AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Price Today : सोन्याने दिली दरवाढीची वर्दी! चांदीने दिली आनंदवार्ता, आजचा भाव घ्या जाणून

Gold Silver Price Today : जागतिक बाजारातील दबावाचा परिणाम झुगारुन सोने चकाकले आहे तर चांदीतील घसरण कायम आहे. गुंतवणूकदारांना भविष्यात चांदीच सोन्यावाणी परतावा देण्याची शक्यता आहे.

Gold Silver Price Today : सोन्याने दिली दरवाढीची वर्दी! चांदीने दिली आनंदवार्ता, आजचा भाव घ्या जाणून
Follow us
| Updated on: May 14, 2023 | 9:16 AM

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील दबावाचा परिणाम झुगारुन सोने चकाकले आहे तर चांदीतील घसरण (Gold Silver Price) कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याची अहिस्ता कदम भू्मिका आहे. सोने किंचित वधारते आणि पुन्हा त्यात घसरण दिसून येत आहे. चांदीत मात्र गेल्या पाच दिवसांपासून घसरणीचे सत्र कायम आहे. जागतिक बाजारात डॉलरचा दबाव आणि मंदीची भीतीने हा परिणाम साधला आहे. 12 मे रोजी संध्याकाळच्या सत्रात सोन्यात मोठी घसरण नोंदविण्यात आली. प्रति दहा ग्रॅममागे 450 रुपयांची घसरण नोंदविण्यात आली. 13 मे रोजी संध्याकाळी भावात 150 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढ झाली. जागतिक बाजारपेठेतील घडामोडी अनुकूल नसल्याने सोन्याला मोठा पल्ला गाठण्यात अडचण येत आहे.

असा आहे भाव  गुडरिटर्न्सनुसार, 10 मे रोजी सोन्याने उसळी घेतली होती भाव 250 रुपयांनी वाढले. 11 मे रोजी भावात मोठा उलटफेर झाला नाही. तर 12 मे रोजी संध्याकाळी 22 कॅरेट सोने 450 रुपयांच्या घसरणीसह 56,650 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. तर 24 कॅरेट सोन्यात 440 रुपयांची घसरण होऊन हा दर 61,840 रुपये होता. 13 मे रोजी संध्याकाळी भावात 150 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढ झाली.

24, 23, 22 कॅरेटचा भाव ibjarates.com नुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,964 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 23 कॅरेटचा भाव 60,720 रुपये तर 22 कॅरेटचा भाव 55,843 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आज ibjarates सकाळच्या सत्रातील भाव जाहीर केलेला नाही. 18 कॅरेट सोन्याचा भाव 45,723 रुपये होता. हे भाव काल संध्याकाळचे आहेत.

हे सुद्धा वाचा

चांदीत जवळपास तीन हजारांची घसरण 1 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 76,000 रुपये होता. तर 6 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 78,250 रुपये आहे. म्हणजे पाच दिवसांत चांदी किलोमागे 2250 रुपयांची वाढ झाली. 9 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 78,100 रुपये होता. 10 मे रोजी सकाळच्या सत्रात चांदी किलोमागे 100 रुपयांची घसरण होऊन भाव 78,000 रुपये झाला आहे. 11 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 77,600 रुपये होता. 12 मे रोजी चांदीत 2600 रुपये प्रति किलो घसरण होऊन भाव 75,000 रुपये किलो झाला. तर 13 मे रोजी भाव 200 रुपयांनी घसरुन प्रति किलो 74800 रुपये झाले.

भाव एका मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

शुद्ध सोन्याचा हॉलमार्क भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.

काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध असते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.

महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?
महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?.
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की.
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी.
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना.
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल.
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी.
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त.
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती.
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री.
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा.