आर्थिक वर्ष संपण्याआधी झटपट पूर्ण करा ही कामे, अन्यथा भरावा लागेल दंड

आर्थिक वर्ष संपण्याआधी झटपट पूर्ण करा ही कामे, अन्यथा भरावा लागेल दंड. तुम्ही 31 मार्चपर्यंत रीवाईज्ड किंवा लेट इन्कम टॅक्स भरू शकाल परंतु त्यासाठी आपल्याला 10 हजार रुपये लेट फाईन द्यावा लागेल (Complete these five works immediately before the end of the financial year, otherwise you will have to pay a fine)

आर्थिक वर्ष संपण्याआधी झटपट पूर्ण करा ही कामे, अन्यथा भरावा लागेल दंड
Offline facility for ITR Form
Follow us
| Updated on: Mar 06, 2021 | 5:34 PM

नवी दिल्ली : आर्थिक वर्ष 2020-21 लवकरच संपणार आहे. अशा परिस्थितीत काही अशी कामे आहेत जी 31 मार्चपूर्वी पूर्ण करावी लागणार आहेत. जर आपण ही कामे दिलेल्या डेडलाईनमध्ये पूर्ण केली नाहीत तर भारी दंड भरावा लागणार आहे. करासंबंधी काही कामे पूर्ण करण्यासाठी 31 मार्चची डेडलाइन देण्यात आली आहे. जर आपण ही डेडलाईन पाळली नाही तर आपणाला पुढील वर्षी रीवाईज्ड किंवा लेट इन्कम टॅक्स फाईल करण्याची संधी मिळणार नाही. तुम्ही 31 मार्चपर्यंत रीवाईज्ड किंवा लेट इन्कम टॅक्स भरू शकाल परंतु त्यासाठी आपल्याला 10 हजार रुपये लेट फाईन द्यावा लागेल. (Complete these five works immediately before the end of the financial year, otherwise you will have to pay a fine)

बिलेटेड फायलिंग (उशिरा रिटर्न भरणे)

31 मार्च हा आर्थिक वर्ष 2020-21 चा शेवटचा दिवस आहे. ही तारीख 2019-20 या आर्थिक वर्षासाठी रीवाईज्ड किंवा लेट इन्कम टॅक्स भरण्याची अंतिम तारीख असेल. कोणत्याही आर्थिक वर्षासाठी इनकम टॅक्स रिटर्न (आईटीआर) फाइल करण्याची मूळ डेडलाईन संपल्यानंतर बिलेटेड रिटर्न फाइल केला जातो, मात्र यासाठी करदात्यांना दंड भरावा लागतो. बिलेटेड आयटीआर 10 हजार रुपयांच्या लेट फायलिंग फिजसोबत 31 मार्च 2021 या तारखेच्या आधी जमा करावा लागतो.

रिवाइज्‍ड रिटर्न

सुधारीत आयटीआर कोणताही करदाता त्याचवेळी फाईल करू शकतो, जर त्या करदात्याकडून ओरिजनल टॅक्स रिटर्न फाइल करताना कोणती चूक झाली असेल. यात डिडक्‍शनचा क्‍लेम विसरणे, इनकम किंवा बँक अकाउंट इत्‍यादींची नोंद न करणे यासारख्या चुकांचा समावेश आहे. जर आपण आयटीआर दाखल केला आहे, परंतु यात कोणताही बदल करायचा असेल तर आपल्याला सुधारीत रिटर्न फाईल करता येईल.

ऍडव्हान्स टॅक्स फाईल करणे

इनकम टॅक्स कायद्याखाली जर कोणत्याही व्यक्तीचा व्यवहार 10 हजार रुपयेपेक्षा ज्यास्त होत असेल, तर त्या व्यक्तीला चार टप्प्यात म्हणजेच 15 जुलै, 15 सप्टेंबर, 15 डिसेंबर आणि 15 मार्चपूर्वी ऍडव्हान्स टॅक्स द्यावा लागतो. ऍडव्हान्स टॅक्सचे पेमेंट केले नाही तर दंड भरावा लागतो. अशाच प्रकारे 15 मार्चपर्यंत आर्थिक वर्ष 2021-22 साठी ऍडव्हान्स टॅक्सचा चौथा टप्पा जमा करावा लागतो.

आधार आणि पॅन कार्ड जोडणे

जर आपण आधार कार्डला (Aadhar Card) पॅन कार्ड (Pan Card) लिंक केले नसेल तर ही आवश्यक माहिती जाणून घ्या. सध्याच्या नियमांनुसार पॅनला आपला आधार नंबर जोडणे अनिवार्य आहे. याबरोबरच आयकर रिटर्न फाईल करतेवेळी पॅनसोबत आधार नंबर देणे गरजेचे आहे. सरकारने याआधी पॅनला आधार कार्डला लिंक करण्याचा अवधी 30 जून 2020 वरून वाढवून 31 मार्च 2021 केला आहे. अशा परिस्थिती ज्या लोकांनी अजूनही आपले पॅन आधारला लिंक केले नसेल, त्या लोकांना दंड भरावा लागेल. या लोकांचे पॅन कार्ड 1 एप्रिल 2021 पासून निष्क्रिय होईल.

काय आहे ‘विवाद से विश्‍वास’ योजना

‘विवाद से विश्‍वास’ योजनेंतर्गत डिक्लेरेशन फाइल करण्यासाठी अंतिम डेडलाईन वाढवून 31 मार्च करण्यात आली होती. प्रत्‍यक्ष कर ‘विवाद से विश्‍वास’ कायदा 17 मार्च 2020 रोजी लागू झाला होता. या योजनेचा हेतू प्रलंबित कर तक्रारींचा निपटारा करणे आहे. देशातील विविध न्यायालयांत प्रत्यक्ष करसंबंधीत 9.32 लाख कोटी रुपयांचे 4.83 लाख प्रकाराने प्रलंबित आहे. या योजनेखाली करदात्यांना केवळ वादग्रस्त टॅक्स रक्कम भरावी लागेल. त्यांना व्याज आणि दंड यावर सूट मिळेल. (Complete these five works immediately before the end of the financial year, otherwise you will have to pay a fine)

इतर बातम्या

5 वर्षापूर्वीचं ट्विट विक्रीला; 2 कोटी रुपये किंमत; वाचा नेमकं प्रकरण काय?

उद्धव ठाकरेंनी स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी उघडावी, नारायण राणेंचा पलटवार

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.