ATM मधून बाहेर पडण्याअगोदर चेक करा बॅलन्स, ट्रान्झॅक्शन फेल झालं तर बसतोय एवढा भुर्दंड!

तुमच्या बँकेच्या सेव्हिंग (Savings Account) खात्यात किती रक्कम शिल्लक आहे, यावर लक्ष देणे अतिशय महत्वाचे आहे.

ATM मधून बाहेर पडण्याअगोदर चेक करा बॅलन्स, ट्रान्झॅक्शन फेल झालं तर बसतोय एवढा भुर्दंड!
Follow us
| Updated on: Dec 27, 2020 | 12:47 PM

मुंबई : तुमच्या बँकेच्या सेव्हिंग (Savings Account) खात्यात किती रक्कम शिल्लक आहे, यावर लक्ष देणे अतिशय महत्वाचे आहे. यासाठी बँकेने खात्यातील शिल्लक रक्कम जाणून घेण्यासाठी मिस्ड कॉल आणि एसएमएस सारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, तरीही अनेक ग्राहक त्याचा उपयोग न घेता एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जातात. अशावेळी आपल्या बँक खात्यात किती रक्कम आहे याची कल्पना नसल्यामुळे बऱ्याच वेळा आपण जास्त रक्कम टाकल्यामुळे फेल ट्रान्झॅक्शन येते. मात्र, याची मोठी किंमत आपल्याला मोजावी लागते. (Check the amount in the back account. Penalty is levied if the transaction fails)

कमी बॅलन्समुळे अयशस्वी झालेल्या एटीएम व्यवहारांवर बँका शुल्क आकारते. एटीएम स्क्रीनवर फेल ट्रान्झॅक्शन मेसेज आल्यावर ग्राहकांना याची माहिती मिळते. म्हणूनच, एटीएममधून पैसे काढण्यापूर्वी खात्यातील शिल्लक रक्कम तपासायला विसरू नका. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), एचडीएफसी बँक (HDFC Bank), कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank), येस बँक (Yes Bank) या सर्व बँक

फेल ट्रांजॅक्शनल झाल्यावर किती पैसे मोजावे लागतात?  एसबीआय (SBI) – देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक एसबीआयच्या खातेदारांच्या खात्यात जास्त पैसे नसल्यास, एटीएममधून पैसे काढताना जर फेल ट्रान्झॅक्शन झाले तर ग्राहकांना 20 रुपये दंड आणि त्याचा जीएसटी देखील भरावा लागतो.

आयडीबीआय बँक (IDBI) – जर आयडीबीआय बँकेचा ग्राहक दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढत असेल आणि ते ट्रान्झॅक्शन फेल झाले तर ग्राहकाला प्रत्येकी 20 रुपये दंड भरावा लागतो.

एचडीएफसी बँक (HDFC Bank) – बँक खात्यात शिल्लक रक्कम कमी आहे आणि जर इतर देशातील बँक एटीएममधून किंवा भारताबाहेरील मर्चंट आउटलेटमध्ये व्यवहार अयशस्वी झाला नाहीतर 25 रुपये दंड आकारला जातो.

आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) – दुसऱ्या बँकेचे एटीएम किंवा पॉईंट ऑफ सेलवर खात्यात कमी रक्कम असल्यामुळे व्यवहार फेल गेल्यावर 25 रुपये दंड आकारला जातो.

संबंधित बातम्या : 

स्वस्तात प्रॉपर्टी खरेदी करायची? जाणून घ्या SBI आणि PNB ची नवी योजना

बँकेचं लायसन्स रद्द झालं, तर तुमच्या पैशाचं काय होईल? जाणून घ्या नियम

(Check the amount in the back account. Penalty is levied if the transaction fails)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.