टंचाईचा कोळसा : स्टील-अॅल्युमिनियम उद्योग संकटात, रोजगारांवर टांगती तलवार
योग्य वेळी मार्ग न काढल्यास धातू निर्मिती उद्योगावर विपरित परिणाम होऊन टाळेबंदीची वेळ येण्याची भीती ट्रेड युनियन इंटकने व्यक्त केली आहे.
नवी दिल्ली : देशात कोळशाचा तुटवडा (COAL DEFECIT) निर्माण होत आहे. स्टील तसेच अॅल्युमिनियम सहित विविध धातूंच्या उत्पादनासाठी कोळश्याचा टंचाई भासत आहे. योग्य वेळी मार्ग न काढल्यास धातू निर्मिती उद्योगावर विपरित परिणाम होऊन टाळेबंदीची वेळ येण्याची भीती ट्रेड युनियन इंटकने व्यक्त केली आहे. मोठ्या प्रमाणात बेरोजगारीच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसचे (आयएनटीयूसी) राष्ट्रीय सचिव संजय कुमार सिंह यांनी सध्या कोळशा पुरवठ्यासाठी (coal supply) वीज उत्पादक संयंत्रांना प्राथमिकता दिली जात आहे. पॉवर प्लांट (power plant) सहित स्टील तसेच अॅल्युमिनियम उत्पादक उद्योगाला मोठ्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. एकूण कोळशा उत्पादनापैकी केवळ 20% कोळशाचा पुरवठा औद्योगिक क्षेत्राला केला जात आहे. कोळशाची टंचाई कायम राहिल्यास छोट्या कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागेल.
गेल्या दोन महिन्यांपासून टंचाईनं तळ गाठला आहे. कोळश्यावर आधारित राज्यांतील उद्योग बंद करण्याची वेळ त्यांच्यावर येऊन ठेपली आहे. केंद्राने मात्र कोळशा तुटवडा नसल्याचं म्हटलं आहे. सध्या कोळशा आयातीवर असलेलं अवलंबित्व कमी होण्याकडे कल दिसून येत असल्याचे कोळशा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.
उद्योगांचा पाया:
उर्जानिर्मितीसोबत विविध उद्योगांसाठी कोळसा पायाभूत संसाधन ठरते. कोळसा हे एक प्रकारचे जीवाष्म इंधन आहे. जळाऊ लाकडे धुमसवून करतात त्या कोळशाला लोणारी कोळसा म्हणतात. तर खाणीत नैसर्गिकपणे बनलेल्या व सापडणाऱ्या कोळशाला दगडी कोळसा म्हणतात. दगडी कोळश्याचा वापर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात केला जातो. स्टील किंवा विविध धातू निर्मिती उद्योगात कोळसा अविभाज्य घटक मानला जातो. त्यामुळे कोळश्याची तूट भरून काढण्यासाठी आयातीचा मार्ग अवलंबला जातो.
इतर बातम्या :