तुमच्या खात्याला आजच बदला जनधन खात्यामध्ये, होईल लाखोंचा फायदा
तुमचेही बचत खातं असल्यास ते जनधन खात्यात ट्रान्सफर केलं जाऊ शकतं. याची प्रक्रियादेखील अतिशय सोपी आहे.
नवी दिल्ली : जनधन खात्याचे अनेक फायदे आहेत. इतकंच नाही तर हे उघडणंही सोपं आहे. लॉकडाऊनमध्ये (Lockdown) मोदी सरकारने (Modi Government) तीन हप्त्यांमध्ये ग्राहकांच्या जनधन खात्यात (Jan Dhan Accounts) 1,500 रुपये टाकले होते. तुमचेही बचत खातं असल्यास ते जनधन खात्यात ट्रान्सफर केलं जाऊ शकतं. याची प्रक्रियादेखील अतिशय सोपी आहे. पंतप्रधान जनधन योजने (Pradhan Mantri Jan-Dhan Yojana- PMJDY) मध्ये खात्यांमध्ये किमान शिल्लक ठेवण्याची गरज नसते. पण जर तुम्हाला चेकबुकची सुविधा हवी असेल तर खात्यामध्ये किमान शिल्लक ठेवणं आवश्यक आहे. (change your saving bank account to jan dhan account get benefits of lakhs)
जुन्या खात्याला असे बदला जनधन खाद्यामध्ये… जर एखाद्या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर ते तुम्ही जनधन खात्यात ट्रान्सफर करू शकता. याची पद्धत अतिशय सोपी आहे. यासाठी तुम्हाला बँक शाखेत जाऊन रुपे कार्डसाठी अर्ज करावा लागेल आणि फॉर्म भरल्यानंतर तुमचे बँक खाते जनधन योजनेत ट्रान्सफर होईल.
अशात तुम्हाला जर जनधन योजनेंतर्गत बँक खातं उघडायचं असेल तर तुम्ही कोणत्याही बँकेच्या शाखेत उघडू शकता. खातं उघडण्यासाठी कोणत्याही बँकेच्या वेबसाईटवरून फॉर्म डाउनलोड करून भरावा लागेल. संबंधित कागदपत्रं जोडल्यानंतर तुमचं खातं उघडलं जाईल.
असा मिळेल लाखोंना फायदा जनधन खात्यात ओव्हरड्राफ्ट सुविधेसह रुपे डेबिट कार्डची सेवादेखील उपलब्ध आहे. या डेबिट कार्डवर 1 लाख रुपये अपघात विमा मिळतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ग्राहकांनी 28.8.2018 नंतर खातं उघडलं आहे त्यांचा अपघात विमा वाढवून 2 लाख करण्यात आला आहे. याशिवाय कार्डवर 30,000 रुपयांचे विनामूल्य जीवन विमा संरक्षण देण्यात आले आहे. (change your saving bank account to jan dhan account get benefits of lakhs)
जनधन खाते आधारशी करा लिंक सर्व खातेधारकांचा आधार नंबर 31 मार्च 2021 पर्यंत लिंक करून घेण्याच्या सूचना अर्थमंत्री (Minister) निर्मला सीतारमण (nirmala sitharaman) यांनी बँकांना दिल्या होत्या. त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार, ज्या खात्यांमध्ये पॅन नंबर (Pan card Number) आवश्यक आहे तिथे पॅन नंबर आणि जिथे आधार नंबर (aadhaar Card Number) महत्त्वाचा आहे तिथे आधार नंबर 31 मार्च 2021 पर्यंत लिंक असला पाहिजे. इतकंच नाही तर 2.30 लाख रुपयांचा फायदा हवा असेल तर प्रधानमंत्री जनधन योजनेमध्ये (Pradhan Mantri Jan-Dhan Yojana- PMJDY) वेळीच आपलं खातं उघडा आणि आधारशी लिंक करा असंही निर्मला सीतारमण यांनी सांगितलं होतं.
इतर बातम्या –
जनधन खात्याला आधारशी करा लिंक, अन्यथा नाही मिळणार 2.30 लाखांचा फायदा
SBI मध्ये खातं असेल तर लगेच चेक करा अकाऊंट, बँकेकडून ग्राहकांना ‘Alert’ जारी
Video : Special Repoert | RBI | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून दोन बँकावर निर्बंध, ग्राहकांच्या अडचणीत वाढ#RBI pic.twitter.com/tPwuk12kHv
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 18, 2020
(change your saving bank account to jan dhan account get benefits of lakhs)