढायचे असतील किंवा दुसऱ्या खात्यात पीएफचे पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर तुम्ही काय करावे हे जाणून घ्या.

कर्मचारी स्वतः नोकरी सोडण्याची तारीख अपडेट करू शकतात

पूर्वी फक्त नियोक्ताच प्रवेश करू शकत होता किंवा अपडेट करू शकत होता जसे की नोकरीमध्ये रूजू होण्याची तारीख आणि कर्मचाऱ्याने नोकरी सोडण्याची तारीख असो. नियोक्त्याने या दोन तारखा अपडेट न केल्यामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) मधून निधी काढणे किंवा हस्तांतरित करणे देखील कठीण होते. मात्र, आता कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO) आपल्या सदस्यांसाठी सुलभ केलेय. आता कर्मचारी स्वतः नोकरी सोडण्याची तारीख अपडेट करू शकतात.

आपण घरी बसून नोकरी सोडण्याची तारीख टाकू शकता

आता ईपीएफओ त्याच्या सदस्यांना ईपीएफओ प्रणालीमध्ये स्वतः सोडण्याची तारीख टाकण्याची परवानगी देते आणि त्यांना कंपनीवर अवलंबून राहण्याची गरज नाही. या नवीन अपडेटमुळे फंडातून पैसे काढणे आणि ट्रान्सफर करणे सोपे झालेय. तुमच्या पीएफ खात्यात ‘एक्झिटची तारीख’ प्रविष्ट करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे, तुम्ही ती ऑनलाईन घर बसल्या देखील करू शकता.

एकदा टाकलेली तारीख नंतर बदलता येणार नाही

एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की, एकदा टाकलेली तारीख नंतर बदलता येणार नाही. नोकरी सोडल्यानंतर आपल्याला बाहेर पडण्याची तारीख प्रविष्ट करण्यासाठी दोन महिने प्रतीक्षा करावी लागेल, कारण नियोक्त्याने पीएफ खात्यात केलेल्या शेवटच्या योगदानाच्या दोन महिन्यांनंतरच ते अद्ययावत केले जाऊ शकते.

EPFO मध्ये नोकरी सोडण्याची तारीख कशी अपडेट करावी?

>> प्रथम unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ वर जा >> लॉगिन करण्यासाठी यूएएन, पासवर्ड आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा. >> एक नवीन पेज दिसेल, सर्वात वर ‘मॅनेज’ वर क्लिक करा. >> आता मार्क एक्झिटवर क्लिक करा. >> तुम्हाला ड्रॉपडाऊनमध्ये सिलेक्ट एम्प्लॉयमेंट दिसेल, तुमच्या UAN शी लिंक असलेला जुना PF खाते क्रमांक निवडा. >> त्या खात्याशी आणि नोकरीशी संबंधित तपशील येथे दिसेल. >> आता, नोकरी सोडण्याची तारीख आणि कारण प्रविष्ट करा. करी सोडण्याचे कारण म्हणजे सेवानिवृत्ती, अल्प सेवा. >> ‘रिक्वेस्ट ओटीपी’ वर क्लिक करा. आता, ओटीपी प्रविष्ट करा आणि चेक बॉक्सवर क्लिक करा. >> अपडेटवर क्लिक करा, नंतर ओके आणि तुमचे काम झाले.

संबंधित बातम्या

मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी 11 हजार कोटींच्या नव्या घोषणेच्या तयारीत, मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक

आतापर्यंत 30 लाख खासगी नोकरदारांकडून ‘या’ सरकारी पेन्शन योजनेचा लाभ, 500 रुपयांपासून करा सुरुवात

Change jobs frequently, then do this job for sure, otherwise PF money will hang

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.