दिलासादायक! खाद्यतेल झाले स्वस्त; लीटरमागे 20 ते 25 रुपयांची घसरण

महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. खाद्यतेल स्वस्त झाले असून, गेल्या काही दिवसांमध्ये खाद्य तेलाचे दर 10 ते 15 टक्क्यांनी कमी झाले आहेत.

दिलासादायक! खाद्यतेल झाले स्वस्त; लीटरमागे 20 ते 25 रुपयांची घसरण
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 8:44 AM

मुंबई :  सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. खाद्यतेलाच्या (edible oil) दरात घसरण पहायला मिळत आहे. भविष्यात तेलाचे दर आणखी स्वस्त होऊ शकतात असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे . गेल्या काही महिन्यांपासून रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) युद्धामुळे गगनाला भिडलेल्या खाद्यतेलाच्या दरातील घसरणीमुळे नागरिकांना दिलासा मिळला आहे. केंद्र सरकारने खाद्यतेलावरील सीमा शुल्क दोन वर्षांसाठी हटविल्याने तेलाचे दर नियंत्रणात आले आहेत. मागील काही दिवसांत सोयाबीन आणि पामतेलाचे दर 10 ते 15 टक्क्यांनी कमी झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांना वाढत असलेल्या माहागाईमध्ये थोडा का होत नाही दिलासा मिळाला आहे. रशिया आणि युक्रेमध्येमध्ये युद्ध सुरू आहे. आपण युक्रेनकडून मोठ्याप्रमाणात सुर्यफूलाच्या तेलाची आयात करतो. मात्र युद्धामुळे ही आयात ठप्प झाली आहे. तसेच इंडोनेशियाकडून काही काळ पाम तेलाच्या निर्यातीवर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र आता हे निर्बंध देखील उठवण्यात आले आहेत.

इंडोनेशियाने निर्बंध उठवले

देशात महागाई वाढत आहे. वाढत्या महागाईचा मोठा फटका हा सर्वसामान्य लोकांना बसत आहे. इंधनापासून ते खाद्यतेलापर्यंत आणि अन्नधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत सर्वच वस्तूंच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये खाद्यतेलाचे दर चांगलेच कडाडले होते. खाद्यतेलाचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने दोन वर्षांसाठी खाद्यतेलावरील सीमा शुल्क हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होत नाहीत मात्र तेलाचे दर कमी झाले आहेत. दुसरीकडे इंडोनेशियाने पुन्हा एकदा पाम तेलाची निर्यात सुरू केल्याने भारतात असलेला खाद्यतेलाचा तुटवडा कमी होण्यास मदत मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

रशिया युक्रेन युद्धाचा फटका

भारतात खाद्यतेलाचे दर वाढण्यास जे घटक कारणीभूत आहेत. त्यामध्ये सर्वात मोठा घटक म्हणजे रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध आपण जवळपास एकूण गरजेच्या साठ टक्क्यांपेक्षा अधिक सूर्यफूल तेल या दोन देशांकडून आयात करतो. एकूण सूर्यफूल तेलाच्या निर्यातीपैकी सत्तर टक्के निर्यात ही युक्रेनमधून होते. तर तीस टक्के निर्यात ही रशियामधून होते. मात्र सध्या या दोन्ही देशांत सुरू असलेल्या संर्घषामुळे सुर्यफूल तेलाची आयात पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे देशात तेलाचा तुटवडा जावणत होता. मात्र आता इंडोनेशियाने पुन्हा एकदा दीड महिन्यापूर्वी पाम तेलाची निर्यात सुरू केल्याने भारताला मोठा दिलासा मिळावा आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.